काळ बदलला पण मिर्झापूरची बिना अन सिंहासनची दाभाड्यांची सून पटलावर कायमच..!

  मुंबई असो की मिर्झापूर किंवा गावोगावचे पुढारी व पॉलिटिकल गँगस्टर. यामध्ये असणारे भावनिक, मानसिक आणि कृत्याचे दुवे कायमच असतात. याचाच प्रत्...

 


मुंबई असो की मिर्झापूर किंवा गावोगावचे पुढारी व पॉलिटिकल गँगस्टर. यामध्ये असणारे भावनिक, मानसिक आणि कृत्याचे दुवे कायमच असतात. याचाच प्रत्यय देणाऱ्या दोन कलाकृती आहेत. पहिली आहे मराठी चित्रपट सिंहासन आणि दुसरी आहे आता सुप्रसिद्ध (किंवा कुप्रसिद्ध) असलेली वेबसिरीज मिर्झापूर. यामधील एक घटक एकमेकांना जोडणारा आहे. तो म्हणजे मिर्झापूरची बिना अन सिंहासनची दाभाड्यांची सून.

होय, यातील या दोन्हीही स्त्रिया महत्वाकांक्षी आहेत आणि त्यांचे कौटुंबिक जीवन नको त्या वाटणाऱ्या गोष्टींनी भारलेले आहे. आपण अगोदरच मराठी चित्रपटातील दाभाड्यांच्या सुनेवर बोलूया. महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राच्या एका लेखात लेखक व चित्रपट अभ्यासक प्रसाद नामजोशी यांनी म्हटलेय की, 'सिंहासन'हा चित्रपट कोणत्याही एका पात्राचा नाही. दाभाड्यांच्या सुनेचा तर नाहीच नाही; पण 'सिंहासन'चा पुढचा डाव कधी मांडला गेलाच, तर प्याद्याचा वजीर होण्याची संधी फक्त दाभाड्यांच्या या सुनेलाच असेल. 


होय, त्याचा पुढचा भाग येईल किंवा नाही हे माहित नाही. मात्र, आलाच तर हीच सून कसलेली राजकारणी म्हणून पुढे येऊ शकते. तिच्यात ते सगळे गुण आहेत आणि महत्वाचे म्हणजे सत्तास्थानी जाण्याची तिची तीव्र इच्छा आहे. 'सिंहासन' चित्रपटात अशा पद्धतीने मनाला क्लेशदायक वाटणाऱ्या, तरीही पटणाऱ्या आणि सत्याच्या कदाचित अधिक जवळ जाऊ बघणाऱ्या घटनांमुळे हा सिनेमा मराठीतील सर्वोत्तम चित्रपटाचा यादीत अग्रस्थानी आहे. आताही अनेकांनी मिर्झापूर सिरीजमध्ये कौटुंबिक नात्यामध्ये सून आणि सासरा यांच्यातील संबंध न पटल्याने अमेझॉनच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा आटापिटा केला आहे.

वास्तव हे मनाला पटले तरी, काही गोष्टी बोलायच्या किंवा पडद्यावर दाखवायच्या नसतात अशाही असतात. त्यातलेच प्रकार मिर्झापूरमध्ये आहेत म्हणून काहींच्या नाजूक भावना दुखावलेल्या आहेत. सत्तेच्या खेळ म्हणजे सिंहासनासाठीची धडपड. ती कुठेही सारखी आणि एकसुरी असते. त्यातील भावना आणि खेळ्या एकाच हेतूने असतात. बदल असतो तो अशा घटना घडण्यामध्ये. असाच प्रकार सिंहासन आणि मिर्झापूर या दोन्हींमध्ये दिसतो.

सिंहासनचा दुसरा भाग काही आलेला नाही. परंतु, मिर्झापूर सिरीजचा तिसरा भाग येणार आहे. त्यात अखंडानंदला शह देताना बिना कशी आणि कोणती चाल खेळते हे आपण पाहणार आहोतच की. सासरे आणि सून यांचे संबंध दाखवल्याने भावना दुखावलेल्या काहींना ही वेबसिरीज म्हणजे नसती डोकेदुखी वाटेलही. वाटायलाच हवी. मात्र, हे या समाजातील काही टक्के का होईना वास्तव आहे यावर कोणाचेही दुमत असायचे कारण नाही. महाराष्ट्रात आपण असले अनेक किस्से चवीने चाखतो. हे इथिकल की अनइथिकल हा वादाचा मुद्दा आहेच. मात्र, वास्तव नाही असे तर नाहीच ना..?


'सिंहासन' हा महत्त्वाचा आणि 'मस्ट वॉच' असा चित्रपट आहेच. पत्रकार अरुण साधू यांच्या 'सिंहासन' आणि 'मुंबई दिनांक' या दोन कादंबऱ्यांवरून विजय तेंडुलकरांनी 'सिंहासन' चित्रपटाची पटकथा लिहिली. यातला पत्रकार दिगू टिपणीस जितका महत्वाचा तितकाच दाभाड्यांची सून, दाभाडे, मुख्यमंत्री आणि इतरही छोटे-मोठे पात्रही. 'यू प्लेड अ लव्हली गेम' असे दाभाडे इकडे सांगतात, तर तिकडे मिर्झापूरचा बावजी अर्थात सत्यानंद त्रिपाठी हेही ‘त्रिपाठीयोंकाही बीज गिरेगा’ असे सांगताना दिसतात.

तर, मुद्दा चांगला वाईट याचा काहीही नाही. महिलांना सत्तेच्या सारीपाटावरही आपण समानतेची संधी आणि वागणूक देण्यात खूप मागे असल्याचेच यातून दिसते. मग काळ चाळीस वर्षांपूर्वीचा असो की सध्याचा. सिंहासन आणि मिर्झापूर या दोन्ही कलाकृती राजकारण कालानुरूप कसे बदलते मात्र, त्याची भावना तशीच राहते हे अधोरेखित करतात. बाकी, दोन्ही कलाकृती पहा आणि योग्य तो बोध घ्या. कारण, प्रेक्षक म्हणून तो तुमचा हक्क आहेच की..

संपादन : सचिन मोहन चोभे  

पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com

| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज | 

टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala

मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com

COMMENTS

नाव

Blog,11,Bollywood,34,Box Office,4,Celebrity,24,Chitranagari,15,Chitrapat,11,Fashion,27,Feature,33,Festival,4,Gossip,33,Health,21,Hollywood,8,Latest,30,Lifestyle,20,Music,7,Natak,2,OTT Live,9,Photography,3,Relationship,26,Review,8,Short Film,3,Theater,4,Tollywood,1,Trailer,5,Trending,25,Video,16,Web Series,7,You Tuber,5,
ltr
item
Pikcharwala: काळ बदलला पण मिर्झापूरची बिना अन सिंहासनची दाभाड्यांची सून पटलावर कायमच..!
काळ बदलला पण मिर्झापूरची बिना अन सिंहासनची दाभाड्यांची सून पटलावर कायमच..!
https://1.bp.blogspot.com/-F6nFzRPuYrw/YEopH7Oe8rI/AAAAAAAAEvE/0XB4zouoxn0aGs10OoU4NUDnkrsuBl5NgCLcBGAsYHQ/s320/sinhasan%2Band%2Bmirzapur.jpg
https://1.bp.blogspot.com/-F6nFzRPuYrw/YEopH7Oe8rI/AAAAAAAAEvE/0XB4zouoxn0aGs10OoU4NUDnkrsuBl5NgCLcBGAsYHQ/s72-c/sinhasan%2Band%2Bmirzapur.jpg
Pikcharwala
https://www.pikcharwala.com/2021/03/blog-post_16.html
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/2021/03/blog-post_16.html
true
2767188615897253807
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content