मुंबई : धर्म ही भावना अनेकदा जीवनावश्यक समजली जाते. परिणामी चुकीच्या वाटणाऱ्या किंवा अडचणीच्या वाटणाऱ्या प्रथा आणि परंपरा हाही धर्माचा भाग...
मुंबई :
धर्म ही भावना अनेकदा जीवनावश्यक समजली जाते. परिणामी चुकीच्या वाटणाऱ्या किंवा अडचणीच्या वाटणाऱ्या प्रथा आणि परंपरा हाही धर्माचा भाग म्हणूनच मानल्या जातात. धर्म हा विचार कमी आणि आचार जास्त वाटत असल्याने याला कर्मठता प्राप्त होते. मग अशावेळी त्यावर काहीही बोलले तरी अनेकांच्या नाजूक भावना दुखावतात आणि सेलिब्रिटी अडचणीत येतात.
होय, आताही नाही का मिर्झापूर या वेबसिरीजमध्ये सासरे आणि सून यांच्यातील नाजूक संबंध हा भावना दुखण्यासह गुन्हे दाखल करण्याचा मुद्दा बनला आहे. आज आपण असेच काही प्रकरण पाहणार आहोत, ज्यात कलाकारांनी एखाद्या धार्मिक गोष्टीबाबत भूमिका घेतल्यावर त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती.
महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिव यांचा फोटो शेअर करू नका असा सल्ला देऊन सोनू सूद हे ट्रोल झाले आहेत. सोनूने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, भगवान शंकरांचा फोटो पुढे ठेवता, एखाद्याची मदत करून महाशिवरात्री साजरी करा.
असे आवाहन करून एखाद्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीवर धार्मिकदृष्ट्या टोकाची टीका सहन करण्याचा हा काही प्रथम प्रकार नाही. सामाजिक सेवेसाठी आवाहन करूनही सूद यांच्यावर अनेकांनी सूड उगवल्यागत भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. एकूणच लोकांच्या धार्मिक भावना या विचार कमी आणि दिखाऊ कृतीला जास्त महत्व देत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे.
एका ट्विटमध्ये अजानबद्दल निषेध करतांना सोनू निगम अचानक चर्चेत आला होता. त्याने लिहिले होते की, ‘लाऊडस्पीकर दिलेली आजन झोप खराब करते. मुळात याची आवश्यकता आहे का? ही धार्मिक कट्टरता का सहन करावी? असे करणे म्हणजे सरासरी गुंडगिरी.’ या वादानंतर बर्याीपैकी गोंधळ उडाला होता.
रवीना टंडन, फराह खान आणि भारती सिंग यांच्यावर ख्रिश्चन समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल दूरदर्शनवरील कार्यक्रमांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 'हालेलुया' हा शब्द उच्चारण्याचा प्रयत्न करताना या तार्यांंनी त्यांची खिल्ली उडवल्याचा आरोप आहे. 'हालेलुया' हा एक इब्री शब्द आहे जो देवासाठी वापरला जातो.
अक्षय कुमारने आपल्या ओएमजी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान म्हटले होते की, लोक देवाच्या नावाने दूध आणि तेल वाया घालवतात. जर देवासाठी काहीतरी केले तर गरजू लोकांना मदत करणे चांगले. देवाला दूध हवे आहे असे कुठे लिहिले आहे? यानंतर अक्षयला खूप ट्रोल केले गेले होते.
दिवंगत इरफान खान यानेही एकदा बकरी ईद निमित्ताने बलिदानावर आपले मत व्यक्त केले होते. ते म्हणाले होते की, 'सर्व चालीरिती आणि सण, आम्ही त्यांचा खरा अर्थ विसरलो आहोत, आम्ही त्यांना एक तमाशा बनविला आहे. कुरबानी हा एक महत्त्वाचा सण आहे. कुरबानी म्हणजे त्याग करणे. दुसर्यााच्या जीवाचे बलिदान देऊन आपण आणि मी काय बलिदान देत आहोत? ' त्याच्या वक्तव्यानंतर तो खूप ट्रोल झाला होता.
संपादन : सचिन मोहन चोभे
पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com
| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS