चित्रपती असा बहुमान मिळालेला मराठी अवलिया म्हणजे शांताराम राजाराम वनकुद्रे. थांबा.. थांबा.. नाव वाचून बुचकळ्यात पडला की काय? अहो, हे शांता...
चित्रपती असा बहुमान मिळालेला मराठी अवलिया म्हणजे शांताराम राजाराम वनकुद्रे. थांबा.. थांबा.. नाव वाचून बुचकळ्यात पडला की काय? अहो, हे शांताराम बापूंचे अर्थात व्ही. शांताराम यांचे पूर्ण आणि खरे नाव. वि. शांताराम म्हटले की, अनेकांना आठवते ती ‘इतनी शक्ती हमे देना दाता, की मन का विश्वास..’ ही प्रार्थना आठवते. नव्या जमान्यातील अनेकांना नाहीच या या दिग्दर्शकाचे नाव आठवले तरी ही प्रार्थना आवडते हे नक्कीच. त्याच सिनेमाचे आणि अनेक बेस्ट सामाजिक आशय देणाऱ्या चित्रपटांचे दिग्दर्शक होते शांताराम बापू.
बापूंचा जन्म १८ नोव्हेंबर १९०१ साली कोल्हापूरचा. त्यांचा जन्म काही गरिबीत झाला नव्हता, ना त्यांना कष्ट करीत किंवा पोटाला चिमटे घेऊन मोठे व्हावे लागले. मात्र, सुखवस्तू असूनही नव्या जगातील नवे तंत्रज्ञान त्यांना खुणावत होते आणि त्याचा वापर करून अवघ्या जगामध्ये काहीतरी ठोस काम उभे करण्याची, सामाजिकदृष्ट्या महत्वाचे काम उभे करण्याची बापूंची इच्छाशक्ती होती. त्याच जोरावर वयाच्या १९ व्या वर्षी ते सिनेमा नावाच्या धंद्यात आले. होय, त्यावेळी बाबुराव पेंटर नावाचे एक दिग्गज कलाकार चित्रनगरी कोल्हापूर येथे महाराष्ट्र फिल्म कंपनी चालवत होता. पेंटरांच्या तालमीत शांताराम बापूंनी काम सुरू केले.
१९२१ मध्ये `सुरेखा हरण' या मूकपटात बापूंना छोटीशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. आणि त्यांच्या करिअरची ‘प्रभात’ झाली. तिथेच त्यांनी १९२५ मध्ये `सावकारी पाश' या सामाजिक चित्रपटात तरुण शेतकर्याेची भूमिका करून १९२७ मध्ये `नेताजी पालकर' हा पहिला मूकपट दिग्दर्शित केला. पेंटर यांच्याकडे नऊ वर्षं नोकरी केल्यानंतर आपलीच कंपनी उभी करण्याचे त्यांच्या मनाने घेतले. मग त्यांनी पार्टनरची मोट बांधून प्रभात' कंपनीची स्थापना केली. भागीदार होते व्ही. जी. दामले, एस.बी. कुलकर्णी, एस. फत्तेलाल आणि के. आर. धायबेकर.
‘प्रभात’ने पहिला सिनेमा केला तो ‘अयोध्येचा राजा'. हा मराठी भाषेतील पहिला बोलपट होता. अशा पद्धतीने भारतीय सिनेमामध्ये ऐतिहासिक कामगिरी करण्याचा बापूंचा प्रवास जोमात सुरू झाला. सुरवातीला गुरू बाबुराव पेंटर यांचाच फॉर्म्यूला वापरून त्यांनी पौराणिक चित्रपटांची निर्मिती केली. दरम्यान, १९३३ साली त्यांनी `सैरंध्री' हा रंगीत चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला. भारतात पहिला रंगीत चित्रपट बनवण्याचा तो धाडसी प्रयत्न होता. परंतु, त्या चित्रपटाच्या प्रिंट्स व्यवस्थित डेव्हलप झाल्याच नाहीत. परिणामी हा ऐतिहासिक आणि महत्वाकांक्षी प्रयत्न फसला. त्यामुळे `प्रभात'ला खूप मोठे नुकसान झाले.
असल्या संकटांनी डगमगून जातील ते व्ही. शांताराम कसले? त्यांनी त्यावरही मात केली. पुढे त्यांनी जर्मनीचा दौरा केला. युरोपातील दृष्टीकोनातून त्यांनी त्यावेळी सिनेमाचा अभ्यास केला. त्याने त्यांच्यात एकूण सामाजिकदृष्ट्या मोठाच बदल झाला. द्धकाळाचे दर्शन घडविणार्याक या चित्रपटात पारंपरिक रूढीविरोधात भाष्य करणारा 'अमृतमंथन' हा चित्रपटत्यातूनच निर्माण झाला. मग त्यांनी एका बंडखोर महिलेच्या लढ्याची कहाणी सांगणारा ‘अमर ज्योती’ हा चित्रपट १९३६ ला प्रदर्शित केला.
त्यांचा १९३७ ला आलेला `संत तुकाराम' हा बोलपट जगभरात कौतुकास पात्र ठरला. त्या काळात त्या चित्रपटाने चांगला गल्लाही कमावला. अगदी थेट व्हेनीस चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखविण्यात आला. देशाच्या बाहेर प्रदर्शित झालेला हा पहिला सिनेमा. बापूंनी १९४२ मध्ये प्रभात फिल्म कंपनी सोडली. मुंबईत येऊन मग त्यांनी `राजकमल कला मंदिर'ची स्थापना केली. महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या सुप्रसिद्ध लेखक, कवी, पत्रकार, चित्रपट निर्माते आचार्य प्र. के. अत्रेंनी शांताराम बापूंना `चित्रपती' ही पदवी दिली. आता हीच त्यांची ओळख आहे. जी त्यांनी कर्तुत्वाने निर्माण केली आहे.
बापूंनी त्यांच्या जीवनात तीन विवाह केले. पहिल्या पत्नीचे नाव विमल, दुसरीचे नाव जयश्री आणि तिसरीचे नाव संध्या होते. संध्या म्हणजे चित्रपट तारका होत्या. १९८५ मध्ये शांताराम बापूंना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ तर, १९९२ मध्ये भारत सरकारने `पद्मविभूषण' पुरस्कार देऊन सन्मानीत केले. बापू कालच्या पुढचे पाहणारे निर्माते-दिग्दर्शक होते. त्यांच्या सिनेमामधून विषयाची निवड, आशय, कॅमेर्यानचे तंत्र, संकलन या सर्व बाबतीद्वारे याची झलक स्पष्ट दिसते.
बापूंनी निर्माता-दिग्दर्शक म्हणून बनवलेले इतर महत्वाचे चित्रपट असे :
गोपाळ कृष्ण, राणी साहेबा, खुनी खंजर, उदयकाल, कुंकू, माणूस, शेजारी, डॉ. कोटणीस की अमर कहानी, अमर भूपाळी, झनक झनक पायल बाजे, दो आँखे बारह हाथ, नवरंग, पिंजरा, चंद्रसेना आदि.
संपादन : सचिन मोहन चोभे
पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com
| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS