अनपेक्षित शेवट असणाऱ्या आणि डोक्याला शॉट देणाऱ्या या 8 शॉर्टफ़िल्म YouTube वर फुकटात बघा

एक काळ होता, शॉर्टफिल्म करणाऱ्यांना कोणी ढुंकूनही पाहत नव्हतं. शॉर्टफिल्मच्या वाटेला जाण्याचं धाडस सहसा कुणीही करत नव्हतं. काळ बदलला, नव्य प...



एक काळ होता, शॉर्टफिल्म करणाऱ्यांना कोणी ढुंकूनही पाहत नव्हतं. शॉर्टफिल्मच्या वाटेला जाण्याचं धाडस सहसा कुणीही करत नव्हतं. काळ बदलला, नव्य पिढीच्या सवयी बदलल्या आणि सर्वात महत्वाचं टेक्नोलॉजी बदलली.  

टेक्नोलॉजी बदलली म्हणजे नेमकं काय झालं? तर टेक्नोलॉजी बदलली म्हणजे टेक्नोलॉजी सर्वसामान्य माणसांच्या हातात आली. त्यातूनच सर्वसामान्य माणसेही माध्यमांचा नाद करू लागली. परिणामी आज अनेक गावाखेड्यातील मुलेही युट्युबचे स्टार आहेत. त्यांना मिलीयन्समध्ये फॉलोअर्स आहेत. हिंदी भाषेत विविध स्टोरी करून जेवढे विव्ज मिळत नाहीत त्यापेक्षा जास्त विव्ज प्रादेशिक भाषेतील युट्युब चॅनल्सला आहेत. टेक्नोलॉजीने अजून एक गोष्ट चांगली केली ती म्हणजे सामान्य मुलांना फिल्म करणे, सहज सोपे झाले. अर्थात त्याचे तोटेही झाले आणि ते भविष्यातही दिसतील.

आता शॉर्टफिल्मची लोकप्रियटा वाढते आहे. याचं श्रेय जातं ते युट्युबला. सर्वात जास्त शॉर्टफिल्म या युट्युबवरच पाहण्यास मिळतात.. त्याही फुकट.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही डोक्याला शॉट देणाऱ्या आणि भयंकर अनपेक्षित शेवट असणाऱ्या शॉर्टफिल्मस सांगणार आहोत. ज्या तुम्हीही नक्कीच पाहा, आनंद घ्या. महत्वाची बाब म्हणजे या सगळ्या शॉर्टफिल्म तुम्ही फुकटात पाहू शकता. अजून एक गोष्ट ती म्हणजे या शॉर्टफिल्मस पाहिल्यावर तुम्हाला आपला वेळ वाया गेला, असे अजिबातच वाटणार नाही. 

1) चटणी :- ही शॉर्टफिल्म आपल्या नावाप्रमाणेच एकदम मसालेदार आहे. ही शॉर्टफिल्म अशा महिलेची आहे जी, आपल्या पतीशी एका दुसऱ्या महिलेला जवळीक साधताना बघते. आणि मग आपल्या घरी बोलवून एक अजीबोग़रीब गोष्ट सांगते, तेही तिच्याच घरी घडलेली. ही शॉर्टफिल्म बघताना काहीतरी खायला घेऊन बसा कारण शॉर्टफिल्म पूर्ण बघेपर्यंत उठायची इच्छा होणार नाही.

2) कृति :- मनोज बाजपेयी, राधिका आपटे आणि नेहा शर्मा अशा दिग्गज लोकांना घेऊन ही शॉर्टफिल्म झालेली आहे. ही शॉर्टफिल्म एक मनोवैज्ञानिक थ्रिलर आहे. ही शॉर्टफिल्म बघितल्यावर कोणीच विसरू शकत नाही. बघताना टीव्ही किंवा मोबाईलचा आवाज कमी ठेवा, नाहीतर घाबरून जाल. 

3) अहिल्या :- ही शॉर्टफिल्म बरीच गाजली आहे. या शॉर्टफिल्ममध्ये राधिका आपटे लीड एक्ट्रेस आहे. ही पण एकदम भयानक आणि जादूइ स्टोरी आहे. जर तुम्हाला रामायणातील अहिल्या लक्षात असेल तर तुम्हाला या शॉर्टफिल्ममध्ये तिचे मॉर्डन वर्ज़न दिसून येईल.

4) जूस :- आपले आयुष्य खूप अवघड असते त्याचवेळी खूप सोपेही असते. मात्र ते आपल्या दृष्टीकोनावर ठरते. रोजच्या आयुष्यात आपण अनेक गैरसमजूतींचे शिकार होत असतो. ही शॉर्टफिल्म त्याच कहाण्या खूप चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर आणते.

5) देवी :- देवी ही अशा महिलांची कहाणी आहे, ज्या वेगळ्या भागातून आणि वेगवेगळ्या मानसिकता असताना एका ठिकाणी राहत असतात. या महिलांना परिस्थितीमुळे एकत्र राहावे लागते. ही शॉर्टफिल्म बघताना रुमाल जवळ घेऊन बसा, रडायला येऊ शकते.

6) अनुकूल   :- दिग्दर्शक म्हणून सुजॉय घोषने काम केलेली ही भन्नाट शॉर्टफिल्म आहे. या शॉर्टफिल्मचे लेखक सत्यजीत रे आहेत. Sci-fi वर आधारित ही गोष्ट आहे.  

7) छुरी :- ही एका अशा महिलेची कहाणी आहे, जी आपल्या नवऱ्याने धोका दिल्यावर त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेते. ही गोष्ट पाहताना तुम्हाला वाटते की, पुढे असे होईल, तसे होईल... मात्र ही कहाणी तशी नाही, जशी पाहताना तुम्ही कल्पना करत असतात.

8) रोगन जोश  :- नसीरुद्दीन शाह सारख्या तगड्या अभिनेत्याला घेऊन ही कहाणी सुरु होते. ही गोष्ट नसीरुद्दीन शाहच्या वाढदिवसापासून सुरु होते आणि एका वेगळ्याच वळणावर जाऊन थांबते. नसीरुद्दीन शाह यांनी यात गोष्टीत ताज हॉटेलच्या एका शेफचा रोल केला आहे. 


लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी

पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com

| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |

टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala

मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com


COMMENTS

नाव

Blog,11,Bollywood,34,Box Office,4,Celebrity,24,Chitranagari,15,Chitrapat,11,Fashion,27,Feature,33,Festival,4,Gossip,33,Health,21,Hollywood,8,Latest,30,Lifestyle,20,Music,7,Natak,2,OTT Live,9,Photography,3,Relationship,26,Review,8,Short Film,3,Theater,4,Tollywood,1,Trailer,5,Trending,25,Video,16,Web Series,7,You Tuber,5,
ltr
item
Pikcharwala: अनपेक्षित शेवट असणाऱ्या आणि डोक्याला शॉट देणाऱ्या या 8 शॉर्टफ़िल्म YouTube वर फुकटात बघा
अनपेक्षित शेवट असणाऱ्या आणि डोक्याला शॉट देणाऱ्या या 8 शॉर्टफ़िल्म YouTube वर फुकटात बघा
https://1.bp.blogspot.com/-nWQ9lrTXwok/YL3cjb_yg-I/AAAAAAAAAA0/Qy5y7tKikdgWTbS0aXXaobfVeETHPPGIgCLcBGAsYHQ/s320/ahalya%2Bradhika%2Bapate%2Bshortfilm%2BPikcharwala.jpg
https://1.bp.blogspot.com/-nWQ9lrTXwok/YL3cjb_yg-I/AAAAAAAAAA0/Qy5y7tKikdgWTbS0aXXaobfVeETHPPGIgCLcBGAsYHQ/s72-c/ahalya%2Bradhika%2Bapate%2Bshortfilm%2BPikcharwala.jpg
Pikcharwala
https://www.pikcharwala.com/2021/06/8-youtube.html
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/2021/06/8-youtube.html
true
2767188615897253807
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content