हिंदीचा पहिला कॉमेडी सुपरस्टार : दारुड्याचा रोल करणाऱ्या जॉनी वॉकर यांनी कधीच प्यायली नाही खऱ्या आयुष्यात दारू

मालिश मालिश मालिश... तेल मालिश... सर जो तेरा चकराए और दिल डूबा जाए, आजा प्यारे पास हमारे, काहे घबराये, काहे घबराये हे गाणं आठवलं की, आपल्यास...

मालिश मालिश मालिश... तेल मालिश... सर जो तेरा चकराए और दिल डूबा जाए, आजा प्यारे पास हमारे, काहे घबराये, काहे घबराये हे गाणं आठवलं की, आपल्यासमोर येतो एक हसरा चेहरा. आज जसं भाऊ कदमला पाहिल्यावर मराठी माणूस हसतो. तसच एकेकाळी हा चेहरा समोर आला तरी हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांना गुदगुल्या व्हायच्या.

हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांना पहिल्यांदा कुणी हसवले असेल आणि सिनेमात कॉमेडीही चालते हे कुणी दाखवून दिले असेल तर ते जॉनी वॉकर. भारतीय सिनेमाच्या 100 वर्षात अगदी बोटावर मोजण्याइतके तगडे कॉमेडी अभिनेते झाले. त्यात जॉनी यांचे नाव सर्वप्रथम येते. कॉमेडी करूनही ‘अभिनेता’ अशी ओळख मिळवणारा एकमेव अवलिया म्हणजे जॉनी वाकर होय.  

जॉनी हे नाव जेव्हा नव्या प्रेक्षकाच्या समोर येतं तेव्हा त्यांना पहिला प्रश्न हा पडतो की, या माणसाला दारूचे नाव का दिले आहे? हा नेमका काय प्रकार आहे. तर किस्सा असा आहे की, जॉनी वाकर हे मुंबईत बेस्टला बस कंडक्टर म्हणून काम करत होते. त्यावेळी एकदा त्यांची भेट बलराज साहनी यांच्याशी झाली. जॉनी यांनी आपले अंगभूत गुण त्यांना दाखवले आणि या बस कंडक्टरला साहनी यांनी गुरुदत्त  यांच्याकडे पाठवले. त्यावेळी साहनी हे गुरुदत्तसाठी एक सिनेमा लिहित होते. 

दुसर्या दिवशी जॉनी यांनी थेट सेटवर जाऊन गुरुदत्त यांची भेट घेतली मात्र वेगळ्याच रुपात. तिथे ते एका बेवडा म्हणून घुसले. आणि आश्चर्य म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या कुणालाच वाटले नाही की, हा माणूस दारू पिलेला नाही. 

गुरुदत्त यांना जॉनीची ही शैली भावली. आणि त्यांनी तात्काळ आपल्या 'बाज़ी' या चित्रपटात ‘जॉनी’साठी खास सीन लिहायला सांगितला. मग पुढे गुरुदत्त यांच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात ‘जॉनी’ असायचेच. 

जॉनी यांनी अनेकदा दारुड्याचे रोल केले होते. जॉनी वॉकर यांचे खरे नाव बदरुद्दीन जलाउद्दीन काज़ी होते. मात्र लोक त्यांना दारूचा मोठा ब्रांड असलेल्या ‘Johnny Walker’ नावाने ओळखत. त्यांनी अनेकदा बेवड्याचे रोल केल्याने त्यांना ‘जॉनी वॉकर’ नाव मिळाले. मात्र खरी परिस्थिती अशी होती की, जॉनी यांनी उभ्या आयुष्यात दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नव्हता. मात्र त्यांचा दारुड्याचा अभिनय बघितल्यावर कुणाला विश्वास बसत नसायचा. 

जॉनी हे इतके अफलातून कलाकार होते की, चित्रपट शूट व्हायच्या आधल्या दिवशी गुरुदत्त ‘जॉनी’ यांना संवाद सांगायचे. आणि म्हणायचे की, हे तुमचे संवाद आहेत. उद्या शुटींग आहे. तुम्ही हे वाचून तुमच्या बाजूने त्या रोलला अजून खुलवा. तुम्ही त्यात काही संवाद Add करू शकता. 

दुसऱ्या दिवशी जेव्हा जॉनी शूट करायचे. तेव्हा ते नक्कीच काहीतरी नाविन्यपूर्ण करायचे. तसेच आपल्या रोलशी निगडीत काही प्रयोगही ते करायचे. गुरुदत्त यांना जॉनीचा असा प्रयोगशील स्वभाव आवडायचा. 

जॉनी यांचा सीन संपल्यावर टीममधील उपस्थित मंडळी जॉनीच्या अभिनयासाठी टाळ्या वाजवत असतील किंवा अभिनय पाहून मनसोक्त हसत असतील, तरच गुरुदत्त हा सीन आपल्या चित्रपटात घ्यायचे. 

जॉनी हे कदाचित एकमेव असे कॉमेडियन आहेत ज्यांना चित्रपटाच्या ‘हिरो’इतकीच प्रसिद्धी आणि लोकप्रियता लाभली. आज जसे चित्रपटात एक का होईना ‘आयटम सॉंग’ असते ज्याच्या जीवावर चित्रपट चालतो. तसेच त्याकाळी जॉनी वाकर यांच्यासाठी चित्रपटात एक गाणे कायमच ठेवले जायचे. 'ये है बम्बई मेरी जान...', या अफाट गाजलेल्या गाण्यानंतर जॉनी यशाच्या शिखरावर होते. त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्यांची डिमांड गाण्यासाठी इतकी वाढली होती की, चित्रपटाचे निर्माते हे जॉनी यांच्यासाठी एक गाणे कायमच राखीव ठेवत होते.

जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम केल्यावरही जॉनी यांच्या कुठल्याच डायलॉगला आजवर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावलेली नाही. एवढेच काय तर तुम्ही त्यांचे सगळे चित्रपट बघून काढा, त्यांच्या अभिनयात कायमच तुम्हाला नाविन्य जाणवेल. असे खूप कमी कॉमेडीयन आहेत जे आपल्या अभिनयात नाविन्य दाखवतात. 

जाने कहां मेरा जिगर गया जी, ये है बम्बई मेरी जान, सर जो तेरा चकराए अशी त्यांची गाणी कायम आपल्या जगण्याचे नवे अनुभव देतील. आजही त्यांच्या गाण्याची प्लेलीस्ट युट्युबवर आहे, हा पहिला आणि शेवटचा कॉमेडीयन असेल ज्याच्या गाण्याची प्लेलीस्ट युट्युबवर उपलब्ध आहे. आणि हेच त्यांच्या ‘अभिनेता’ असण्याचे यश आहे.

लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी

पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com

| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |

टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala

मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com


COMMENTS

नाव

Blog,11,Bollywood,34,Box Office,4,Celebrity,24,Chitranagari,15,Chitrapat,11,Fashion,27,Feature,33,Festival,4,Gossip,33,Health,21,Hollywood,8,Latest,30,Lifestyle,20,Music,7,Natak,2,OTT Live,9,Photography,3,Relationship,26,Review,8,Short Film,3,Theater,4,Tollywood,1,Trailer,5,Trending,25,Video,16,Web Series,7,You Tuber,5,
ltr
item
Pikcharwala: हिंदीचा पहिला कॉमेडी सुपरस्टार : दारुड्याचा रोल करणाऱ्या जॉनी वॉकर यांनी कधीच प्यायली नाही खऱ्या आयुष्यात दारू
हिंदीचा पहिला कॉमेडी सुपरस्टार : दारुड्याचा रोल करणाऱ्या जॉनी वॉकर यांनी कधीच प्यायली नाही खऱ्या आयुष्यात दारू
https://1.bp.blogspot.com/-CkmzvDKIZng/YMHTruLa_2I/AAAAAAAAAZU/4y7IAkKoptImYobXZi6OUpNgJyfSC3nmgCLcBGAsYHQ/s320/johny%2Bwalker%2BPikcharwala.jpg
https://1.bp.blogspot.com/-CkmzvDKIZng/YMHTruLa_2I/AAAAAAAAAZU/4y7IAkKoptImYobXZi6OUpNgJyfSC3nmgCLcBGAsYHQ/s72-c/johny%2Bwalker%2BPikcharwala.jpg
Pikcharwala
https://www.pikcharwala.com/2021/06/blog-post_10.html
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/2021/06/blog-post_10.html
true
2767188615897253807
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content