अर्जुन लघुचित्रपटाने मारली बाजी; मराठी रसिकांसाठी अभिमानाचा क्षण

  पुणे : चित्रपट, माहितीपट आणि आता लघुचित्रपटांच्या स्पर्धेतही मराठी कलाकार आणि तंत्रज्ञ आंतरराष्ट्रीय पातळीवरील मराठीचा ठसा सुवर्णाक्षरात उ...

 



पुणे :

चित्रपट, माहितीपट आणि आता लघुचित्रपटांच्या स्पर्धेतही मराठी कलाकार आणि तंत्रज्ञ आंतरराष्ट्रीय पातळीवरील मराठीचा ठसा सुवर्णाक्षरात उमटवत आहेत. मराठी भाषा आणि त्यातून मांडलेली कला मराठी रसिकांच्या मनावर गरुड घालत जगालाही आपल्या कलेने आकर्षित करत आहेत. आता अशातच एक महत्त्वाची आणि अवघ्या मराठी जणांसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. 

‘अर्जुन’ या लघुचित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट लघुचित्रपट आणि उत्कृष्ट अभिनयासाठी दोन नामांकने पटकावली आहेत.मराठी कलारसिक आता लघुचित्रपट या माध्यमाला गांभीर्याने घेत असताना आता अर्जुन लघूचित्रपटाने दोन नामांकने पटकावल्याने मराठी कलाक्षेत्राचा झेंडा पुन्हा एकदा अटकेपार रोवला गेला आहे. गोरेगाव फिल्मसिटीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात या लघुचित्रपटाला सन्मानित करण्यात आले आहे. 


‘अर्जुन’ हा मधुबन फिल्म्स या बॅनरखाली ही शॅार्टफिल्म उज्ज्वला राजेश कुलकर्णी यांनी प्रोड्यूस केली आहे. या लघुचित्रपटाची कथा ही शिवराज वायचळ हे तरूण, लोकप्रिय अभिनेते यांची असून, त्यांनीच याचे दिग्दर्शन केले आहे.

काय आहे कथा

या लघुचित्रपटाची कथा ही एका लहान अंध मुलाच्या जिद्दीची आणि त्याच्या प्रवासाची गोष्ट आहे. ही कथा अतिशय तरल आणि संवेदनशीलतेने या लघुचित्रपटात मांडण्यात आली आहे. या कथेचा नायक अर्जुन हा आपल्या गुरुला गुरुपौर्णिमेनिमित्त काही एक भेट द्यायची ठरवतो. त्याचा हा प्रवास या लघुचित्रपटात उलगडतो. हा लघुपट सध्या विविध चित्रपट महोत्सवात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय बनला आहे.


असे मिळाले यश

अर्जुन या लघुचित्रपटाने ‘गोल्डन बी इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल’ आणि ‘गोल्डन स्पॅरो इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल’ मध्ये मानांकने पटकावली आहेत. बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमधे या लघुचित्रपटाचे विशेष कौतुक म्हणजे स्पेशल मेन्शन झाले आहे. तसेच या लघुचित्रपटाला शनिवारी (दि. २७ मार्च २०२१) फिल्मफेअरचे दोन महत्वाचे पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. बेस्ट फिल्म आणि बेस्ट मेल आर्टिस्ट असे दोन महत्वाचे फिल्म फेस्टिवल या लघुचित्रपटाने पटकावले आहेत. या वर्षीचे बेस्ट फिल्म आणि बेस्ट ॲक्टरचे फिल्मफेअर ॲवॅार्ड सुद्धा या लघुचित्रपटाला मिळाले आहेत.


विशेष बाब म्हणजे आता लघुचित्रपटाच्या कलाकारांचाही चाहता वर्ग वाढताना दिसत आहे. अनेक मोठ्या पडद्यावरील कलाकारही आता लघुचित्रपटात काम करताना दिसत आहेत. अर्जुन या लघुचित्रपटाचे कलाकारही आता मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होताना दिसत आहेत. या लघुचित्रपटात अर्णव अब्दागिरे, महेंद्र वाळुंज, अश्विनी गिरि, रमेश परदेशी, संपदा परदेशी यांनी प्रमुख भुमिका केल्या आहेत.

संपादन : विनोद सूर्यवंशी 

पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com

| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज | 

टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala

मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com

COMMENTS

नाव

Blog,11,Bollywood,34,Box Office,4,Celebrity,24,Chitranagari,15,Chitrapat,11,Fashion,27,Feature,33,Festival,4,Gossip,33,Health,21,Hollywood,8,Latest,30,Lifestyle,20,Music,7,Natak,2,OTT Live,9,Photography,3,Relationship,26,Review,8,Short Film,3,Theater,4,Tollywood,1,Trailer,5,Trending,25,Video,16,Web Series,7,You Tuber,5,
ltr
item
Pikcharwala: अर्जुन लघुचित्रपटाने मारली बाजी; मराठी रसिकांसाठी अभिमानाचा क्षण
अर्जुन लघुचित्रपटाने मारली बाजी; मराठी रसिकांसाठी अभिमानाचा क्षण
https://1.bp.blogspot.com/-X2h1kziR_ww/YGicZ6-JHVI/AAAAAAAAE1c/GY5YgHYH_BkSsVDzKJ5IEydOWc7jdHKaACLcBGAsYHQ/s320/arjun%2Bmadhuban%2Bfilm%2B3.jpg
https://1.bp.blogspot.com/-X2h1kziR_ww/YGicZ6-JHVI/AAAAAAAAE1c/GY5YgHYH_BkSsVDzKJ5IEydOWc7jdHKaACLcBGAsYHQ/s72-c/arjun%2Bmadhuban%2Bfilm%2B3.jpg
Pikcharwala
https://www.pikcharwala.com/2021/04/blog-post.html
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/2021/04/blog-post.html
true
2767188615897253807
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content