काही कलाकृती अजरामर असतात. शेक्सपिअरचे हॅम्लेट व अथेल्लो जसे अनेकांना भावले. तोच प्रकार भारतात ‘देवदास’बाबत घडला. अनेकांनी थेट यावर सिनेमा...
काही कलाकृती अजरामर असतात. शेक्सपिअरचे हॅम्लेट व अथेल्लो जसे अनेकांना भावले. तोच प्रकार भारतात ‘देवदास’बाबत घडला. अनेकांनी थेट यावर सिनेमा व नाटक बनवले. तर, अनेकांनी याची प्रेरणा घेऊन कलाकृती उभी केली. ‘देवदास’वर किती आणि कोणते सिनेमे बनले, किती चालले आणि किती आपटले हा आजचा विषय नाही. तर, मुद्दा आहे आधुनिक देवदासचा..
लेखक : गणेश शिंदे (सरकार), अहमदनगर
‘ये देवदास झालाय त्याचा’, असा डायलॉग हमखास आपण ऐकतोच की. त्याला निमित्त असते प्रेमभंग झालेल्या भावनेचे. किंवा प्रेमात पडल्यावर मनात गुंतागुंतीचे भाव निर्माण होण्याचे. तर हा देवदास शब्द आलाय एका कादंबरीतून. बंगालचे प्रसिद्ध लेखक शरतचंद्र चटोपाध्याय यांनी ही कादंबरी लिहिली. ‘देवदास’ नावाचे सिनेमा याच कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहेत. माधुरी-शाहरुख-ऐश्वर्या यांचा देवदास १२ जानेवारी २००२ ला रिलीज झाला. या चित्रपटातील शायरी आणि संवाद आजही लोकांच्या ओठावर आहेत. कारण, त्यातील लेखकांची कमाल आणि स्टोरीची धमाल..!
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी सुपरस्टार शाहरुख खानला संगितले होते की, ही फिल्म त्याच वेळी बनेल, ज्यावेळी तू होकार देशील. ज्यावेळी स्क्रिप्ट तयार झाल्यावर भन्साळीने कथा आणि त्यातले भन्नाट डायलॉग वाचून दाखवले. त्याबद्दल एका ठिकाणी बोलताना शाहरुखने संगितलेय की, मी ज्यावेळी 'कौन कमबख्त बर्दाश्त करने के लिए पीता है, हम तो पीते हैं कियहां पर बैठ सके, तुम्हें देख सके, तुम्हें बर्दाश्त कर सकें' हा डायलॉग वाचला आणि लगेच फिल्म साईन केली.
चित्रपटातील महत्वाचे डायलॉग असे :
१) 'बाबूजी ने कहा गांव छोड़ दो, सब ने कहा पारो छोड़ दो, पारो ने कहा शराब छोड़ दो, आज तुमने कह दिया हवेली छोड़ दो, एक दिन आएगा जब वो कहेगा, दुनिया ही छोड दो!
२) 'प्यार का कारोबार तो बहुत बार किया है, मगर प्यार सिर्फ एक बार'!
३) 'एक बात होती थी तब तुम बहुत याद आती थी...कब...जब जब मैं सांस लेता था तब तब'
‘देवदास’ चित्रपटची क्रेझ आजही प्रेमिकांच्या मनात खोलवर रुतून आहे. म्हणूनच प्रेमात पडलेल्या व्यक्तिला सहजपणे म्हणले जाते की, ‘काय देवदास झालास की काय?’
भन्साळीची एक खासियत आहे. ती म्हणजे चित्रपटाचे विशाल असे सेट. ते पाहतानाच डोळ्यांचे पारणे फिटेल असे भव्य दिव्य सगळे काही असते. अशाच काही भन्नाट गोष्टी देवदास या चित्रपटच्या बाबतीत पण आहेत. या चित्रपटासाठी २७५ दिवस २५०० लाइट आणि तब्बल ७०० लोक फक्त लाइटचे नियोजन करायला होते. वेगवेगळे ६ सेट, ४२ जनरेटर होते.
शूटच्या वेळी हे सगळे हातळायला मोठी वीज लागत होती. या चित्रपटच्या काळात मुंबईत एक वेगळाच किस्सा झालेला. मुंबईमधील मोठ्या प्रमाणात जनरेटर भन्साळी यांच्या सेटवरती लागले. त्यावेळी मुंबईमध्ये लग्नाला जनरेटर मिळत नव्हते. मग कल्पना करा सेट की किती भव्य दिव्य असतील ते.
इतकेच काय तर, माधुरी आणि ऐश्वर्या यांच्या कपड्यांवर चित्रपटाचे तब्बल २५ % बजेट खर्च झाले. तर, २५% बजेट हे सेट वरती खर्च झाले होते. माधुरीचा एक एक ड्रेस हा ३०–३० किलोचा होता. तो घालून नाचणे म्हणजे तारेवरची कसरत होती. मात्र, हे दिव्य तिने लीलया पार पाडले.
चला पाहूया चित्रपटाची थोडक्यात कथा..
चित्रपटची कथा ही १९०० मधील आहे. देवदासच्या आईला समजते की देवदास इंग्लंडवरून परत येणार आहे. ही गोष्ट ती सर्वांना सांगते. शेजारी राहणार्या. सुमित्रालासुद्धा. कारण १० वर्षानी देवदास येणार असतो. लहानपणीचे मित्र असलेल्या पारोच्या घरी तो आल्याबरोबरच जातो. आणि त्यांच्या जुन्या मैत्रीचे रूपांतर हे नकळत प्रेमात होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडून जातात.
तिच्याशी लग्नाचा प्रस्ताव मांडला जातो आणि देवदासच्या घरातून कौटुंबिक विरोध होतो. अपमानाच्या रागात पारोची आई मुलीचे लग्न हे देवदासच्या कुटुंबापेक्षाही जास्त श्रीमंत माणसासोबत लावून देते. तर, देवदास घर सोडून निघून जातो. तो थेट कोठ्यावर राहायला लागतो.
तिथे त्याची आणि चंद्रमुखीची ओळख होते. तिचे देवदासवर प्रेम होते. पुन्हा देवदासला पारोच्याबद्दल आपण चुकलो असे वाटते. पुन्हा देवदास दारूच्या आहारी जातो. अशातच त्याच्या वडिलांची प्रकृती बिघडते. ते देवदासला पाहण्याची इच्छा व्यक्त करतात. मात्र, तिथे जाऊपर्यंत त्यांचा जीव गेलेला असतो. देवदासला त्यांच्याविषयी अजिबात आत्मीयता नसते. परक्या माणसाच्यासारखा तो वागतो. त्याचे दारू पिणे वाढत जाते. त्याला याची कल्पना येते की, तो दारूच्यामुळे मरु शकतो.
पुन्हा तो घरी येतो. त्याच्या वाहिनीने तिजोरीच्या किल्ल्या चोरलेल्या आहेत हे त्याला समजते. तो वाहिनीला बोलतो. तर वाहिनी आईला खोटे सांगते की, किल्ल्या देवदासने चोरल्या आहेत. देवदासच्या आईला विश्वास वाटतो आणि ती देवदासला घरातून हाकलून लावते. पुन्हा तो चंद्र्मुखीच्या कोठ्यावर जातो. पारो त्याला म्हणते की दारू सोडून दे. पण तो तिचे काही ऐकत नाही.
फक्त तिला शब्द देतो की मरण्याच्या अगोदर एकदा तरी तुझ्या दरवाजात येईल. दरम्यान, चून्नी बाबूची आणि देवदासची भेट होती. त्याला माहीत असते की आपण दारू पिल्याच्या नंतर जगणार नाहीत. तरीही मैत्रीच्या साथीने तो दारू पितो. आपण मरणार अशी जाणीव होते आणि देवदास पारुच्या घराकडे जातो. घरच्या समोरच्या झाडाखाली तो पडतो. एकमेकांना भेटण्याचा त्यांचा प्रयत्न होतो. अखेर देवदास दाराजवळ शेवटचा श्वास घेतो.
देवदास हा चित्रपट हा खूप संवेदनशील आहे. नात्यांची काळजी असणार्या. व्यक्तीची कथा म्हणून ओळखला जातो. परंतु, इतकी भन्नाट स्टोरी काही सगळ्यांना पचेल असे नाही. देवदास पाहायला आणि पचायला आपल्याला देवदास झाल्याची एकदातरी अनुभूती घ्यावीच लागते. मग देवदास मनात घर करतो. तो आपल्याही मरणापर्यंत..
संपादन : सचिन मोहन चोभे
पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com
| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS