Source : Wikipedia मुंबई : हॉलीवूड सिनेमा म्हणजे काहीतरी अचाट, अद्भुत, अफाट आणि संशोधन करून ठोस वास्तव अधोरेखित करणारी कलाकृती. अशीच या इं...
![]() |
Source : Wikipedia |
मुंबई :
हॉलीवूड सिनेमा म्हणजे काहीतरी अचाट, अद्भुत, अफाट आणि संशोधन करून ठोस वास्तव अधोरेखित करणारी कलाकृती. अशीच या इंडस्ट्रीने आपली ओळख बनवली आहे. तोच हॉलीवूड आता भारतावर लक्ष केंद्रित करीत आहेत. त्यामुळे भारतीय कलाकार, तंत्रज्ञ यांच्यासह स्पॉटवर काम करणाऱ्या छोट्या-मोठ्या मंडळींनाही अच्छे दिन येण्याची शक्यता आहे.
चीन हा आकाराने आणि लोकसंख्येने मोठा देश आहे. या देशाला सध्या हॉलीवूडची चित्रीकरणासाठी पसंती आहे. मात्र, करोना विषाणूच्या संकटाने जगाचे राजकीय आणि आर्थिक धोरण बदलले आहे. चीन हा देश अनेकांना धोकादायक वाटायला लागला आहे. परिणामी भारत या चीनच्या शेजारील बलाढ्य आणि लोकशाही देशाला व्यवसाय आणि आर्थिकदृष्ट्या महत्व येण्यास सुरुवात झालेली आहे. इतर क्षेत्रात जसा भारताचा दबदबा वाढत आहे. तसाच आता हॉलीवूडलाही हा लोकशाही देश आपलासा वाटायला लागला आहे.
भारतात २०१५ मध्ये इंडियन बॉक्स ऑफिसमध्ये हॉलीवूडचा वाटा ८ % होता. २०१९ मध्ये त्यात दणक्यात वाढ होऊन तो वाटा तब्बल २१ % इतका जास्त झाला आहे. २०१८ मध्ये हॉलीवूड सिनेमांनी भारतातून ९२१ कोटी कमावले होते. तर, २०१९ मध्ये तो आकडा वाढून १२२० कोटी झाला. पुढील दोन वर्षांत हा आकडा तब्बल १६०० कोटींपर्यंत जाऊ शकतो, असे अनेकांना वाटत आहे.
अमेरिकेने कोरोना विषाणूच्या प्रसारासाठी चीनला जबाबदार धरले आहे. परिणामी चीन-अमेरिका या फ़क़्त सरकारमध्ये नाही, तर नागरिकांमध्ये तितकी आपुलकी राहिलेली नाही. चीनी प्रेक्षकांनी मग हॉलीवूड चित्रपटांना पाहणे कमी करून इतरत्र तोंड फिरवले आहे. त्यामुळेच सध्या अनेक निर्माते-दिग्दर्शक भारतात चित्रीकरण करण्याचे मनसुबे आखत आहेत.
कोरोनामुळे अमेरिका आणि युरोपात चित्रपटगृह बंद असताना भारतात प्रदर्शित झालेल्या हॉलीवूड चित्रपटांनी दखलपात्र व्यवसाय केल्याचे आकडे पुढे आलेले आहेत. दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांच्या ‘टेनेट’ सिनेमाने १२.४३ कोटी, तर सुपरहीरो चित्रपट ‘वंडर वुमन’ने १५.५४ कोटी रुपये इतके बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.
२०२० च्या सप्टेंबरमध्ये ‘टेनेट’ चित्रपटातील काही दृश्यांचे चित्रीकरण मुंबईत झाले. ब्रीच कँडी रुग्णालय आणि हॉटेल ताजमहाल पॅलेसमध्ये शुटींग झाल्याने चित्रपटाला भारतीय टच मिळाला. तसेच ‘प्रिया’ नावाच्या पात्राला विशेष स्थान देताना अभिनेत्री डिम्पल कपाडिया यांचे नाव प्रमुख पाेस्टरवरही दिसले. या चित्रपटाने महामारीच्या काळात तब्बल २६०० कोटींचा व्यवसाय केला आहे.
भारतीय बाजाराची क्षमता मोठी आहे. मोठी लोकसंख्या म्हणजे मोठा ग्राहक. हेच ओळखून हॉलीवूड आता भारतात व्याप्ती वाढवत आहे. त्याबद्दल माहिती देताना वॉर्नर ब्रदर्स या स्टुडीओने आता भारतात चित्रीकरण आणि भारतीय पार्श्वभूमीवर सिनेमा कथा-पटकथा लेखन करायला प्राधान्य दिले आहे. हा स्टुडिओ वर्षभरात किमान शंभर सिनेमा प्रदर्शित करण्याची क्षमता राखून आहे.
परिणामी आगामी काळात हॉलीवूड चित्रपटात भारतीय कलाकार आणि चित्रीकरणातही वाढ होईल. सध्या या निर्माता-दिग्दर्शक मंडळींना काश्मीर, मुंबई, जयपूर, दिल्ली, कोलकाता, गोवा, मध्यप्रदेश राज्यातील रमणीय ठिकाणे, काही ऐतिहासिक स्थळ असे अनेक पर्याय खुणावत आहेत.
संपादन : सचिन मोहन चोभे
पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com
| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS