सख्खे आणि पक्के मित्र असूनही 11 वर्षे बोलले नव्हते अनुराग कश्यप आणि मनोज वाजपेयी; वाचा, हा भारी किस्सा

इंडस्ट्रीत काही असे अभिनेते, दिग्दर्शक कलाकार आहेत जे आपल्या कामाशी खूप प्रामाणिक आहेत. मात्र ते तितकेच रागीटही आहेत. नाना पाटेकर, अनुराग कश...


इंडस्ट्रीत काही असे अभिनेते, दिग्दर्शक कलाकार आहेत जे आपल्या कामाशी खूप प्रामाणिक आहेत. मात्र ते तितकेच रागीटही आहेत. नाना पाटेकर, अनुराग कश्यप, मनोज वाजपेयी हे सगळे रागीट कलाकार म्हणून इंडस्ट्री आणि त्यांच्या चाहत्यांना परिचित आहेत. आज आम्ही तुम्हाला एकेकाळी सख्खे आणि पक्के मित्र असलेल्या तगडा दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि भन्नाट, अतरंगी अभिनेता मनोज वाजपेयीचा एक किस्सा सांगणार आहोत. ज्यात ते तब्बल 11 वर्षे बोलले नव्हते.

'सत्या' चित्रपटात मनोज वाजपेयी आणि अनुराग कश्यप यांनी पहिल्यांदा एकत्र काम केले. या चित्रपटात मनोजने भिकू म्हात्रेची भूमिका केली होती, ज्यामुळे त्याच्या आयुष्याला वेगळं वळण लागलं या चित्रपटाची कथा अनुराग कश्यप यांनी लिहिली होती. यानंतर दोघेही खूपच जवळचे आणि घनिष्ट मित्र झाले. मात्र मधल्या काळात ते अजिबात एकत्र दिसले नाहीत. ‘सत्या’नंतर बऱ्याच वर्षांनंतर या दोघांनी 'गँग्स ऑफ वासेपुर' चित्रपटात काम केले.

मधल्या काळात असं काय घडलं होतं की, दोघांनीही एकमेकांशी बोलणं बंद केलं. एवढच नाही तर त्यांच्या दोस्तीत मोठी दरी निर्माण झाली होती. ज्यामुळे त्यांनी एकत्र कामसुद्धा केले नाही. 

1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सत्या’ चित्रपटानंतर अनुराग कश्यप आणि मनोज बाजपेयी यांनी दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. ते चित्रपट म्हणजे 'कौन' आणि 'शूल'. पण या दोन चित्रपटानंतर ते थेट  2012 मध्ये रिलीज झालेल्या 'गॅंग्स ऑफ वासेपुर' या चित्रपटात काम करताना दिसले. त्यानंतर 11 वर्षे ते एकमेकांशी बोलले नाहीत. स्वत: मनोजने ‘लल्लनटॉप’ या प्रसिद्ध युट्युब चॅनलला एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे.

या मुलाखतीत मनोज म्हणाले की, अनुराग कानाने कच्चा आहे. कधी या गल्लीला जातो तर कधी त्या. कोणी त्याला म्हटले की, मनोज तुझ्याविषयी अमुक तमुक सांगत होता. तर लगेच मान्य करून टाकतो. त्याची खातरजमा करत नाही. एकदा कुणीतरी एका विषयावरून त्याला माझी चुघली केली. आणि त्यालाही ते खरे वाटले. त्याला वाटले की, मनोज आपला मित्र नाही. आणि मग त्याने माझ्याशी बोलणे बंद केले. मी पण रागीट होतो. जवान होतो. तू नाही बोलत तर मी का बोलू?            

आणि मग मनोज यांनीही अनुरागशी बोलणं बंद केलं. यानंतर जवळपास 10-11 वर्षे ते दोघे बोलले नाहीत. नंतर काही वर्षांनी एक काळ असा होता की, मनोज यांच्याकडे कुठलेच काम नव्हते. त्यांच्या हाताला काहीतरी झाले होते. त्यामुळे ते घरीच बसून होते. तो काळही मनोज यांच्यासाठी मोठ्या संघर्षाचा होता कारण कोणताही रोल त्यांना ऑफर होत नव्हता.

मग मनोज यांच्या लक्षात आले की, अनुपम खेर यांची एक सवय आहे, जेव्हा त्यांच्याकडे काही काम नसते तेव्हा ते अनेक दिग्दर्शकांना फोन करतात आणि मला काहीतरी काम द्या, अशी मागणी करतात. 

मनोज यांच्याकडे त्या काळात वेळ असल्याने ते चांगल्या चांगल्या फिल्म्स बघायचे आणि त्या फिल्म्सच्या दिग्दर्शकांना फोन करून काम मागायचे. एके दिवशी त्यांनी अनुरागचा ‘देव डी’ हा चित्रपट पाहिला. त्यांना हा चित्रपट खूपच आवडला. आणि आता ते अनुरागला फोन करणार होते. मात्र फोन करण्यापूर्वी त्यांनी ठरवले की, याच्या चित्रपटाचे कौतुक करायचे. मात्र याच्याकडे काम नाही मागायचे.   

त्यांनी अनुरागला फोन करून चित्रपट आवडला असल्याचे सांगितले. आणि अशीच प्रगती कर असे सांगून फोन बंद केला. यानंतर तब्बल दीड-दोन वर्षांनी रात्री साडेदहाच्या सुमारास जी मनोज यांची झोपायची वेळ होती, तेव्हा त्यांना अनुरागचा फोन आला. 

जेव्हा मनोज बाजपेयींनी फोन उचलला तेव्हा अनुराग म्हणाला- 'एक स्क्रिप्ट आहे, तुम्ही ऐकाल का? माझ्यासोबत काम कराल का?' त्यानंतर चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकण्यासाठी आतुर झालेल्या मनोज यांची झोप पळली आणी ते म्हणाले मी आताच तुझ्या ऑफिसला येतो. 

त्यानंतर मनोज बाजपेयी रात्रीच अनुरागच्या ऑफिसला पोहोचले. दोघांनी मिठी मारली आणि नंतर अनुरागने चित्रपटाची कहाणी ऐकवली. रात्री साडेअकरा- बारापर्यंत दोघेही चित्रपटाच्या स्क्रिप्टवर बोलत राहिले. यानंतर दोघांनीही एकत्र आपापल्या आवडीची दारू पिली. जेवणही केले आणि मग ते आपापल्या घरी गेले. अशा पद्धतीने पुन्हा दोघांची चांगली दोस्ती झाली. आणि मग बनला जबरदस्त चित्रपट 'गैंग्स ऑफ़ वासेपुर'.  

लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी 

पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com

| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |

टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala

मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com

COMMENTS

नाव

Blog,11,Bollywood,34,Box Office,4,Celebrity,24,Chitranagari,15,Chitrapat,11,Fashion,27,Feature,33,Festival,4,Gossip,33,Health,21,Hollywood,8,Latest,30,Lifestyle,20,Music,7,Natak,2,OTT Live,9,Photography,3,Relationship,26,Review,8,Short Film,3,Theater,4,Tollywood,1,Trailer,5,Trending,25,Video,16,Web Series,7,You Tuber,5,
ltr
item
Pikcharwala: सख्खे आणि पक्के मित्र असूनही 11 वर्षे बोलले नव्हते अनुराग कश्यप आणि मनोज वाजपेयी; वाचा, हा भारी किस्सा
सख्खे आणि पक्के मित्र असूनही 11 वर्षे बोलले नव्हते अनुराग कश्यप आणि मनोज वाजपेयी; वाचा, हा भारी किस्सा
https://1.bp.blogspot.com/-uwyPLsjo1aw/YMdwWr51ypI/AAAAAAAAAb8/KuC2TiuNUislM4fefqLPQSjIkQQMpwKZgCLcBGAsYHQ/s320/manoj%2Band%2Banurag%2BPikcharwala.jpg
https://1.bp.blogspot.com/-uwyPLsjo1aw/YMdwWr51ypI/AAAAAAAAAb8/KuC2TiuNUislM4fefqLPQSjIkQQMpwKZgCLcBGAsYHQ/s72-c/manoj%2Band%2Banurag%2BPikcharwala.jpg
Pikcharwala
https://www.pikcharwala.com/2021/06/11.html
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/2021/06/11.html
true
2767188615897253807
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content