जेव्हा हिमेश रेशमीयाच्या गाण्यामुळे पकडला गेला 30 लाखांच्या हिऱ्याचा चोर; वाचा हा चक्रावून सोडणारा भन्नाट किस्सा

आधीच्या 15 वर्षांपासून हिमेश रेशमिया आपल्याला गायक आणि संगीतकार म्हणून माहिती होता. मात्र गेल्या 5-7 वर्षात सिनेमा निर्मिती आणि अभिनय क्षेत्...


आधीच्या 15 वर्षांपासून हिमेश रेशमिया आपल्याला गायक आणि संगीतकार म्हणून माहिती होता. मात्र गेल्या 5-7 वर्षात सिनेमा निर्मिती आणि अभिनय क्षेत्रातही त्याने हातपाय मारायचे प्रयत्न केला मात्र तो या क्षेत्रात यशस्वी झाला नाही.

आपल्या संगीतक्षेत्रातील करियरची सुरुवात हिमेशने 'प्यार किया तो डरना क्या' या चित्रपटापासून केली होती. 1998 साली सलमान आणि काजोलला घेऊन आलेला हा सिनेमा चांगला चालला. त्याबरोबर चित्रपटसृष्टीत एका नव्या गायकाचा उगम झाला. त्यानंतरची काही वर्षे हिमेशने निर्विवाद बॉलीवूड संगीतक्षेत्रावर राज्य केले. कारण हिमेशने गायलेलं प्रत्येक गाणं त्यावेळी हिट आणि सुपरहिट व्हायचं.

आजही त्याची काही गाणी चालतात. मात्र भौगोलिक संकृतीत आजही हिमेशच्या गाण्यांचे चाहते ठिकठिकाणी पाहायला मिळतील. गावाखेड्यापासून शहरापर्यंत हिमेशचे चाहते दिसून येतात. एकेकाळी आपल्या गाण्याच्या तालावर नाच करायला मजबूर करणारा हिमेश आताशा शांत झाला असला तरी त्याच्या जुन्या गाण्यांची जादू अजूनही कायम आहे. आज आम्ही तुम्हाला एक असा किस्सा सांगणार आहोत, जो वाचून तुम्हीही थक्क व्हाल. विशेष बाब म्हणजे ही घटना तब्बल 15 वर्षांपूर्वीची आहे.

ही घटना वर्ष 2006 ची आहे. एका हिरा व्यापाऱ्याच्या घरात लाखो रुपयांची चोरी झाली होती. या चोरीत तब्बल 30 लाखांचे हिराही चोरी गेला होता. या हिऱ्यांच्या चोरीप्रकरणी मुंबई पोलिस देवेश बोस नावाच्या व्यक्तीचा शोध घेत होते. त्यानेच हिरा चोरला असल्याचे जवळपास निश्चित होते. मात्र पोलिसांनी जंग जंग पछाडूनही देवेश पोलिसांच्या हाती लागलेला नव्हता. चोरी झाल्यानंतरही बराच काळ पोलिसांनी त्याचा मग काढण्याचा प्रयत्न केला मात्र देवेश काही पोलिसांच्या कचाट्यात सहजपणे सापडत नव्हता. आता मात्र पोलिसांनी आयडिया केली. पोलिसांनी आपल्या खबऱ्यांना देवेशच्या कामाला लावले. विशेषकरून हॉटेलपासून ते बारपर्यंत जे खबरी होते, त्यांना जास्त लक्ष ठेवायला लावले.

मुंबईच्या एका बार मध्ये एक व्यक्ती आला आणि प्रचंड दारू प्यायली आणि नाच करणाऱ्या मुलीवर लाखो रुपये उधळले. त्यानंतर पुढचे 2 दिवस हा व्यक्ती रोज येऊन ऑर्केस्ट्रा सिंगरवर लाखो रुपये उधळायचा. आता मात्र या व्यक्तीला तिथे चांगली सर्व्हिस मिळू लागली.

हा व्यक्ती तिसऱ्या दिवशीही आला. या दिवशी हा भाई भयानक दारू पिला आणि पैशे उधळायला सुरुवात केली. त्यावेळी बार डान्सर 'हमको दीवाना कर गए' या गाण्यावर नाचत होती. हा भाई होता, हिमेश रेशमियाचा जिगरी फॅन.

भयंकर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या व्यक्तीने बार डान्सरला स्वतःकडे बोलावले आणि पुन्हा त्याच गाण्यावर डान्स करायला लावला. कारण याला त्या डान्सपेक्षा ते गाणे पुन्हा ऐकायचा मूड होता. आता पिलेल्या माणसाला ‘मूड’ हा विषय म्हणजे जबराट.

दुसऱ्यांदा ते गाणे झाले तरीही ‘भाई’चे मन भरले नाही. त्याने पुन्हा तेच गाणे लावायला लावले. आता मात्र बारमध्ये बसलेले दुसरे ग्राहक नाराज झाले. आणि त्यांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. आता मात्र हा ‘भाई’ हट्ट घेऊनच बसला आणि म्हणाला... आता वाजणार तर फक्त हिमेशचं गाणं... नाहीतर काहीच नाही.

असे म्हणून त्याने 1000 च्या नोटांचा बंडल काढला आणि उधळण्यास सुरुवात केली. आता परिस्थिती कठीण बनली होती. बारमध्ये गोंधळ सुरु झाला होता. आता बार मालकाने हस्तक्षेप केला मात्र याने हिमेश रेशमियाचेच गाणे वाजवायला लावले. आता मात्र बार मालकाने हात जोडले. मात्र प्रकरण काही केल्या मिटले नव्हते. हा गोंधळ बराच वेळ चालू होता.

या गोंधळात ग्राहक म्हणून बार मध्ये बसलेल्या पोलिसांच्या खबऱ्याने क्राइम ब्रांचला(गुन्हे शाखा) फोन करून महत्वाची ‘बातमी’ दिली होती. यानंतर गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी बारमध्ये पोहोचले, तेव्हाही हा व्यक्ती हिमेशचीच गाणी वाजवण्याची मागणी करत होता. यानंतर जेव्हा पोलिसांनी त्याला जवळून पाहिले, तेव्हा कळले की, हा तोच देवेश बोस होता, ज्याचा ते इतक्या दिवसांपासून शोध घेत होते. यानंतर पोलिसांनी देवेशला पोलिस ठाण्यात आणले असता त्याने चोरीची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेशने सांगितले की, तो गेल्या अनेक वर्षांपासून या हिरे व्यापाऱ्याच्या घरात काम करत असे. जेव्हा ज्वेलरचे कुटुंबीय परदेश दौर्‍यावर गेले तेव्हा त्यांच्या गैरहजेरीत देवेश लाखो हिरे घेऊन पळून गेला. काही दिवसांनंतर जेव्हा ज्वेलरचे कुटुंबीय परदेश दौर्‍यावरुन मुंबईला परत आले तेव्हा त्यांनी पाहिले की, घरामधून 30 लाख रुपयांचे हिरे गायब आहेत. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. मग देवेशचा शोध सुरु झाला. आणि अखेर हिमेश रेशमियाच्या गाण्यामुळे हा हिऱ्यांचा चोर अखेर पोलिसांच्या हाती लागला.    

लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी 

पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com

| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |

टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala

मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com


COMMENTS

नाव

Blog,11,Bollywood,34,Box Office,4,Celebrity,24,Chitranagari,15,Chitrapat,11,Fashion,27,Feature,33,Festival,4,Gossip,33,Health,21,Hollywood,8,Latest,30,Lifestyle,20,Music,7,Natak,2,OTT Live,9,Photography,3,Relationship,26,Review,8,Short Film,3,Theater,4,Tollywood,1,Trailer,5,Trending,25,Video,16,Web Series,7,You Tuber,5,
ltr
item
Pikcharwala: जेव्हा हिमेश रेशमीयाच्या गाण्यामुळे पकडला गेला 30 लाखांच्या हिऱ्याचा चोर; वाचा हा चक्रावून सोडणारा भन्नाट किस्सा
जेव्हा हिमेश रेशमीयाच्या गाण्यामुळे पकडला गेला 30 लाखांच्या हिऱ्याचा चोर; वाचा हा चक्रावून सोडणारा भन्नाट किस्सा
https://1.bp.blogspot.com/-F69SnHMqh4k/YMtzInHUNqI/AAAAAAAAAdw/QvKthGUgF64BqzRuFxLxPECc3szLwHOqgCLcBGAsYHQ/s320/himesh%2BPikcharwala.jpg
https://1.bp.blogspot.com/-F69SnHMqh4k/YMtzInHUNqI/AAAAAAAAAdw/QvKthGUgF64BqzRuFxLxPECc3szLwHOqgCLcBGAsYHQ/s72-c/himesh%2BPikcharwala.jpg
Pikcharwala
https://www.pikcharwala.com/2021/06/30.html
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/2021/06/30.html
true
2767188615897253807
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content