जेव्हा तुम्ही ऊदास असाल, एकट वाटत असेल, मनमोकळ रडावसं वाटत असेल, सगळीकडे निराशा दिसत असेल, अशा वेळी तुम्ही चार्ली चैपलिनला बघा, तो एक असा मा...
जेव्हा तुम्ही ऊदास असाल, एकट वाटत असेल, मनमोकळ रडावसं वाटत असेल, सगळीकडे निराशा दिसत असेल, अशा वेळी तुम्ही चार्ली चैपलिनला बघा, तो एक असा माणूस आहे जो तुमच्या निराशेला, एकटेपणाला कुरवाळीत तुम्हाला आनंदाची दिशा दाखवेन. तुमची उदासी तुमच्यापासून कोसो दूर निघून जाईल आणि पुन्हा तुम्हाला आशेचा किरण दिसू लागेल.
एक वाकडा तिकडा चालणारा, किरकोळ दिसणारा आणि चेहऱ्यावर कायम असे भाव की, जे पाहून आपल्याला नक्कीच हसू येईल... अगदी गंभीर परीस्थितीतही. चार्ली चैपलिनने १ शब्दही न बोलता अनेक पिढ्यांना हसवण्याचे काम केले आहे आणि म्हणून आज आणि पुढची कित्येक वर्षे तो अमर राहील.
चार्ली चैपलिनला एक हास्य कलाकार किंवा एक कॉमेडी अभिनेता समजणे, ही आपली चूक असेल कारण ती हास्याच्या खूप पलीकडे निघून गेले होते. जिथे फक्त चार्ली चैपलिन तिथे मनमुराद आनंद, अशी व्याख्या अने सामान्य लोकांनी चार्लीची केली होती.
निखळ हास्य कुठे आहे, याचा शोध घेत असताना चार्लीने अनेक दुःख विकत घेतली होती. असं म्हटलं जातं की, एखादा ‘ग्रेट’ कलाकार तेव्हाच तयार होतो, जेव्हा त्याला दुःखाची जाणीव असते. असंच काही घडलं होतं चार्लीच्या बाबतीत.
चार्लीची दुःख त्याच्यासोबत मोठी झाली ,वाढली. याच दुःखाने त्याला अभिनय शिकवला आणि दुःखाला कवटाळून बसणारा तोच चार्ली लोकांना आनंद वाटू लागला.
16 एप्रिल 1889 ला जन्म झालेल्या चार्लीचे खरे नाव 'सर चार्ल्स स्पेन्सर चैप्लिन' असे होते. चार्लीचे आई आणि वडील दोघेही कला क्षेत्रात काम करत होते. चार्ली 3 वर्षांचा असताना त्यांच्या आई-वडील वेगळे राहू लागले. मात्र चार्लीवर त्यांच्यात असलेल्या कला-गुणांचा प्रभाव पडला होता. चार्ली चांगलं गाणं म्हणू लागला होता. वयाच्या 5 वर्षी चार्ली चांगली गाणी म्हणायचा. हे थोडं अतिशयोक्ती वाटत असलं तरी हेच खरं आहे.
असे म्हटले जाते की, एकदा कार्यक्रम करत असताना चार्लीच्या आईची तब्येत ढासळली आणि पाच वर्षांच्या चार्लीने स्टेजचा ताबा घेतला आणि घडलेला सर्व प्रकार सांभाळून घेतला. आता तुम्हाला वाटले असेल की, चार्ली गायला असेल किंवा नाटक केलं असेल. मात्र चार्लीने आपले दुःख लोकांसमोर मांडायला सुरवात केली. तीही त्याच्या अनोख्या अभिनयाच्या स्टाईलने.
लोक हसायला लागली आणि चार्ली आपले दुःख अधिक त्वेषाने मांडू लागला. आणि यातूनच चार्लीला लक्षात आले की, आपण दुःख विकत घेतली तरच आनंदाचा व्यापार होऊ शकतो.
चार्लीचा जन्म लंडनमध्ये झाला असला तरीही वयाच्या 15 व्या वर्षापर्यंत चार्ली अनेक देश फिरला तोही फक्त अभिनयात रुची असल्यामुळे. लहानपणापासून दुःखाचा डोंगर घेऊन चाललेल्या चार्लीला वयाच्या 19 व्या वर्षी एका मुलीवर एकतर्फी प्रेम झाले मात्र तिथेही त्याच्या पदरी दुःख आले. आता मात्र दुःखाला सोबत घेऊनच आयुष्य जगायचे. दुःख हे आपल्या आयुष्याचा सहजभाव आहे, हे समजून चार्लीने पुढील आयुष्य व्यतीत करायचे ठरवले.
एवढं सगळं होऊनही चार्लीच्या आयुष्यातील एक विलक्षण गोष्ट मात्र माझ्यासमोर नेहमी आश्चर्य निर्माण करते. ती म्हणजे, चार्लीची 3 लग्न झाली होती. अनेक वर्षे अभिनय केल्यावर चार्लीने अभिनय क्षेत्रात मोठी उंची गाठली. अमेरिकी सिनेमा आणि क्लासिकल हॉलीवुडमध्ये तर चार्ली ‘बडी हस्ती’ बनला.
दोन्ही विश्व युद्धे चार्लीच्या समोर झाली त्यातील एका युद्धाची दुःखं तर त्याने आपल्या 'द ग्रेट डिक्टेटर' या चित्रपटात उतरवली.
तब्बल 40 वर्षे चार्लीने थिएटर केलं. या काळात त्याची प्रचंड प्रशंसा झाली. आपल्या आत्मचरित्रात त्याने असं म्हटलं आहे की, ‘माझा जीवनातील सगळ्यात मोठा आनंद म्हणजे अमेरिकेत जाऊन निवांत आयुष्य जगणे’. मात्र मोकळ्या हवेच्या शोधात आणि विरोधात असलेल्या अनेक वादांमुळे, प्रश्नांमुळे तो वयाच्या साठच्या दशकात स्विटज़रलैंडला येऊन राहण्यास मजबूर होता.
'द ग्रेट डिक्टेटर' या चित्रपटावर त्याने जेव्हा काम सुरु केले होते, तेव्हा अडोल्फ़ हिटलरची चेष्टा करणारी ही फिल्म किती चालेल यावर संशय होता. एवढेच नाही तर जे वाद उभा होतील, त्याचे काय करायचे हाही प्रश्न होताच. याच काळात चार्लीच्या सगळ्यात जवळचा मित्र डगलस फ़ेयरबैंक्स याने सांगितले की, तुझ्याकडे काही पर्याय नाही चार्ली... ही फिल्म म्हणजे मानवी इतिहासातील सर्वात चमत्कारिक ट्रिक ठरणार आहे. कारण जगातील सर्वात मोठा खलनायक आणि जगातील सर्वात मोठा नट एकसारखे दिसतील. आता कुठलेही आढे-वेढे न घेता काम सुरु कर.
चार्लीने लहानपणी एका न्हाव्याच्या दुकानात बरेच दिवस काम केले होते. मात्र त्यांनी या गोष्टीचा उल्लेख आपल्या आत्मचरित्रात केलेला नाही. या कामाचा चार्लीला असा फायदा झाला की, त्याने आपली महान फिल्म 'द ग्रेट डिक्टेटर' मध्ये यहूदी न्हाव्याची भूमिका अत्यंत जबरदस्त केली.
1972 ला चार्लीला अभिनय आणि संगीतासाठी ऑस्कर मिळाला. 1952 ला आलेल्या ‘लाइमलाइट’ या चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर मिळाला. 25 डिसेंबर 1977 ला चार्ली आपल्यातून निघून गेला पण फक्त शरीराने, त्याने केलेलं काम हे अजरामर आहे.
शेवटी एकच गोष्ट म्हणविशी वाटते, चार्ली स्वतः एक हास्य आणि आनंद होता. जो कित्येकांच्या पिचलेल्या आयुष्यात हास्य आणि आनंद देऊन गेला आणि देत आहे.
लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी
पिक्चरवाला
| ताज्या बातम्यांसाठी फॉलो
करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS