‘शोले’ नसलेला बॉलीवूडची कल्पना करा, असे कुणाला सांगितल्यास समोरून उत्तर येईल ‘शक्यच नाही’. खरंय... जो सिनेमा आज इतक्या वर्षानंतरही भारतीयांच...
‘शोले’ नसलेला बॉलीवूडची कल्पना करा, असे कुणाला सांगितल्यास समोरून उत्तर येईल ‘शक्यच नाही’. खरंय... जो सिनेमा आज इतक्या वर्षानंतरही भारतीयांच्या डोक्यात बसलेला आहे, त्याच्याशिवाय बॉलीवूडची कल्पना करणे, अशक्यच गोष्ट आहे. शोले हा एक असा चित्रपट आहे ज्याशिवाय बॉलीवूड अपूर्ण आणि फिके आहे. या चित्रपटाच्या यशाचा अंदाज लावायचा असल्यास एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे या चित्रपटाला 1999 साली बीबीसी इंडिया कडून 'फ़िल्म ऑफ़ द मिलेनियम'च्या उपाधीने गौरविण्यात आले.
याशिवाय प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक शेखर कपूरसह अनेक मोठ्या हस्ती असे मानतात की, भारतीय सिनेमात ‘शोले’पेक्षा दमदार अशी फिल्म अजूनही आलेली नाही. आजपासून 4 दशकं जुन्या असलेल्या या चित्रपटाविषयी तुम्ही अनेक गोष्टी आणि किस्से ऐकले असतील. जसे की, या चित्रपटाचे हिरो जय-विरू आहेत, व्हिलन गब्बर आहे मात्र एक गोष्ट लक्षात घ्या... कुणी कितीही हवा केली तरी मास्टरमाईंड फक्त ठाकुर आहे.
1975 पर्यंत हिंदी सिनेमाला चांगले दिवस आलेले नव्हते. चांगले चित्रपट आले तरी त्याला अपेक्षित प्रेक्षक मिळायचा नाही. मात्र त्याच वर्षी शोले आला आणि असा चमत्कार झाला, जो याआधी ,कधीच झाला नव्हता.
15 ऑगस्ट 1975 शोले हा चित्रपट भारतात सगळीकडे रिलीज झाला. मात्र लोक सिनेमा थिएटरकडे फिरकत नव्हते. सुरुवातीच्या काळात ‘शोले’ला मिळालेला रिस्पॉन्स बघता हा सिनेमा फ्लॉप होणार, असे दिसू लागले. पहिले 3 आठवडे शोले पाहण्यासाठी अजिबातच गर्दी झाली नाही. दरम्यान एका वृत्तपत्रात तर शोले हा चित्रपट फ्लॉप झाला असल्याची बातमीसुद्धा छापली. आता शोले पडणार असे दिसत असताना काय चमत्कार झाला माहिती नाही पण हळूहळू हा सिनेमा पाहण्यास गर्दी वाढू लागली. लोकांना हा चित्रपट आवडल्याने माउथ पब्लिसिटी झाली आणि आता मात्र थिएटरला गर्दी उसळू लागली.
तसे पहिले तर शोले चित्रपटातील प्रत्येक भूमिका आणि जवळपास सगळेच डायलॉग चित्रपट पाहणाऱ्याच्या लक्षात असतील. आजही अनेक लोकांना असे वाटते की, ही फिल्म जय-वीरू किंवा गब्बर सिंह ची आहे. मात्र तसे काहीही नसून या चित्रपटाचे खरे मास्टरमाईंड ठाकुर म्हणजे संजीव कुमार होते.
जय-विरू च्या या अनाडी जोडीला रामगढ आणणे असो वा गब्बरला कायम धमकी देऊन थेट भिडणे असो... हे सगळं करण्यामागे होता एकमेव माणूस... मास्टरमाईंड ठाकुर.
संजीव कुमार यांनी आपल्या तगड्या अभिनयाने ठाकूर या पात्राला अजरामर केले. आजही गब्बर आणिजय-विरूपेक्षा जास्त जोक्स, मिम्स हे ठाकूरवर होतात.
बदल्याची आग मनात ठेऊन ठाकूर जाणीवपूर्वक काही खेळ रचत असतो, ज्यातून तो गब्बरला संपवू शकेन, यात तो मोलाची मदत मागतो ती जय-वीरूकडे. खरं पाहता हात नसलेला ठाकूरचा हा सिनेमा मोठा करण्यात मोठा हात आहे. हाताची ताकद नसलेला ठाकूरच या सिनेमात सगळ्यात शक्तिशाली आहे, कारण या सिनेमाची कहाणी ठाकूरच्या म्हणण्यानुसार फिरत असते.
गब्बर सिंगवर कधी हल्ला करायचा? त्याला कसे संपवायचे? हे सगळं ठाकूर ठरवत असतो. मात्र सगळा चित्रपट संपल्यावर हे लक्षात येतं की, हिरो कुणीही असलं तरी सिनेमाचा मास्टरमाईंड ठाकूरच आहे.
धर्मेंद्र, अमिताभ, अमज़द ख़ान, हेमा मालिनी आणि जया बच्चनसारखे तगडे कलाकार असतानाही आपल्या अभिनयाचे वजन संजीव कुमार यांनी दाखवून दिले. कमी बोलणे आणि चेहऱ्यावर दिसणाऱ्या हावभावातून त्यांनी ठाकूर हे पात्र जिवंत केले. संपूर्ण चित्रपटात संजीव कुमार यांचा असणारा वावर भाव खाणारा होता.
हे डायलॉग आजही आहेत अजरामर :-
ये हाथ नहीं… फ़ांसी का फंदा है
लोहा गरम है…मार दो हथौड़ा
क़ीमत जो तुम चाहो…काम जो मैं चाहूं
रामगढ़ वालों ने पागल कुत्तों के सामने रोटी डालना बंद कर दिया है
ठाकुर न झुक सकता है, न टूट सकता है…ठाकुर सिर्फ़ मर सकता है
पिक्चरवाला
| ताज्या बातम्यांसाठी फॉलो
करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS