आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडत असतात. ज्यावर आपला विश्वास सहजासहजी बसत नाही, मात्र त्या खऱ्या असतात. अर्थात आयुष्यात योगायोग हे सारखे घ...
आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडत असतात. ज्यावर आपला विश्वास सहजासहजी बसत नाही, मात्र त्या खऱ्या असतात. अर्थात आयुष्यात योगायोग हे सारखे घडत नसतात. मात्र हे योगायोग जेव्हा जेव्हा घडतात, तेव्हा तेव्हा ते अविश्वसनीय असतात. असाच एक योगायोग बॉलीवूडमध्ये घडला.
बॉलीवूडमध्ये 2 स्टार अभिनेते हे एकमेकांचे स्पर्धक असतात. मात्र 80, 90च्या काळात असे कितीतरी अभिनेते होते, जे यशाच्या शिखरावर होते मात्र तरीही त्यांच्यातली दोस्ती गहरी असायची. अशीच एक जोडी होती. अवघ्या बॉलीवूडला 2 स्टार अभिनेत्यांची घट्ट दोस्ती माहिती होती. विनोद खन्ना आणि फिरोज खान हे जानी दोस्त होते. मात्र योगायोग असा की, दोघांचा मृत्यू एकाच आजाराने आणि एकाच तारखेला झाला.
सगळ्यात आश्चर्यचकित करणारी गोष्ट ही आहे की, मृत्युच्या वेळी दोघांचे वयही सारखेच होते. Spotboye यांनी दिलेल्या एका लेखातील माहितीनुसार, विनोद खन्ना आणि फिरोज खान यांचा मृत्यू एकाच तारखेला 8 वर्षांच्या अंतराने झाला. कोणालाही आश्चर्यचकित करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे मृत्यूच्या वेळी दोघेही एकाच वयाचे होते. फिरोज खान यांचे 27 एप्रिल 2009 रोजी फुफ्फुसांच्या कर्करोगाने निधन झाले आणि 27 एप्रिल 2017 रोजी विनोद खन्ना यांनी कर्करोगाविरूद्ध लढताना जगाला निरोप दिला.
आयुष्याच्या शेवटाला दोघांनाही कर्करोगाने छळले होते. आणि त्यातच त्यांचा शेवट झाला. DNA च्या एका लेखानुसार, फिरोज खान यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधी विनोद खन्ना आणि धर्मेंद्र यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती.
विनोद खन्ना आणि फिरोज खान 80 च्या दशकात यशाच्या शिखरावर होते. मात्र तरीही विनोद खन्ना यांनी वेगळी वाट निवडली. या दोघांनी 1976 च्या 'शंकर शम्भू'मध्ये एकत्र काम केले होते. यानंतर हे दोघे 1980 मध्ये 'कुर्बानी' आणि 1988 मध्ये 'दयावान' मध्ये एकत्र दिसले होते. या जोडी लोकांच्या पसंतीस उतरली होती.
विशेष बाब म्हणजे या जोडीचे सगळे चित्रपट हिट झाले होते. फिरोज खानला 1986 च्या 'जांबाज' सिनेमात विनोदला कास्ट करायचे होते, पण तोपर्यंत विनोद खन्ना या चित्रपट क्षेत्राला कंटाळला होता.
विनोद खन्ना यांनी आपल्या कारकिर्दीत एकदम यशाच्या शिखरावर होते. मात्र त्याच दरम्यान ओशो रजनीश यांच्या विचाराने ते प्रभावित झाले. आणि बॉलीवूडमध्ये एकदम वरच्या टोकावर असतानाही त्यांनी चित्रपटसृष्टीला कायमचा राम राम करायचे ठरवले.
त्यावेळी सर्वात जास्त मागणी असणारा नट म्हणजे अमिताभ बच्चन होय. त्याकाळी सर्वात जास्त चाहते असणारे अमिताभ बच्चन 1 नंबरवर तर विनोद खन्ना दुसऱ्या नंबरवर होते. तरीही विनोद खन्ना यांनी ओशो रजनीश यांचे शिष्यत्व पत्करले आणि अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांचा हा निर्णय अनेकांना धक्का देणारा ठरला होता.
त्याच वेळी फिरोज खान मात्र या चित्रपट सृष्टीचा एक भाग बनून टिकून राहिले आणि त्यांनी अगदी शेवटपर्यंत या क्षेत्रात काम केले. 'प्रेम आगन', 'ओम शांती ओम', 'वेलकम बॅक' सारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी शेवटच्या काळात काम केले.
विनोद खन्ना यांनीही स्वतःच्या शेवटच्या काळात अगदी मोजक्या सिनेमात काम केले. सलमान खानच्या दबंग चित्रपटात केलेला रोल आजही तरुण पिढीच्या लक्षात आहे.
विनोद खन्ना आणि फिरोज खान यांनी केलेले काम, त्यांचा स्वभाव आणि त्यांच्या ग्रेट दोस्तीची मिसाल आजही बॉलीवूड जगतात कायम आहे आणि कायम राहील.
लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी
पिक्चरवाला
| ताज्या बातम्यांसाठी फॉलो
करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS