मेगन मर्केलबद्दल आहे का ‘ही’ माहिती; एकाच मुलाखतीने ब्रिटेन राजदरबार हलवलाय त्यांनी

 लंडन : एखादी साधी घटना अनेकदा मोठे वादळ निर्माण करू शकते. फ़क़्त अशी साधी वाटणारी गोष्ट जगजाहीर व्हायला पाहिजे इतकेच. असाच प्रकार सध्या हॉलीव...


 लंडन :

एखादी साधी घटना अनेकदा मोठे वादळ निर्माण करू शकते. फ़क़्त अशी साधी वाटणारी गोष्ट जगजाहीर व्हायला पाहिजे इतकेच. असाच प्रकार सध्या हॉलीवूडच्या इंडस्ट्रीत मेगन मर्केल यांच्यामुळे घडला आहे. त्याला निमित्त ठरले आहे ते फ़क़्त एका मुलाखतीमधील एका वाक्याचे. 

ब्रिटीश राजघराणे सतत चर्चेत असते. मात्र, खूप कमी घटना या राजघराण्याला धक्का देण्यासारख्या असतात. अशीच घटना सध्या ट्रेंडमध्ये आहे. क्वीन एलिझाबेथचा नातू प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मर्केल यांनी ओप्रा विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीत राजघराण्यावर गंभीर आरोप केले आहेत. या मुलाखतीत मेगन यांनी बकिंघम पॅलेसवर वर्णद्वेषाचा आरोप केला आहे. 

त्यांनी म्हटले आहे की, राजघराण्यातील वास्तव्याच्या वेळी, तिला आत्महत्येचा अनुभव येऊ लागला होता. राजघराण्याला त्यांचा मुलगा आर्ची याच्या रंगाविषयी चिंता होती. या दोन वाक्यांमुळे सध्या मर्केल चर्चेत आहे. त्यामुळे मेगन मार्केलची ब्रिटीश राजघराणे सोडून नेमकी काय ओळख आहे का असा प्रश्न अनेकांना पडतो आहे. तर याचे उत्तर होय आहे. 

मेगन एक प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री आहे. मेगनचा जन्म 4 ऑगस्ट 1981 रोजी झाला होता. तिची आई समाजसेवी आणि योगशिक्षक, तर तिचे वडील एम्मी पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक आहेत. जेव्हा मेगन सहा वर्षांची होती तेव्हा तिचे आई-वडील विभक्त झाले. शिकत असताना मेगनने तिच्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली.

अभिनेत्री म्हणून मेगनला ‘रेचेल जेन’ म्हणूनच अधिक ओळखले जाते. मेगन ही अमेरिकन ड्रामा सूटच्या सात हंगामात दिसली आहे. मेम्बर मी, हॉरिबल बॉसेस, वैन स्पार्क्स फ्लाई, रैंडम एनकाउंटर्स अशा अनेक चित्रपटांमध्ये ती दिसली आहे. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात मेगनला खूप संघर्ष करावा लागला होता. मेगन म्हणते की, सिनेमात ती गोऱ्या नायिकेच्या भूमिकेसाठी किंवा अमेरिकन रोलसाठी फिट्ट बसत नव्हती. एक वेळ असा होता जेव्हा मेगन हिने घराचे भाडे देण्यासाठी टायपिंगचेही काम केले होते.

आपला मुद्दा खुलके जगासमोर मांडणारी महिला म्हणूनही मेगनची ओळखली आहे. मेगन यांनी 1992 च्या दंगली व पोलिसांच्या तोडफोडीबद्दल मोकळेपणाने भाष्य केले होते. त्यानंतर तिची सर्वत्र चर्चा होऊ लागली होती. मेगन म्हणते की, तिला फक्त तिच्या पतीच्या पैशावर प्रेम करणारी स्त्री बनण्याची इच्छा नाही. स्वत:ची कमाई करुन स्वत:चे कुटुंब चालवणारी स्त्री बनण्याची तिची इच्छा आहे.

प्रिन्स हॅरी हा मेगनचा पहिला नवरा नाही. यापूर्वी मेगनचे निर्माता ट्रॅव्हर एंजेलसनशी लग्न झाले होते. तथापि, त्यांचे लग्न केवळ दोन वर्षे टिकले. 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर, प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांनी 2018 मध्ये ‘रॉयल स्टाईल’मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर मेगनला अशा नियमांमध्ये बांधले गेले होते की, राजघराण्याच्या परवानगीशिवाय तिला कोठेही जाता येणार नाही.

त्यामुळे जानेवारी 2020 मध्ये मेगन आणि हॅरीने राणी एलिझाबेथकडे त्यांचे रॉयल सदस्यत्व परत केले. राजघराण्यापासून विभक्त झाल्यानंतरही या जोडप्याने म्हटले होते की, त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचे आहे. ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्सच्या घोषणेमुळे ब्रिटीश रॉयल फॅमिली आश्चर्यचकित झाली होती.

आता तिच्या मुलाखतीमुळे मेगन केंद्रस्थानी आहे. या मुलाखतीपासून मेगन मार्केलची तुलना प्रिन्सेस डायनाशी केली जात आहे. विशेष म्हणजे प्रिन्स हॅरी हा राजकुमारी डायनाचा मुलगा आहे. हॅरी आणि मेगन यांनी या मुलाखतीत सांगितले होते की, हॅरी यांना राजघराण्यातील एका सदस्याने त्यांच्या मुलाचा रंग किती काळा असू शकतो असे विचारले होते.

दुसरीकडे बकिंघम पॅलेसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रंगभेदाचा मुद्दा चिंताजनक आहे. त्यास फार गांभीर्याने घेतले गेले आहे आणि शाही कुटुंब ते खाजगीरित्या सोडवेल. हॅरी, मर्केल आणि आर्ची नेहमीच कुटुंबातील खूप प्रेमळ सदस्य असतील.

संपादन : सचिन मोहन चोभे  

पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com

| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज | 

टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala

मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com


COMMENTS

नाव

Blog,11,Bollywood,34,Box Office,4,Celebrity,24,Chitranagari,15,Chitrapat,11,Fashion,27,Feature,33,Festival,4,Gossip,33,Health,21,Hollywood,8,Latest,30,Lifestyle,20,Music,7,Natak,2,OTT Live,9,Photography,3,Relationship,26,Review,8,Short Film,3,Theater,4,Tollywood,1,Trailer,5,Trending,25,Video,16,Web Series,7,You Tuber,5,
ltr
item
Pikcharwala: मेगन मर्केलबद्दल आहे का ‘ही’ माहिती; एकाच मुलाखतीने ब्रिटेन राजदरबार हलवलाय त्यांनी
मेगन मर्केलबद्दल आहे का ‘ही’ माहिती; एकाच मुलाखतीने ब्रिटेन राजदरबार हलवलाय त्यांनी
https://1.bp.blogspot.com/-9u08ZGlajpk/YEyMG_wDqZI/AAAAAAAAEwg/5WT4HFJT-W4_x_8jJjjHs1mzKrsdNqAqwCLcBGAsYHQ/s320/meghan-and-harry.jpg
https://1.bp.blogspot.com/-9u08ZGlajpk/YEyMG_wDqZI/AAAAAAAAEwg/5WT4HFJT-W4_x_8jJjjHs1mzKrsdNqAqwCLcBGAsYHQ/s72-c/meghan-and-harry.jpg
Pikcharwala
https://www.pikcharwala.com/2021/03/blog-post_85.html
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/2021/03/blog-post_85.html
true
2767188615897253807
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content