शेतकरी आंदोलन किंवा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारला लक्ष्य करण्यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत आघाडीवर आहे. पंतप्रधान ...
शेतकरी आंदोलन किंवा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारला लक्ष्य करण्यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत आघाडीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व भाजप सरकारची प्रशंसक असलेल्या कंगना हिचा सुपरस्टार हृतिक रोषण याच्याशी छत्तीसचा आकडा आहे. आताही आज कंगनाने हृतिकला मुंबईच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे समन्स पाठवलेले आहे.
कंगना ही आक्रमक, बंडखोर आणि एक गुणी अभिनेत्री आहे. मात्र, तिच्या सार्वजनिक जीवनातील भूमिका घेण्यामुळे ती सतत चर्चेत असते. एखादी भूमिका घेतल्यावर जग तिला चूक म्हणू किंवा बरोबर, कंगनाला काहीही फरक पडत नाही. परंतु, मग यामुळे तिचा आक्रस्ताळेपणा वाढत गेल्याचे शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने सर्वांनी पाहिले आहे. त्याच कंगनाने हृतिक रोषण याचेही जगणे हराम केले आहे.
कंगना हिने अभिनेता हृतिकवर आरोप केलेले आहेत. त्याचे कोर्टमॅटरही चालू आहेत. हृतिक हा तिच्यासोबत नात्यात होता. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. पण पुढे हृतिकने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. यानंतर चिडलेल्या कंगनाने त्याच्यासोबतचं नातं मोडतानाच त्याला पोलिसांच्या ससेमिऱ्यात अडकून टाकले आहे. आपल्या हक्क आणि अधिकार यासाठी कंगना नेहमीच आग्रही राहिली आहे. महिला म्हणून तिने कधीही फ़क़्त अन्याय सहन करण्यात धन्यता मानलेली नाही.
यानंतर मागील पाच-सात वर्षात बर्याेचवेळा दोघांनीही एकमेकांना कायदेशीर नोटीस पाठवल्या आहेत. एकमेकांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा दोघेही पद्धतशीर प्रयत्न करीत आहेत. आज पोलिसात हृतिक जात आहे तो हा समन्स २०१६ मधील निगडीत केससाठी. ऋतिकने त्यावेळी आयपीसी कलम ४१९ आणि आयई कायदा कलम ६६ (सी) आणि ६६ (डी) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. पाच वर्षापासून हे प्रकरण चालू आहे.
तीन-चार वर्षांपूर्वी प्रत्येक मुलाखतीत अभिनेत्री कंगना ही ऋतिकबद्दल मनात असलेली सगळी भडास बाहेर काढत होती. आताही ती संधी आली की त्यावर व्यक्त होतेच. कंगनाने माध्यमासमोर हृतिकला ‘सिली एक्स’ असेही म्हटले होते. कंगना रनौतने ऋतिक रोशनची बदनामी करण्यासाठी आणि मानसिक त्रास देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केल्याप्रकरणी २०१६ मध्ये तिच्याविरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता. त्याचीही चौकशी चालू आहे.
अगोदर ही केस सायबर पोलीस यांच्याकडे होती. मात्र, दोन महिन्यापासून या केसवर सध्या मुंबईच्या गुन्हे शाखेतर्फे काम चालू आहे. त्यानुसार हृतिकने दाखल केलेल्या एका तक्रारीचा जबाब नोंदवण्यासाठी त्याला शनिवारी २७ फेब्रुवारी २०२१ रोजी पोलिसांकडे जावे लागत आहे. कंगना आणि हृतिक यांच्यातील शीतयुद्ध वाढत असल्याचे हे द्योतक असल्याचे मानले जात आहे.
दोघांनीही एकमेकांना वेळोवेळी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. २०१३-१४ या वर्षामध्ये हृतिकला त्याच्या मेल आयडीवर शेकडो ईमेल आले होते. मात्र, पुढे या प्रकरणात कोणतीच प्रगती झालेली नाही. तसेच प्रख्यात वकील महेश जेठमलानी यांनी डिसेंबर २०२० मध्ये मुंबई पोलीस आयुक्तांना या विषयाच्या संबंधात पत्र लिहिले होते. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी हे प्रकरण सायबर सेलमधून सीआययूकडे पाठवलेले आहे. त्यासाठीच पोलिसांनी हृतिकला बोलावले आहे.
सुप्रसिद्ध ‘क्रिश ३’ चित्रपटादरम्यान ऋतिकशी प्रेमसंबंध असल्याचा दावा कंगनाने केला होता. मात्र, त्याचवेळी ऋतिकने कंगना ही खोटे बोलत असल्याचे प्रत्युत्तर दिले होते. पुढे या दोघांमधील वाद इतका वाढला की, दोघांनाही याप्रकरणी थेट कायदेशीर मदत घ्यावी लागली. आता त्यांचे वकीलच एकमेकांशी बोलत असतात. त्यावेळी या वादावर अनेकांनी कंगनाची बाजू घेत ऋतिकवर हल्लाबोल केला होता. मात्र, ऋतिकने काहीही उत्तर देण्याऐवजी मौन बाळगत केवळ कामाकडे लक्ष दिले होते. पुढे अनेकांनी यावर हृतिकची माफी मागितली. तरी दोघांचे चाहतेही वेळोवेळी एकमेकांशी भिडत असतात.
संपादन : सचिन मोहन चोभे
+++++++++
COMMENTS