Source : MyThirtySpot बेसन पीठ आपण चेहऱ्यावर लावतो की नाही. चेहऱ्यावर हे पीठ लावणे जसे फायदेशीर आहे. तसेच केसांसाठी याचा वापर खूप महत्वाचा...
![]() |
Source : MyThirtySpot |
बेसन पीठ आपण चेहऱ्यावर लावतो की नाही. चेहऱ्यावर हे पीठ लावणे जसे फायदेशीर आहे. तसेच केसांसाठी याचा वापर खूप महत्वाचा आहे. बेसन पीठाने चेहऱ्याचा चमकदारपणा वाढतो हे बहुतेक लोकांना माहित आहे. परंतु फारच कमी लोकांना माहिती आहे की बेसन पीठ जे त्वचेला ओलावा देते तसेच ते केसही काळेसर बनवते. बेसन पीठ हे केसाला लावल्याने केस मऊ व सुळसुळीत होतात. तसेच पिकलेल्या केसांचे प्रमाणदेखील कमी होते. त्यामुळे बेसन पीठ हे केसासाठी पण उत्तम मानले जाते. आपल्याला जसा आपला चेहरा सुंदर असावा वाटतो. तसे केस पण पाहिजे असतात. त्यासाठी बेसन पीठ हे उत्तम मानले जाते.
बेसन पिठाबद्दलची ही चर्चा ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. बेसन पीठ हे प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असते. आम्ही आपल्या आश्चर्यचे कारण समजू शकतो. परंतु आपण फक्त असे म्हणू शकता की आपण विश्वास ठेवून आणि येथे नमूद केलेली पद्धत आणि टिप्स वापरुन पाहू. यामुळे आपल्या केसांशी संबंधित बर्याठच समस्या दूर होतील आणि आपले केस काळे होण्याचे स्वप्न देखील पूर्ण होईल. तुमचे केस फक्त काळेच नाही होणार तर त्यांची गळतीचे प्रमाण पण नक्कीच कमी होईल.
बेसन पिठाचा लेप केसाला लावल्याने केसांच्या बर्या च समस्या कमी होतात. फक्त बेसन हेअर लेप 2 ते 3 वेळा लावल्यास तुम्हाला खूप आराम मिळेल. उन्हाळ्याच्या काळात केसांची समस्या दूर करण्यासाठी बेसन पीठ हे आपल्याला खूप प्रभावी असे आहे. उन्हाळ्यात केस गळण्याचे प्रमाण खूप वाढते. त्यासाठी आपण आठवड्यातून २ ते ३ वेळा हा लेप आपल्या केसांना लावावा. त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल. बेसनपिठाचा लेप लावल्याने तुमच्या केसांची गळती कमी होईल.त्याचप्रमाणे पांढरे केस देखील कमी होतील.
बेसन पीठ लावण्याचे परिणाम :
१. केस गळणे थांबते
२. केसांची पातळपणा कमी होऊन जाडसर होतात
३. डोक्यातील खाज कमी होते
४. केसांचा नैसर्गिक रंग परत येतो
बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
१. कप बेसन पीठ
२. व्हिटॅमिन-ई कॅप्सूल २
३. कोरफड जेल २ चमचे
४. मोहरीचे तेल एक चमचा
५. एक-दीड कप पाणी
या सर्व गोष्टी मिसळा आणि केसांचा लेप तयार करा आणि केसांना ३० ते ४० मिनिटांसाठी लावा. केस चांगले सुकू द्या व शैम्पूने धुवून ते नंतर गोड्या पाण्याने केस नैसर्गिकरित्या सुकून द्या. आपण या केसांचा लेप आठवड्यातून २ ते ३वेळा वापरू शकता. यासाठी लागणारे सर्व साहित्य जवळपास आपल्या घरातच उपलब्ध असेल. त्यामुळे तुम्हाला कुठ बाहेर जावा लागणार नाही. अशापद्धतीनेतुमच्या केसांना तुम्ही घरबसल्या सुंदर बनवू शकता. त्यासाठी फक्त यामध्ये दिलेली कृती करून पहा.
उन्हाळ्याच्या काळात घाम येणे आणि खाज सुटणे ही समस्या केसांमध्ये सामान्य आहे. जास्त घाम आल्याने केस रठ होतात. डोक जड-जड होते. घामामुळे केसांमध्ये सतत ओलावा असतो. ज्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस जलद गळतात. अशावेळी आपण कसलेही तेल वापरतो आणि त्यामुळे तुमचे केस जास्तच गळतात. म्हणून हा एक घरगुती उपाय एकदा करून पहा.
उन्हाळ्याच्या काळात काही लोकांच्या डोक्याच्या त्वचेत जास्त तेलकटपणा असतो. यामुळे केस चिकट बनतात. आणि म्हणूनच या कारणामुळे डोक्यात कोंडा देखील होतो. कोंडयाने केस अजून चिकट होतात. काहींच्या केसाला उन्हाळ्यात फाटे देखील फुटतात. त्यामुळे केसांची वाढ खुंटली जाते. केस वाढण्याचे प्रमाण थांबते. जर आपल्याला यापैकी कोणतीही समस्या असेल, तर आठवड्यातून एकदा तरी आपण बेसनपिठाचा लेप करून केसांना लावावा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.
वास्तविक, बेसन पीठ आपल्या केसांच्या मुळांवर जादू केल्यासारखे कार्य करते. तुम्ही तर ऐकूण असाल बेसन पीठाचे फायदे खूप आहेत. हे केसांच्या मुळांना सामर्थ्य देते आणि त्याद्वारे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. केसांवर बेसन पीठ लावल्यास आपले केस लवकर वाढतात आणि मुळे मजबूत करण्यास मदत होते. तसेच केस गळणे देखील कमी होते आणि चमकदार पणा वाढतो. आपल्या केसांवर बेसन पीठ लावण्याची पद्धत आणि त्याचे फायदे याबद्दल आम्ही येथे माहिती घेऊन आलो आहोत. ती एकदा नक्कीच करून पहा तुम्हाला नक्कीच त्याचा लाभ होईल...
संपादन : रुपाली दळवी
पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com
| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS