‘रुही’ना सफरने केलेय निर्मात्यांना मालामाल; दणक्यात कमाईचा सिलसिला सुरू..!

  मुंबई : रुहाना सफर सुरू झाला की, जिंदगी फँटॅस्टिक होतेच ना? तसाच प्रकार आता करोना लॉकडाऊन उघडल्यावर ‘रुही’च्या निमित्ताने बॉलीवूडमध्ये घडल...

 


मुंबई :

रुहाना सफर सुरू झाला की, जिंदगी फँटॅस्टिक होतेच ना? तसाच प्रकार आता करोना लॉकडाऊन उघडल्यावर ‘रुही’च्या निमित्ताने बॉलीवूडमध्ये घडला आहे. होय, फ़क़्त ३० कोटीमध्ये बनलेला हा सिनेमा अनेकांच्या काळजाचा ठाव घेण्यात आणि मनोरंजन करण्यात यशस्वी झाल्याने निर्मात्यांना आणि दिग्दर्शक-कलाकारांचाही रुहाना सफर सुरू झाला आहे.

आता करोनाचा लॉकडाऊन नावाचा भयंकर प्रकार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मानगुटीवर आहेच की. अशावेळी यातून आपण भीत किंवा हसत जसा मार्ग काढतो. तसाच प्रकार रुही सिनेमा पाहतानाही प्रेक्षकांना अनुभवास येतो. हा सिनेमा प्रेक्षकांना हसवेल आणि तितकाच घाबरवेलसुद्धा. त्यामुळे जास्त अपेक्षा न ठेवता मात्र, मनोरंजन करून घेण्याच्या उद्देशाने या सिनेमासाठी चित्रपटगृहाचा उंबरा ओलांडण्याची तसदी घ्यायला हरकत नाही.

पडद्यावर घडणाऱ्या रंजक भयपटाचा आस्वाद घेण्याची इच्छा असेल तर आजच तिकीट काढून हा सिनेमा पाहायला अजिबात हरकत नाही. ही कथा एका छोट्या गावात राहणाऱ्या दोन तरुणांची आहे. त्यामुळे यावर खर्चही तसा बेताचाच झाला आहे. त्या दोघांच्या आयुष्यात एक तरुणी येते आणि मग कथा पुढे सरतके. भूरा पांडे (राजकुमार राव) आणि कट्टानी कुरैशी (वरुण शर्मा) यांच्या बाजूने कथा सुरू होते. पुढे विचित्र परिस्थितीत ते दोघेही रूहीला (जान्हवी कपूर) भेटतात. मग कथापट खऱ्या अर्थाने सुरू होऊन रुहीच्या भोवतीच ते दोघेही अडकून पडतात.

यात हॉरर कॉमेडी हा जॉनर दिग्दर्शक हार्दिक मेहता यांनी कुशल पद्धतीने हाताळला आहे. राजकुमार राव, जान्हवी कपूर आणि वरुण शर्मा या तिन्ही मुख्य कलाकारांनी मस्त भूमिका साकारल्या आहेत. रूही आणि अफजा ही दोन्ही पात्र जान्हवी कपूर हिने उत्तम चितारली आहेत. डबल रोल करताना जान्हवीने आपण कसलेले कलाकर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

‘रूही’ या चित्रपटाने सध्याच्या करोनामय वातावरणात गल्ला भरण्यास सुरुवात केली आहे. समीक्षकांच्या टीकेला बाजूला सारून बॉक्स ऑफिसवर याचा रुहाना सफर चालू आहे.  चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३.०६ कोटींची कमाई केली आहे. अनेक समीक्षकांनी सिनेमाला २.५ किंवा ३ स्टार रेटिंग दिलेले आहेत. मात्र, त्याचा काहीही परिणाम प्रेक्षकांवर झालेला नाही.

बॉलीवूड ट्रेड पंडित आणि चित्रपटगृह मालकांना या चित्रपटाकडून अपेक्षा आहेत. शनिवार व रविवारपर्यंत तो बॉक्स ऑफिसवर १० कोटींची कमाई सहजपणे करेल असा त्यांचा विश्वास आहे. देशभरातील २२०० हून अधिक पडद्यावर हा प्रदर्शित झाला आहे. तसेच रिलीज होण्याआधीच याचे डिजिटल राइटस ४५ कोटीमध्ये विकण्यात आल्याने या चित्रपटाने निर्मात्यांना मालामाल विकली लॉटरी मिळवून दिली आहे.

यातली रुही हीच ‘अफजा’ आहे का? ती नेमकी ‘भूत’ आहे की ‘मुडीया पेरी’? ती लग्नासाठी नेमकी आतुर का आहे? कथनकात अनोखा प्रेमत्रिकोण नेमका तयार होतो कशामुळे? यातला भूरा हा रुहीच्या आणि कट्टानी हा भूत असलेल्या अफजाच्या प्रेमात नेमका कसा आणि का पडतो? प्रेमाचा गुंता कसा सुटतो? भूराला प्रेम मिळते की नाही? कट्टानीची गोष्ट नेमकी काय आहे? तिच्या प्रेमाचे नेमके काय होते? रूही ही त्या भूतापासून पिच्छा कसा सोडवते का? आणि सोडवत नसल्यास पुढे काय होते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी सिनेमा पहावाच लागेल की..

संपादन : सचिन मोहन चोभे  

पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com

| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज | 

टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala

मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com


COMMENTS

नाव

Blog,11,Bollywood,34,Box Office,4,Celebrity,24,Chitranagari,15,Chitrapat,11,Fashion,27,Feature,33,Festival,4,Gossip,33,Health,21,Hollywood,8,Latest,30,Lifestyle,20,Music,7,Natak,2,OTT Live,9,Photography,3,Relationship,26,Review,8,Short Film,3,Theater,4,Tollywood,1,Trailer,5,Trending,25,Video,16,Web Series,7,You Tuber,5,
ltr
item
Pikcharwala: ‘रुही’ना सफरने केलेय निर्मात्यांना मालामाल; दणक्यात कमाईचा सिलसिला सुरू..!
‘रुही’ना सफरने केलेय निर्मात्यांना मालामाल; दणक्यात कमाईचा सिलसिला सुरू..!
https://1.bp.blogspot.com/-sUK8lpcFTH4/YExznEvoLiI/AAAAAAAAEwM/ng2VTJzhInglwoAnlWvVJ4hlM9OtNRf7QCLcBGAsYHQ/s320/roohi%2Bmovie.jpg
https://1.bp.blogspot.com/-sUK8lpcFTH4/YExznEvoLiI/AAAAAAAAEwM/ng2VTJzhInglwoAnlWvVJ4hlM9OtNRf7QCLcBGAsYHQ/s72-c/roohi%2Bmovie.jpg
Pikcharwala
https://www.pikcharwala.com/2021/03/blog-post_13.html
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/2021/03/blog-post_13.html
true
2767188615897253807
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content