करोना झाला शिरजोर, पालकांनी केलाय कहर; पहा मुलींवर कसा झालाय परिणाम

  युनिसेफ आणि न्युयॉर्क टाईम्स यांचे नाव ऐकलेय ना? होय, जगभरात दखलपात्र असलेल्या या दोन महत्वाच्या संस्था आहेत. एक आहे विकासात्मक कामासाठी, ...

 


युनिसेफ आणि न्युयॉर्क टाईम्स यांचे नाव ऐकलेय ना? होय, जगभरात दखलपात्र असलेल्या या दोन महत्वाच्या संस्था आहेत. एक आहे विकासात्मक कामासाठी, तर दुसरी माध्यम क्षेत्रातील दिग्गज कंपनी. याच न्युयॉर्क टाईम्समध्ये युनिसेफ संस्थेचा अहवाल प्रसिद्ध झालाय. त्यातून स्पष्ट होत आहे मुलींवर आलेले आणखी एक संकट.

कोविडमुळे अनेक भागात आणि कुटुंबांमध्ये आर्थिक व सामाजिक स्थिती खराब झाल्याचे दिसते. यामध्ये सकारात्मक बदलासाठी फ़क़्त शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे. शिक्षणामुळेच यात सुधारणा होऊ शकतात असे रिपोर्टमध्ये स्पष्ट म्हटले आहे. युनिसेफच्या वरिष्ठ सल्लागार नन्कली मकसूद यांनी याबाबत म्हटले आहे की, कोरोना महामारीने मुलींची स्थिती आणखीनच वाईट केली आहे. त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी जगभरातील देशांना तत्काळ आवश्यक ती पावले टाकायला लागतील. कॉलेज किंवा शाळा सुरू करून यावर तोडगा काढावाच लागेल. प्रशासानाने आणखी प्रभावी कायदे आणि धोरण तयार करून तसेच ज्यांना आवश्यकता आहे अशा कुटुंबांना सामाजिक सुरक्षा देऊन आपण बालविवाह रोखू शकतो.

युनिसेफ इंडियाच्या प्रतिनिधी यास्मीन अली हक यांनी म्हटलेय की, भारतात बालविवाह रोखण्यासाठी मुलींचे शिक्षण आणि नाेकरीच्या संधी यासाठी ठोस कार्य करावे लागेल. तसेच बालविवाह रोखण्यासाठी आपल्याला गरीब कुटुंबांवर विशेष लक्ष द्यावे लागेल. विकासशील देशांत १५ ते १९ वर्षांच्या मुलींमध्ये गर्भावस्थेतील समस्या आणि प्रसव हे दोन मुद्दे त्यांचा लवकर मृत्यू होण्याचे प्रमुख कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून हे वेळोवेळी स्पष्ट झालेले आहे. 


रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, मुलांचे लवकर लग्न करणे आणि युवावस्थेत होणारा मृत्यू यांच्यात थेट संबंध आहे. बालवधूंमध्ये मुलांमध्ये शिशू मृत्युदरही जास्त असतो. करोना महामारी यामुळेही बालविवाह वाढले आहेत. चालू दशक संपण्याच्या आधीच १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचे एक कोटी अतिरिक्त बालविवाह होऊ शकतात, असेही त्यात स्पष्ट म्हटले आहे.

‘कोविड-१९ : ए थ्रेट टू प्रोग्रेस अगेन्स्ट चाइल्ड मॅरेज’ असे या अहवालाचे नाव आहे. हा अहवाल आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. जगभरात आजपर्यंत जिवंत असलेल्या ६५ कोटी मुली आणि महिलांचा विवाह हा बालपणीच झालेला आहे. यातही विशेष म्हणजे अर्धी संख्या बांगलादेश, ब्राझील, इथिअोपिया, भारत आणि नायजेरिया या पाच देशांमध्ये आहे. दुर्दैवाने भारत यामध्ये पहिल्या पाचमध्ये आहे.

 जगातील तीनपैकी एक बालिका वधू भारतात आहेत. आपल्या शेजारील नेपाल देश या दर्दैवाच्या फेऱ्यात सर्वाधिक अडकला आहे. नेपाळमध्ये उपजीविकेचे प्रमुख साधन पर्यटन आणि त्यावरील रोजगार हेच आहे. कोराेना साथीच्या आजारामुळे पर्यटन व्यवसायाचे सर्वाधिक नुकसान झालेले आहेकरोना महामारीमुळे बेरोजगारी वाढली आहे. आणि त्यामुळे नेपाली तरुण सध्या डोंगरदऱ्यांतील आपल्या गावातच आहेत. यामुळे त्यांच्यासाठी जीवनात पुढे जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे लग्न करणे हाच झाला आहे.

नेपाळबद्दल बोलायचे झाल्यास तेथे लग्नाचे कायदेशीर वय २० वर्षे आहे. मात्र, तेथे स्थिती चिंताजनक असल्याचे युनिसेफच्या अहवालातून स्पष्ट दिसते. जगात बालविवाह वेगाने वाढत जाण्याचा धोका अनेक सामाजिक आरोग्य आणि आर्थिक प्रश्न भविष्यात निर्माण करू शकतो असे तज्ञांना वाटत आहे. करोना विषाणूमुळे हा आणखी एक गंभीर मुद्दा जगासमोर आलेला आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे  

पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com

| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज | 

टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala

मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com

COMMENTS

नाव

Blog,11,Bollywood,34,Box Office,4,Celebrity,24,Chitranagari,15,Chitrapat,11,Fashion,27,Feature,33,Festival,4,Gossip,33,Health,21,Hollywood,8,Latest,30,Lifestyle,20,Music,7,Natak,2,OTT Live,9,Photography,3,Relationship,26,Review,8,Short Film,3,Theater,4,Tollywood,1,Trailer,5,Trending,25,Video,16,Web Series,7,You Tuber,5,
ltr
item
Pikcharwala: करोना झाला शिरजोर, पालकांनी केलाय कहर; पहा मुलींवर कसा झालाय परिणाम
करोना झाला शिरजोर, पालकांनी केलाय कहर; पहा मुलींवर कसा झालाय परिणाम
https://1.bp.blogspot.com/-8mQNYrc_5M4/YEnvr-jH5FI/AAAAAAAAEug/1AiJ4xX2h9Ug4ztrFKLVkyXdkxJT_yxZgCLcBGAsYHQ/s320/child%2Bmarriage%2Bislam.jpg
https://1.bp.blogspot.com/-8mQNYrc_5M4/YEnvr-jH5FI/AAAAAAAAEug/1AiJ4xX2h9Ug4ztrFKLVkyXdkxJT_yxZgCLcBGAsYHQ/s72-c/child%2Bmarriage%2Bislam.jpg
Pikcharwala
https://www.pikcharwala.com/2021/03/blog-post_31.html
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/2021/03/blog-post_31.html
true
2767188615897253807
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content