चार पोरांचा बाप मादक अदांपुढे झाला घायाळ; वाचा सलीम-हेलन यांची प्रेमकहाणी..!

  Source : Google 'तो' प्रथितयश पटकथा लेखक. 'ती' प्रसिद्ध कॅब्रे डान्सर. एका चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले. तिच्या मादक ...

 

Source : Google

'तो' प्रथितयश पटकथा लेखक. 'ती' प्रसिद्ध कॅब्रे डान्सर. एका चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले. तिच्या मादक अदा नि नजरेने तो क्षणात घायाळ झाला. आपण चार मुलांचे बाप आहोत, हेही विसरला. तिचा प्रेमात एकदम 'दिवाना' झाला. तीही आपले लग्न मोडून त्याच्यासोबत 'सात जन्माच्या' बंधनात अडकली.. सगळे विरोध झुगारून दोन जीव एकरूप झाले. अखेर हळूहळू सगळ्यांचा विरोधही मावळला नि एका 'लव्ह स्टोरी'चा शेवट सुखात्म झाला..

ही एखाद्या चित्रपटाची कथा नाहीय.. तर 'दबंग' अभिनेता सलमान खानचे वडील तथा प्रसिद्ध पटकथालेखक सलीम खान व अभिनेत्री तथा प्रसिद्ध कॅब्रे डान्सर हेलन यांची ही प्रेमकहाणी आहे. काहीशी 'फिल्मी' वाटत असली, तरी खरी आहे.. बॉलिवूडमधील अशा अनेक कलाकारांनी पहिले लग्न मोडून पुन्हा नव्याने संसार थाटले. अर्थात त्यातील काहींचे यशस्वी झाले, तर काहींनी पुन्हा पुन्हा संसाराचा सारीपाट मांडण्याचा प्रयत्न केला.

सुशीला चरक यांच्याशी पाहिले लग्न

सलीम खान यांच्याबद्दल सांगायचे झाले, तर त्यांचा जन्म १९३५ मध्ये मुंबईत झाला. १९६४ मध्ये त्यांचा सुशीला चरक (लग्नानंतर सलमा खान) यांच्यासोबत प्रेमविवाह झाला. त्यानंतर त्यांना सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान आणि अलवीरा खान ही मुले झाली.

व्हायचे होते अभिनेता!

सलीम खान यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. खरं तर त्यांना चित्रपटात अभिनेता व्हायचे होते. 'तिसरी मंजिल', 'सरहदी लुटेरा', १९६७ मध्ये आलेला 'दिवाना' आणि १९७७ मध्ये 'वफादार' अशा काही चित्रपटात त्यांनी अभिनेता म्हणून नशीब आजमावून पाहिले. मात्र, त्यात म्हणावे तसे यश मिळत नसल्याचे पाहून ते पटकथा लेखनाकडे वळले आणि त्यांना आपली वाट सापडली.

'जय-वीरू'ची जोडी

अवघ्या काही दिवसातच एक प्रसिद्ध असे पटकथा लेखक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख तयार केली. त्यानंतर प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांच्यासोबत त्यांची जोडी जमली नि बॉलीवूडला 'सलीम-जावेद' ही सुपरहिट जोडी मिळाली. त्यांच्या लेखणीतून यशस्वी चित्रपटांची रांगच लागली. मात्र, नंतर काही कारणांनी त्यांच्यात वितुष्ट आले नि 'जय-वीरू'ची ही जोडी फुटली. अभिनेता म्हणून काम करीत असताना सलीम खान यांना महिन्याला 400 रुपये मिळत होते. मात्र, पटकथा लेखक झाल्यावर रिद्धी-सिद्धी त्यांच्या घरी घागरीने पाणी भरू लागल्या..

सलीम खानच्या आयुष्यात हेलनचा प्रवेश

आपण परत मूळ मुद्द्यावर येऊ या.. सगळे काही सुरळीत चालू असताना, सलीम खान यांच्या आयुष्यात हेलन यांचा प्रवेश झाला. 'काबिल खान' चित्रपटाच्या वेळी सलीम खान यांची हेलन यांच्याशी भेट झाली. लावण्यवती हेलनचे सौंदर्य पाहून या आधुनिक विश्वामित्राचीही तपश्चर्या ढळली. तिच्या मादक अदावर ते फिदा झाले. काही कारणांनी पुढे हेलन यांना चित्रपटांमध्ये काम मिळेनासे झाले. त्यामुळे हेलन इतकी निराश झाली, की तिच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार सुरू होता. त्यावेळी एक जवळचा मित्र म्हणून सलीम खान यांनीच तिला सावरले. आधाराचा हात दिला.

विरोध डावलून लग्न

मैत्रीचे रूपांतर प्रेमात होण्यास वेळ लागला नाही. पण, सलीम व हेलन या दोघांचाही आधी विवाह झालेला होता. हेलनने तिच्यापेक्षा वयाने २७ वर्षांनी मोठे असलेले दिग्दर्शक पी. एन. अरोरा यांच्याशी लग्न केले होते; पण सलीम यांच्याखातर आपल्या 35व्या वाढदिवशी तिने पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या लग्नाला सलीम यांच्या घरातून पत्नी सलमा खान, सलमान खान यांच्यासह अरबाज, सोहेल यांनी मोठा विरोध केला. मात्र, सगळ्यांचा विरोध डावलून सलीम यांनी 1980 मध्ये हेलन यांच्याशी लग्न केले.

'हम साथ साथ है..'

सलीम व हेलन यांच्या लग्नानंतर खान कुटुंबात बराच परकेपणा होता. सलमान, अरबाज आणि सोहेल खान तर हेलन या आपल्या सावत्र आईशी बोलतही नव्हते. मात्र, कोणत्याही समस्येवर 'काळ' हे मोठे औषध असते. हळूहळू मनातील कटुता कमी होत गेली. दुरावा कमी झाला. 'हम साथ साथ है..' म्हणत आता हे कुटूंब प्रत्येक सोहळ्यात एकत्र दिसते.

नात्याचा नेहमीच सन्मान

एका मुलाखतीत हेलन यांनी सलीम खान यांच्यासोबतच्या प्रेमकथेचा संदर्भ देताना सांगितले होते, "मी त्यांच्या प्रेमात कसे, कधी पडले, हे मलाही सांगता येणार नाही, परंतु मी अडचणीत असताना सलीम यांनी आधार दिला. एक प्रसिद्ध पटकथा लेखक असतानाही माझा गैरफायदा घेतला नाही. माझा नेहमीच सन्मान केला. आमच्या नात्याचा सन्मान राखण्यासाठी आम्ही 1980 मध्ये लग्न केले."

लग्नानंतर हेलन आणि सलीम यांना मुले झाली नाहीत. परंतु, त्याचे त्यांना कधीही वैषम्य वाटले नाही. त्यांनी सलीम आणि त्याची पहिली पत्नी सलमा यांची मुलेच स्वतःची मानली. शिवाय अर्पिता हिला दत्तक घेतले. इतरांसारखाच तिचाही सांभाळ केला. आयुष शर्मा याच्याशी मोठ्या धुमधडाक्यात तिचे लग्न लावून दिले. सलीम यांच्या उतार वयात त्या तितक्याच प्रेमाने त्यांची काळजी घेतात. 

संपादन : सोनाली पवार

पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com

| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज | 

टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala

मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com


COMMENTS

नाव

Blog,11,Bollywood,34,Box Office,4,Celebrity,24,Chitranagari,15,Chitrapat,11,Fashion,27,Feature,33,Festival,4,Gossip,33,Health,21,Hollywood,8,Latest,30,Lifestyle,20,Music,7,Natak,2,OTT Live,9,Photography,3,Relationship,26,Review,8,Short Film,3,Theater,4,Tollywood,1,Trailer,5,Trending,25,Video,16,Web Series,7,You Tuber,5,
ltr
item
Pikcharwala: चार पोरांचा बाप मादक अदांपुढे झाला घायाळ; वाचा सलीम-हेलन यांची प्रेमकहाणी..!
चार पोरांचा बाप मादक अदांपुढे झाला घायाळ; वाचा सलीम-हेलन यांची प्रेमकहाणी..!
https://1.bp.blogspot.com/-_O1j-2DaFac/YILeLDKuUzI/AAAAAAAAE4Y/umAe-2Zt1hUw9m5FNs22oqQ5rP0CblQnQCLcBGAsYHQ/s320/helen.jpg
https://1.bp.blogspot.com/-_O1j-2DaFac/YILeLDKuUzI/AAAAAAAAE4Y/umAe-2Zt1hUw9m5FNs22oqQ5rP0CblQnQCLcBGAsYHQ/s72-c/helen.jpg
Pikcharwala
https://www.pikcharwala.com/2021/04/blog-post_7.html
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/2021/04/blog-post_7.html
true
2767188615897253807
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content