फ़क़्त ऋतिक नाही, तर त्याची ‘ही’ मैत्रीणही येतेय ओटीटीवर; भन्नाट प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता

  मुंबई : सध्याचा जमाना हा मोबाईल इंटरटेनमेंटचा आहे. सिनेमचा मोठा पडदा आणि भव्यदिव्य स्क्रीनऐवजी मोबाईलच्या आठ-दहा इंचाच्या स्क्रीनवर सिनेमा...

 


मुंबई :

सध्याचा जमाना हा मोबाईल इंटरटेनमेंटचा आहे. सिनेमचा मोठा पडदा आणि भव्यदिव्य स्क्रीनऐवजी मोबाईलच्या आठ-दहा इंचाच्या स्क्रीनवर सिनेमा, वेबसिरीज आणि व्हिडिओ पाहण्याचा हा काळ आहे. अशावेळी अनेक दिग्गज कलाकार आणि निर्माते-दिग्दर्शक आता ओटीटीवरचे प्रोजेक्ट घेऊन येत आहेत. त्यात आता भर पडत आहे ती ऋतिक रोशन याचीही.

अभिनेता हृतिक रोशनचे चाहते ही बातमी नक्कीच आवडीने क्लिक करून वाचतील. कारण त्यांचा आवडता अभिनेता सिनेमानंतर आता ओटीटीवर आपली छाप सोडण्यासही तयार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फ़क़्त ऋतिक नाही तर, अभिनेत्री प्रीती झिंटा हिनेही आपल्या डिजिटल ओटीटी प्रवासाला सुरुवात करण्याची तयारी केली आहे. तिने ओटीटी प्रोजेक्टची निर्मिती करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानुसार प्रीती झिंटा हृतिकसह ओटीटीवर दिसणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे की हृतिक रोशन ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'द नाईट मॅनेजर' या वेब सिरीजचा रिमेक घेऊन पदार्पण करणार आहे. ही मालिका वर्ष 1993 मध्ये जॉन ले कॅरे यांच्या त्याच शीर्षकाच्या कादंबरीवर आधारित आहे. 2016 मध्ये याची सहा एपिसोडची वेब सीरिज रिलीज करण्यात आली असून यात टॉम हिडलस्टन, ह्यू लोरी, ऑलिव्हिया कोलमन, डेव्हिड हेअरवुड, टॉम हॉलंडर आणि एलिझाबेथ डेबीकी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. 'द नाईट मॅनेजर' या वेब सिरीजने वेगवेगळ्या फेस्टीव्हलमध्ये तब्बल 36 पुरस्कारांसाठी नामांकन मिळवले आणि त्यापैकी 11 खिशात घटले आहेत.

हृतिक रोशनला यातील भूमिका आव्हानात्मक वाटल्याने त्याने लगेचच त्यास होकार दिला आहे. तर, प्रीती झिंटा आधीपासूनच या प्रोजेक्टशी संलग्न आहे. म्हणून तिला वाटले की या भूमिकेत तिचा जुना मित्र हृतिक हाच उत्तम आहे.

हृतिक रोशनला 'द नाईट मॅनेजर' या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारण्यासाठीची संधी आहे. आनंद कुमारच्या व्यक्तिरेखेत हृतिकने 'सुपर 30' चित्रपटात ज्या प्रकारचे सादरीकरण केले आहे, त्याला या वेब सीरिजमध्ये अशाच प्रकारच्या बहुमुखीपणाची आवश्यकता असेल असे समजते. हृतिकला वाटले आहे की, जेव्हा तो परिपक्व अभिनेता बनून इतरत्र पदार्पण करणार आहे, तेव्हा त्यासाठी आणखी एक आव्हानात्मक काम का करू नये?

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ऋतिकने एक फोटो शेअर करून पुन्हा शूटिंगसाठी पोहोचल्याचे संकेत दिले आहेत. तथापि, तो नेमका कशासाठी शूटिंग करतोय याचा उल्लेख त्यांनी केला नव्हता. अर्थात आतापर्यंत त्याच्या कुठल्याही प्रोजेक्टची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण प्रीती झिंटाने तो ही वेब सीरिज करू शकेल असा अंदाज वर्तविला जात आहे. यापूर्वी हृतिक आणि प्रीती हे दोघेही 'कोई ... मिल गया' चित्रपटात एकत्र दिसले आहेत. यानंतर त्यांनी एकत्र कोणतेही चित्रपट केले नाहीत.

त्या चित्रपटातील दोघांचीही भूमिका आणि अभिनय अनेकांना भावाला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा एकत्र येऊन प्रेक्षकांना काहीतरी भन्नाट देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे  

पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com

| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज | 

टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala

मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com


COMMENTS

नाव

Blog,11,Bollywood,34,Box Office,4,Celebrity,24,Chitranagari,15,Chitrapat,11,Fashion,27,Feature,33,Festival,4,Gossip,33,Health,21,Hollywood,8,Latest,30,Lifestyle,20,Music,7,Natak,2,OTT Live,9,Photography,3,Relationship,26,Review,8,Short Film,3,Theater,4,Tollywood,1,Trailer,5,Trending,25,Video,16,Web Series,7,You Tuber,5,
ltr
item
Pikcharwala: फ़क़्त ऋतिक नाही, तर त्याची ‘ही’ मैत्रीणही येतेय ओटीटीवर; भन्नाट प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता
फ़क़्त ऋतिक नाही, तर त्याची ‘ही’ मैत्रीणही येतेय ओटीटीवर; भन्नाट प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता
https://1.bp.blogspot.com/-zYsyJBLjcOc/YEzG4B_A9nI/AAAAAAAAEw0/ueoijrnD4zggI_ogj78Es2dP3r6ELiudACLcBGAsYHQ/s320/Hrithik%2Broshan.jpg
https://1.bp.blogspot.com/-zYsyJBLjcOc/YEzG4B_A9nI/AAAAAAAAEw0/ueoijrnD4zggI_ogj78Es2dP3r6ELiudACLcBGAsYHQ/s72-c/Hrithik%2Broshan.jpg
Pikcharwala
https://www.pikcharwala.com/2021/03/blog-post_76.html
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/2021/03/blog-post_76.html
true
2767188615897253807
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content