‘गाव गाता गजाली’ म्हणजे अस्सल कोकणी मनोरंजनाचा ठसका..!

  कोकणाचं आणि उर्वरित महाराष्ट्रातील माणसाचं एक वेगळंच नात आहे. याचं कारण म्हणजे कोकणाची गोड भाषा, जी प्रत्येकाच्या मनाला भावते. कोकणाच्या क...

 

कोकणाचं आणि उर्वरित महाराष्ट्रातील माणसाचं एक वेगळंच नात आहे. याचं कारण म्हणजे कोकणाची गोड भाषा, जी प्रत्येकाच्या मनाला भावते. कोकणाच्या कोपऱ्या-कोपऱ्यात ही गोड भाषा बोलणारी गोड मंडळी तुम्हाला दिसून येतील. त्यांच्यातील चांगले-वाईट प्रसंगही तुमच्या लक्षात येतील.

आधीच कोकणाचा निसर्ग एवढा प्रेमळ आहे की, तिथेच जाऊन सेटल व्हावस वाटत. त्यातही ही अशी जीवाला जीव देणारी माणस प्रत्येक राज्यात, प्रांतात असतातच, पण कोकणी माणस तिळभर का होईना जास्तच प्रेमळ आहेत.

हीच कोकणची माणसं मला ‘मालवणी डेज’ या झी मराठीच्या सिरीजमधून भेटली. माझा जेव्हा जेव्हा मूड ऑफ असतो तेव्हा तेव्हा मी ‘मालवणी डेज’ ही मालिका बघतो. या मालिकेतील प्रसंग, पात्र, भाषा, संस्कृती हे सगळं कोकणच्या आठवणी ताज्या करणार असता. याआधी युट्युबवर ‘मालवणी डेज’ या मालिकेचे 30 भाग उपलब्ध होते. आता मात्र ते काढून टाकलेले आहेत, मात्र 5-7 मिनिटांचे अनेक भाग उपलब्ध आहेत.

आता मधल्या काळात मूड ऑफ असल्याने ‘मालवणी डेज’ या मालिकेचे काही भाग युट्युबवरून काढून टाकल्याने मी नाराज झालो. आणि याला पर्यायी कोकणी मालिका शोधू लागलो. आणि पुन्हा झी मराठीचीच ‘गाव गाता गजाली’ ही मालिका समोर आली.

यापूर्वीही ही मालिका अनेकदा समोर आली होती. मात्र मी फक्त ‘मालवणी डेज’च्या प्रेमात असल्याने ‘गाव गाता गजाली’ बघायचे टाळले. आता मात्र ‘मालवणी डेज’ उपलब्ध नसल्याने सहजच ‘गाव गाता गजाली’चा एक भाग बघितला आणि या मालिकेच्याही मी प्रेमात पडलो. मालवणी डेज या मालिकेची पुरेपूर कसर ‘गाव गाता गजाली’ने भरून काढली होती.

भन्नाट पात्र, त्यांच्या सवयी, प्रत्येक भागानुरूप समोर येणारे चांगले-वाईट प्रसंग, एकमेकांना साथ देणारे गावकरी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गावातील चांडाळ चौकडीने केलेली धमाल... कोकणातील माणसंही प्रेमात पडतील, इतकी सुंदर आणि अडकवून ठेवणारी मालिका म्हणजे ‘गाव गाता गजाली’.

‘नुसत्या गजाली करूक व्हया तुमका’ असे म्हणत गावातील तरून आणि म्हाताऱ्या चांडाळ चौकडीला सर्वांनी डिवचले.तरी मालिका पुढे नेण्यात या चांडाळ चौकडीचा मोठा वाटा आहे. वामन्या, संदीपा, सुहासा, आबा, नाम्या आणि अध्येमध्ये मनोहर, बबन्या ही मंडळी आहेत या गावातील दोस्त.

यांचा कट्टा म्हणजे कधी नाम्याचे न्हाव्याचे दुकान नाहीतर ते मंदिर जिथे आबा पुजारी आहेत.

महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात एक माणूस असा असतो, जो छोटमोठ्या गोष्टीही सहजपणे गावात पसरवत असतो. तेच काम या मालिकेत वामन्या करत असतो. जो अविवाहित आहे आणि गावात शेतगडी म्हणून काम करतो. त्याला स्वतःची अशी शेती नाही. प्रत्येक घरात ‘चहाचा घोट’ घेणे हीच त्याच्या कामाची पावती. मालिकेतील जवळपास प्रत्येक भागात वामन्याने मजा आणली आहे. कधी त्याने केलेल्या गैरसमजामुळे तर कधी त्याने पसरवलेल्या बातमीमुळे या मालिकेत धमाल आली आहे.

युट्युब लिंक :

Gaav Gata Gajali| Marathi Serial | Full Episode - 100 | Pralhad Kudtarkar,Rohan Kotekar| Zee Marathi - YouTube

कंत्राटदार म्हणून काम पाहणारा आणि प्रत्येक काम अर्धवट ठेवणारा अशी सुहासची ओळख आहे. गावातील राजकारण करायची इच्छा असणारा आणि रिक्षा चालवणारा संदीप मालिकेचा मेंदू आहे. ‘तर याठिकाणी माझ्या मतदारसंघातील’ असे म्हणाल्याशिवाय मालिकेचा एकही भाग संपलेला नाही.

गावात पूजा करणारे ‘आबा’ हे मालिकेतील सर्वात जेष्ठ नागरिक आहेत.  ‘मेल्या, तुह्या मानेवर वस्तरा फिरीन’ असे म्हणणारे आणि गावात सलूनचे दुकान असणारे ‘नाम्याकाका’ या दोघांशिवाय ही मालिका संपूच शकत नाही.

अधून मधून मालिकेचा भाग बनणारी अनेक पात्र या मालिकेत आहेत. सुहास, आबा, नाम्या, मनोहर, मास्तर यांच्या बायका तर मनोहरची आई आणि म्हातारी सरकती यांनीही या मालिकेत धमाल आणलेली आहे.

कोकणावर प्रेम असणाऱ्यांनी आणि नसणाऱ्यांनी सर्वांनी ही मालिका आवर्जून बघावी, अशीच आहे. ही मालिका बघून तुम्ही हसणार, हे नक्कीच... सुख, दुख:, अशा अनेक भावनांचा मेळ घालणारी आणि आपले कोकणावरील प्रेम वाढवणारी ही मालिका नक्कीच बघा.

संपादन : विनोद सूर्यवंशी 

पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com

| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज | 

टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala

मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com

COMMENTS

नाव

Blog,11,Bollywood,34,Box Office,4,Celebrity,24,Chitranagari,15,Chitrapat,11,Fashion,27,Feature,33,Festival,4,Gossip,33,Health,21,Hollywood,8,Latest,30,Lifestyle,20,Music,7,Natak,2,OTT Live,9,Photography,3,Relationship,26,Review,8,Short Film,3,Theater,4,Tollywood,1,Trailer,5,Trending,25,Video,16,Web Series,7,You Tuber,5,
ltr
item
Pikcharwala: ‘गाव गाता गजाली’ म्हणजे अस्सल कोकणी मनोरंजनाचा ठसका..!
‘गाव गाता गजाली’ म्हणजे अस्सल कोकणी मनोरंजनाचा ठसका..!
https://1.bp.blogspot.com/-aDxyyNT6T_0/YGQ0W1ci9YI/AAAAAAAAE0k/1gRfc8dLs0UToecnXL9BhWzhbia1w5vowCLcBGAsYHQ/s320/Gaav%2BGata%2BGajali.jpg
https://1.bp.blogspot.com/-aDxyyNT6T_0/YGQ0W1ci9YI/AAAAAAAAE0k/1gRfc8dLs0UToecnXL9BhWzhbia1w5vowCLcBGAsYHQ/s72-c/Gaav%2BGata%2BGajali.jpg
Pikcharwala
https://www.pikcharwala.com/2021/03/blog-post_97.html
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/2021/03/blog-post_97.html
true
2767188615897253807
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content