Source : Google घरगुती हिंसा ही एक गोष्ट आहे. ज्यामुळे आपली समाजात मान खाली झुकत असते. बहुतेकदा, पालकांमधील भांडणामध्ये मुले भरडले जातात. क...
![]() |
Source : Google |
घरगुती हिंसा ही एक गोष्ट आहे. ज्यामुळे आपली समाजात मान खाली झुकत असते. बहुतेकदा, पालकांमधील भांडणामध्ये मुले भरडले जातात. काही अनुभवांवरून तर त्यांचे आयुष्य धोक्यात आले असल्याचेही जाणवते. ‘पीहू’ ही दोन वर्षांच्या मुलीची कहाणी आहे. जी घरात एकटीच आहे. कारण, तिचे वडील कोलकाता एका महत्वाच्या भेटीसाठी गेले आहेत. तिच्या आईने रागाच्या भरात झोपेच्या गोळ्या घेतल्या आहेत.
पीहूची कहाणी ही आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांशी मिळती जुळती असल्याचे प्रेक्षकांना जाणवते. कौटुंबिक वादात मुलांची हेळसांड होते. एकटी अडकलेली मुलगी आणि तीची होणारी फरपट हे भीतीदायक चित्रण असल्याने ते पाहतानाच अंगावर काटा येतो. अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा भयपट जरूर पाहावा.
पीहू या चित्रपटाचा घटनाक्रम :
पीहूच्या दुसर्याच वाढदिवसाच्या पार्टीनंतर दुसर्याा दिवशी हा सिनेमा सुरू होतो. पीहू सकाळी उठून पाहते की तिची आई, पूजा झोपेतून उठत नाही. तिचे वडील गौरव (राहुल बग्गा, फक्त आवाज) एका परिषदेसाठी कोलकाताला गेले आहेत. तिला भूक लागते आणि आईला उठवायचा प्रयत्न करतो, पण ती काही केल्या उठत नाही.
त्यानंतर कथानकातून हे उघड होते की, गौरवसोबत झालेल्या भांडणानंतर पूजेने आत्महत्या केली आहे. तिचा चेहरा आणि हातावरील जखमा घरगुती हिंसाचार दर्शवितात. बेडरूमच्या आरश्यावर आत्महत्या करत आहे, असा संदेश लिहलेला दिसून येतो. तिने पीहूलाही मारले असते, पण तीचे धाडस झाले नाही. पीहूच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी उशीरा आल्यामुळे पूजा गौरववर नाराज होती; शिवाय तिला तिची मैत्रिण मीराशी त्याचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आला. गौरव पूजाला अनकेदा कॉल करण्याचा प्रयत्न करतो, पण प्रतिसाद मिळत नाही. पीहू फोन उचलण्याचा प्रयत्न करते. मात्र, तेही तिला जमत नाही. गौरव म्हणतो की, त्याने चुकून इस्त्री चालू ठेवली आहे. पीहूचा नजरचुकीने हात लागू शकतो. ही भीती त्याला सतावत आहे. थोड्याच वेळात पीहू बोटे भाजली. तिला भूक लागते. यादरम्यान ती अनेक प्रयत्न करते. पण, तिला ते शक्य होत नाही. या चित्रपटात हे सर्व चित्रण अगदी अंगावर शहारे आणते.
ती गिझर (वॉटर हीटर) चालू करते. गिझरचा स्पोट होतो. पीहूची बाहुली बाल्कनीतून खाली पडते. पडलेली बाहुली मिळवण्याच्या प्रयत्नात ती बाल्कनीच्या रेलिंगवर चढते. अपार्टमेंटमधील इतर भाडेकरूंना तर मोठा धक्का बसतो. सुदैवाने, एका महिलेने पीहूला धोकादायकपणे लटकलेले पाहिले आणि खाली उतरण्यास भाग पाडले. दरम्यान अनेकदा वीज येते जाते. पिहुने चालू केलेल्या नळाचे पाणी फ्लॅटच्या दरवाजाच्या बाहेर येते. शेजारीच्या ते निर्दशनास येते. परंतु मालक सुट्टीवर आहेत, असे त्यांना वाटते.
गौरव कोलकातामधून पुष्कळ वेळा फोन करतो, अगदी पीहूकरवी पूजाची फोनहून माफी मागण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा पीहू त्याला सांगते की, पूजा दिवसभर झोपली आहे. मग गौरव ताबडतोब कोलकातासोडून घराकडे येण्यासाठी निघतो. त्याला वाईट घटना घडल्याची शंका येते. पूजाने झोपाच्या अतिरिक्त गोळ्या खावून स्वतःला संपविलेले असते. तर पीहू तिच्या खेळण्यासोबत खाटेखाली खेळत असते.
रात्रीच्या वेळी घरातून धूर बाहेर पडताना दिसतो. गौरव परत येतो. संपूर्ण अपार्टमेंट गोंधळून गेलेला असतो. गौरव हा पत्नीच्या जाण्यामुळे दुखी होतो. पीहूला पाहून थोडा सुखावतो. आपल्या चुकीचा पश्चाताप करतो. असा थरारक शेवट होतो.
चित्रपटातील पात्रे साकारणारे अभिनेते आणि इतर टीम
दिग्दर्शन - विनोद कापरी यांनी
निर्माते - रॉनी स्क्रूवाला, सिद्धार्थ रॉय कपूर, शिल्पा जिंदाल
लेखन - विनोद कापरी
पीहू -मायरा विश्वकर्मा
पूजा - प्रेरणा धर्म
संगीत- विशाल खुराना
छायांकन - योगेश जैनी
सन २०१८ मध्ये निर्माण झालेल्या या चित्रपटाचे एकूण आर्थिक बजेट हे ५० लाखांचे होते. तर या सिनेमाने बाजारात अडीच कोटींहून अधिक उलाढाल केली. या सिनेमाला आंतरराष्ट्रीय फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त आहे. तसेच १४ व्या ट्रान्स-सहारन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वाधिक लोकांच्या पसंतीस उतरलेला सिनेमा म्हणून गौरविण्यात आला आहे.
संपादन : महादेव गवळी
COMMENTS