पुणे : करोना विषाणूच्या विळख्यात सापडलेल्या जगामध्ये सध्या धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि कलेच्या क्षेत्रामध्ये कार्यक्रमांची वण...
पुणे :
करोना विषाणूच्या विळख्यात सापडलेल्या जगामध्ये सध्या धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि कलेच्या क्षेत्रामध्ये कार्यक्रमांची वणवा आहे. कारण, 50 पेक्षा जास्त व्यक्ती एका ठिकाणी येऊ न देण्याची महत्वपूर्ण अट आहे. त्याचाच फटका आता पुण्यासह महाराष्ट्रातील चित्रपट रसिकांना बसला आहे. कारण, १९ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
पुणे फिल्म फाउंडेशनने ११ ते १८ मार्च दरम्यान पिफ फेस्टीव्हल घेण्याचे नियोजन होते. मात्र, वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आता १८ ते २५ मार्च दरम्यान ऑनलाइन पद्धतीने मर्यादित स्वरूपात हा महोत्सव होणार आहे. प्रेक्षकांना ऑनलाइन पद्धतीने महोत्सवात सहभागी व्हायचे असल्यास त्यासाठीची आवश्यक ती नोंदणी ‘पिफ’च्या संकेतस्थळावरून करता येईल.
फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी म्हटले आहे की, ऑनलाईन पद्धतीने होणारा चित्रपट महोत्सव येत्या १८ ते २५ मार्च दरम्यान होईल. जागतिक चित्रपट विभागातील निवडक २६ चित्रपट ऑनलाईन महोत्सवात दाखविण्यात येणार आहेत.
चित्रपटगृहात होणाऱ्या महोत्सवाच्या नवीन तारख्या येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येतील असे सांगताना डॉ. पटेल यांनी म्हटले आहे की, कोविड १९ आजाराच्या रुग्णसंख्येमध्ये वेगाने वाढ झाली आहे. अशावेळी चित्रपटगृहात येण्याविषयी प्रेक्षकांमध्ये संभ्रम आहे. अनेक प्रेक्षकांनी आता चित्रपटगृहात होणाऱ्या महोत्सावासाठीची केलेली नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या महोत्सावासाठी बदलून मिळू शकते किंवा नाही असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केलेली आहे.
त्यामुळे आयोजकांनी चित्रपट जास्तीतजास्त रसिकांपर्यंत पोहोचावण्यासाठीचे नियोजन करण्याचे ठरवले आहे. सध्याच्या परिस्थितीत जास्तीतजास्त रसिकांपर्यंत पोहोचावण्यासाठीचे नियोजन हे उद्दिष्ट साध्य होईल किंवा नाही याविषयी शंका आहेत. त्यामुळे हा महोत्सव काही दिवसांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेत असल्याचे डॉ. पटेल यांनी म्हटले आहे.
सध्या www.piffindia.com या वेबसाइटवर सशुल्क प्रवेशिकांसाठी नोंदणी सुरू आहे. याबाबत डॉ. पटेल यांनी म्हटले आहे की, महोत्सव पुढे ढकलला जाणार असला तरी ‘शो मस्ट गो ऑन’ या उक्तीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने महोत्सव होणार आहे. त्यासाठीची आवश्यक ती नोंदणी ‘पिफ’च्या संकेतस्थळावरून करता येईल. चित्रपटगृहात होणाऱ्या फिल्म महोत्सवासाठी नोंदणी केलेल्या प्रेक्षकांना ऑनलाईन पद्धतीने सहभागी व्हायचे असल्यास तोही बदल करून घेणे शक्य होईल. मात्र, ज्यांनी अगोदरच ऑनलाईन पद्धतीच्या महोत्सवासाठी नोंदणी केली असेल, त्यांना कोणतीही नवीन प्रक्रिया करण्याची गरज नाही.
पिफ या जगप्रसिद्ध चित्रपट महोत्सवात अनेक दर्जेदार आणि बेस्ट सिनेमे दाखवले जातात. यामधील देशी-परदेशी चित्रपटांच्या मेजवानीमुळे हजारो चित्रपट रसिक या चित्रपट मोहोत्सवाला प्रतिवर्षी आवर्जून हजेरी लावतात. मात्र, यंदा करोनामुळे चित्रपट महोत्सव लांबणीवर पडल्यामुळे अनेकांकडून नाराजीही व्यक्त केली जात आहे. कारण, ऑफलाईन पद्धतीने सिनेमा पाहून मग तिथेच कट्ट्यावर चर्चा करणे ही एक वेगळी मजा असते. यंदा ऑनलाईन पद्धतीने पाहून अशी मजा घेण्याचे हे प्रेक्षक मुकणार आहेत.
संपादन : सचिन मोहन चोभे
पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com
| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS