आजच्या युगात बॉलिवूड स्टार्सकडे पैशाची कोणतीही कमी नाही. बॉलिवूड स्टार्सना एका चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये मिळत असतात. अक्षय कुमार, सलमान ख...
आजच्या युगात बॉलिवूड स्टार्सकडे पैशाची कोणतीही कमी नाही. बॉलिवूड स्टार्सना एका चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये मिळत असतात. अक्षय कुमार, सलमान खान, हृतिक रोशन आणि अजय देवगन सारख्या स्टार्स 1 चित्रपटासाठी 40 ते 45 कोटी रुपये घेतात. याचा अर्थ असा की, जर त्यांनी एका वर्षात 2 चित्रपट केले तरी ते 100 कोटी रुपये सहजासहजी कमवतात. जर चित्रपट हिट किंवा सुपर हिट झाला तर त्यातही त्यांचा नफा ठरलेला असतो.
आज आम्ही अशाच 10 बॉलिवूड स्टार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी चित्रपट हिट किंवा सुपरहिट झाल्यावर आपली फी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.
1) कंगना रनौत (क़्वीन) :- बॉलिवूड क्वीन कंगना ही एखाद्या चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेणारी बॉलिवूड अभिनेत्री आहे. क़्वीन या चित्रपटानंतर कंगनाने तिच्या फी मध्ये 50% वाढ केली. कंगनाने तिच्या आगामी 'थलावी' चित्रपटासाठी 24 कोटी रुपयांची भरमसाट फी घेतली आहे. यासह ती बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे.
2) रणबीर कपूर (संजू) :- संजू या चित्रपटाच्या आधी रणबीर कपूरचे फिल्मी करिअर काही ठीक चालले नव्हते. गेल्या काही वर्षांत रणबीरचे बहुतेक चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे त्याला चांगले चित्रपट ऑफर होत नव्हते, परंतु आता संजूच्या सुपरहिटनंतर रणबीरने केवळ चित्रपटासाठीच नव्हे तर अॅन्डोर्समेंट फी देखील 3 कोटींवरून थेट 6 कोटीवर नेली आहे.
3) शाहिद कपूर (कबीर सिंह) :- गेल्या वर्षी 'कबीर सिंह' सारख्या सुपर डुपर हिट चित्रपटानंतर शाहिद कपूरने आपली चित्रपट फी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. 'पद्मावत' चित्रपटासाठी 10 कोटी फी घेतलेल्या शाहिद आता प्रत्येक चित्रपटासाठी 35 कोटी रुपये भरमसाठ फी आकारत आहे.
4) विकी कौशल (उरी- द सर्जिकल स्ट्राइक) :- 2019 सालचा सर्वात मोठा हिट उरी - सर्जिकल स्ट्राइक दिल्यानंतर विकी कौशलनेही फी वाढविली आहे. विकीने स्वत: अलीकडेच कबूल केले आहे की, उरी हिट झाल्यानंतर त्याने फी वाढविली आहे.
5) करीना कपूर (वीरे दि वेडिंग) :- 2016 मध्ये 'की अँड का' आणि 'उडता पंजाब', 2018 मध्ये 'वीरे दी वेडिंग', 2019 मध्ये 'गुड़ न्यूज' यासारख्या हिट चित्रपटानंतर करिनाने तिच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटासाठी तिच्या आधीच्या फी पेक्षा 50% जास्त रक्कम घेतली आहे.
6) रणवीर सिंह (सिंबा) :- 'पद्मावत'च्या सुपरहिटनंतर रणवीर सिंगने आपली फी 10 कोटींवरून 13 कोटींवर नेली होती. पण 'सिंबा' आणि 'गल्ली बॉय' सारख्या हिट चित्रपटानंतर आता रणवीर सिंगने आगामी प्रोजेक्टसाठी फी भरमसाठ वाढविली आहे.
7) आयुष्मान खुराना (ड्रीम गर्ल) :- कमी बजेटच्या चित्रपटाचा किंग असणारा आयुष्मान खुराना गेल्या काही वर्षांपासून सतत सुपरहिट चित्रपट देत आहे. 'ड्रीम गर्ल' पूर्वी आयुष्मान प्रति फिल्म 2 ते 3 कोटी आकारत असे, पण 'ड्रीम गर्ल' हिट झाल्यानंतर आयुष्मान आता प्रत्येक चित्रपटासाठी 10 कोटी फी घेत आहे.
8) प्रियंका चोपड़ा (द स्काई इज़ पिंक) :- बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी प्रियंका चोप्रा बॉलिवूडमध्ये प्रति फिल्म सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. प्रियांकाने 'द स्काई इज पिंक' या चित्रपटासाठी नफ्यातील वाटा घेतला. असे करणारी ती बॉलिवूडची एकमेव अभिनेत्री आहे.
9) कार्तिक आर्यन (सोनू की टीटू की स्वीटी) :- 'प्यार का पंचनामा' सारख्या हिट चित्रपटाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारा कार्तिक आर्यन आज तरूणांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. 'सोनू की टीटू की स्वीटी' या हिट फिल्मनंतर कार्तिक आर्यन प्रत्येक चित्रपटासाठी 7 कोटी फी घेत आहे.
संपादन:- विनोदकुमार सूर्यवंशी
पिक्चरवाला
| ताज्या बातम्यांसाठी फॉलो
करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS