1993 मध्ये यश चोप्राचा चित्रपट ‘डर’ आला होता. हा चित्रपट त्यावेळी बऱ्यापैकी चालला. या चित्रपटात त्याकाळचा सुपरस्टार पंजाबी मुंडा सनी देओल आण...
1993 मध्ये यश चोप्राचा चित्रपट ‘डर’ आला होता. हा चित्रपट त्यावेळी बऱ्यापैकी चालला. या चित्रपटात त्याकाळचा सुपरस्टार पंजाबी मुंडा सनी देओल आणि जुही चावला होते. या चित्रपटात शाहरुख खान व्हिलनच्या भूमिकेत होता. या दोघांच्या तुलनेन शाहरुख न्यूकमर होता. त्याला जास्त लोक ओळखतही नव्हते. या चित्रपटामुळे शाहरुखला आपली मुळे इंडस्ट्रीत घट्ट करण्यास मोठी मदत झाली. मात्र या चित्रपटानंतर सनी देओलने तब्बल 16 वर्षे शाहरुखशी दुष्मनी घेतली आणि त्याच्याशी बोलणे बंद केले. तसेच या चित्रपटानंतर सनीपाजीने दिग्दर्शक यश चोप्रा यांच्यासोबतही पुन्हा कधीच काम केले नाही.
मात्र तेव्हा नेमकं काय घडलं? हे आजवर फार लोकांना माहिती नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला 28 वर्षांपूर्वी नेमकं काय प्रकरण झालं होतं, ज्यामुळे सनीपाजी रागावला होता, हे सांगणार आहोत.
वास्तविक पाहता काही दिवसांपूर्वी सनी देओल रजत शर्मांच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात आला होता. यावेळी त्याने सर्व प्रश्नांबरोबरच शाहरुख आणि यश चोप्रा यांच्याशी झालेल्या प्रकरणाचा खुलासा केला.
सनीपाजीने सांगितले की, लोकांनी फिल्म पाहिल्यावर मला आणि शाहरुख दोघांनाही पसंती दिली होती. मात्र यश चोपडा यांनी माझ्यापासून एक गोष्ट जाणीवपूर्वक लपवली. त्यांनी व्हिलनच्या पात्राला म्हणजेच शाहरुखला जास्त वेटेज दिले होते. माझी सवय अशी आहे की, मी जेव्हा कुठलाही चित्रपट करतो तेव्हा तो साफ मनाने आणि समोरच्यावर विश्वास ठेऊन करतो. काही अभिनेते मात्र कधीच विश्वासाने चित्रपट करत नाहीत. दुर्दैवाने आपल्या इंडस्ट्रीत असेही काही अभिनेते आहेत, ज्यांनी अशाच पद्धतीने स्टारडम मिळवले आहे.
फ़िल्म फ़ेयरला दिलेल्या मुलाखतीत एकदा सनीपाजीने यश चोपडा यांच्यासोबत काम न करण्याचे कारणही स्पष्ट केले होते. सनीपाजी म्हणाले होते की, मी कधीच यश चोपडा यांच्यासोबत काम करणार नाही. कारण ते शब्दाचे पक्के नाहीत. त्यांनी माझा विश्वास तोडला आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव वाईट आहे.
असेही म्हटले जाते की, ‘डर’ चित्रपटाच्या वेळी शाहरुख आणि सनीपाजीमध्ये किरकोळ वादही झाले होते. यावेळी सनीपाजीनी माध्यमांना सांगितले होते की, ‘डर’ फिल्मच्या सेटवर सगळे लोक मला घाबरायचे कारण त्यांना माहिती होते की, ते चुकीचे आहेत.
ही त्याकाळची गोष्ट आहे. जेव्हा सनी देओल सुपरस्टार होते आणि शाहरुख एकदम नवीन होता. मात्र तरीही या चित्रपटामुळे सर्वात हवा झाली ती शाहरुखचीच.
तेव्हापासून जवळपास पुढची 16 वर्षे सनीपाजी शाहरुख खानशी बोलत नव्हते. मात्र पुढच्या काही वर्षानंतर सनीपाजी आणि शाहरुख कसे एकत्र आले त्याचाही किस्सा एकदम रंजक आहे.
सनी देओलला आपला मुलगा करण देओलसह 'दामिनी' चित्रपटाचा रीमेक करण्याची इच्छा होती. मात्र अडचण अशी होती की, शाहरुख खानच्या कंपनीने (रेड चिलीज एंटरटेनमेंट) या चित्रपटाचे हक्क यापूर्वीच खरेदी केले होते. त्यामुळे सनीपाजीने हा विषय सोडून दिला.
मात्र कुठूनतरी ही खबर शाहरुखपर्यंत पोहोचली. आणि शाहरुख स्वतः गाडी घेऊन सनीपाजीला भेटायला गेले. आणि गळाभेट घेत ‘दामिनी’ या चित्रपटाचे हक्क मोठ्या विनम्रतेने सनीपाजींना स्वाधीन केले. मुंबई मिररने दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपासून तुटलेली दोस्ती शाहरुखने अशा प्रकारे मिळवली. एवढेच नाही तर ‘दिलदार’ किंग खानने हेही सिद्ध केले की, त्याच्यासाठी पैसे नाही तर नाती महत्वाची आहेत.
यानंतर अनेक ठिकाणी शाहरुख आणि सनीपाजी एकमेकांशी बोलताना दिसले. शाहरुखच्या एका कृतीने या दोघांच्या नात्याला मैत्रीचे एक नवे वळण दिले.
लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी
पिक्चरवाला
| ताज्या बातम्यांसाठी फॉलो
करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS