असं बऱ्याचदा म्हटलं जातं की, सिनेमा क्षेत्रात आपण जगाच्या बरेच पाठीमागे आहोत. मात्र असे काही नाही. कारण ‘उत्तम दर्जा’ असणाऱ्या फिल्म बनवण्या...
असं बऱ्याचदा म्हटलं जातं की, सिनेमा क्षेत्रात आपण जगाच्या बरेच पाठीमागे आहोत. मात्र असे काही नाही. कारण ‘उत्तम दर्जा’ असणाऱ्या फिल्म बनवण्यात आपण जगाच्या बरोबरीने आहोत. फक्त असे चित्रपट आपल्याकडे तुलनेने कमी बनतात, याचा अर्थ आपण सिंमात जगाच्या पाठीमागे आहोत, असा होत नाही.
प्रत्येक वर्षी भारताकडून एक चित्रपट ऑस्करसाठी पाठवला जातो. वर्षभरात अनेक चित्रपट बॉलीवूड आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये बनवले जातात. काही चित्रपट सुंदर, अफाट आणि अफलातून असतात. मात्र तसा प्रेक्षक भारतात नसल्याने हे चित्रपट विशेष असे चालत नाहीत.
भारतातील विविध भाषांमधील या 8 चित्रपटांना ऑस्करमध्ये पाठवले गेले असते तर या देशी चित्रपटांनी नक्कीच ऑस्करवरही भारताची छाप उमटवली असती. कारण या चित्रपटांना दर्शकांनीही मोठा प्रतिसाद दिला होता.
1) उड़ान :- विक्रमादित्य मोटवानी यांचा हा पहिला चित्रपट उडान हा वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे. खरं तर हा चित्रपट 2003 मध्येच लिहिला गेला होता मात्र त्यावेळी त्यांना कोणी प्रोड्यूसर मिळत नव्हता. अखेर 2010 साली हा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाने चांगली कमाई तर केलीच तसेच लोकांची मनेही जिंकली.
2) The Lunch Box :- या चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. एवढेच नाही तर अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला अवार्ड्सही मिळाले. या चित्रपटात एक अशी लव्ह स्टोरी होती, जी भारतातील लोकांनी याआधी कधीच पहिली नव्हती. इरफ़ान ख़ान आणि निम्रत कौर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर या चित्रपटातील पात्र सजीव केली होती.
3) A Wednesday :- नीरज पांडे लिखित और निर्देशित A Wednesday हा चित्रपट म्हणजे भारतीय सिनेमाचा कळस होता. या चित्रपटाची चक्क हॉलीवूडने कॉपी केलेली आहे. साधारणपणे हॉलीवूडची कॉपी बॉलीवूड करत असते मात्र या चित्रपटाने अशी काही किमया केली की, चक्क हॉलीवूडने या चित्रपटाची कॉपी केली. A Common Man नावाने या चित्रपटाची कॉपी हॉलीवूडने केली होती.
4) गैंग्स ऑफ़ वासेपुर :- 2 भागात रिलीज झालेला हा चित्रपट आता अनेक बाबतीत कल्ट झालेला आहे. या चित्रपटातील अनेक संवाद लोकांच्या दैनंदिन आयुष्यात वापरले जातात. अनेक लोकांचे असे म्हणणे आहे की, जर ‘गैंग्स ऑफ़ वासेपुर’ ऑस्करला पाठवला असता तर ऑस्कर आपल्याकडेच आला असता.
5) पाथेर पंचाली :- चित्रपट क्षेत्राचे गुरु मानले जाणारे ‘सत्यजीत रे’ यांचा ‘पाथेर पंचाली’ हा चित्रपट आजही लोकांच्या Must Watch लिस्टमध्ये आहे. 1955 ला रिलीज झालेल्या या चित्रपटाची कथाही ‘सत्यजीत रे’ यांनीच लिहिली होती. या चित्रपटाला तत्कालीन ‘बंगाल सरकारने’ प्रोड्यूस केले होते. भारताने 1958 पासून ऑस्करला सिनेमे पाठवण्यास सुरुवात केली. जर ‘पाथेर पंचाली’ पाठवला असता तर नक्कीच ऑस्कर भारताकडे असता.
6) Kaasav (कासव) :- 2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘कासव’ या मराठी चित्रपटाला सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय फ़िल्मचा पुरस्कार मिळाला. हा चित्रपट ऑस्करला पाठवला जाणार होता मात्र तमिळ चित्रपट Interrogation पाठवला गेला.
7) Nayakan :- तमिळ भाषेत असलेला हा चित्रपट एका गैंगस्टरची कहाणी आहे. हा चित्रपट मणिरत्नम यांनी लिहिला. असे म्हटले जाते की, या चित्रपटाची कथा मुंबईचा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन Varadarajan Mudaliar च्या आयुष्यावर आधारित आहे. 2005 मध्ये या चित्रपटाला टाइम मैगझीनने आपल्या 100 All Time Best Movies च्या लिस्टमध्ये या चित्रपटाला स्थान दिले होते.
8) Iruvar :- मणिरत्नम यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक जबरदस्त चित्रपट बनवले. मात्र एकदा त्यांनी म्हटले होते की, मी बनवलेली आजवरची बेस्ट फिल्म Iruvar ही आहे. या चित्रपटाची कहाणी 1950 च्या दरम्यानची होती. तमिळचे राजकारण आणि चित्रपट यांच्यातील संबंधावर हा चित्रपट आधारित आहे. अर्थात हा चित्रपट त्याकाळी फ्लॉप ठरला होता. एवढेच काय तर या चित्रपटाला अनेक राजकीय नेत्यांचा आणि पक्षांचा विरोध स्वीकारावा लागला होता.
लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी
पिक्चरवाला
| ताज्या बातम्यांसाठी फॉलो
करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS