बॉलीवूडच्या किंग खानचे खिसे नेहमीच असतात ‘रिकामे’; शाहरुख खानचे हे सिक्रेट्स तुम्हाला नक्कीच नसतील माहिती

असं म्हटलं जातं की, भारताला जगभरात 3 लोकांमुळे ओळखलं जातं, पहिले म्हणजे गौतम बुद्ध, दुसरे म्हणजे महात्मा गांधी आणि तिसरा बॉलीवूडचा किंग शाहर...


असं म्हटलं जातं की, भारताला जगभरात 3 लोकांमुळे ओळखलं जातं, पहिले म्हणजे गौतम बुद्ध, दुसरे म्हणजे महात्मा गांधी आणि तिसरा बॉलीवूडचा किंग शाहरुख खान... कारण जगभरातील सर्वसामान्य लोकांना शाहरुख खान माहिती आहे. अर्थात शाहरुखला बॉलीवूडचा किंग खान म्हटले जात असले तरीही शाहरुखची ओळख आता ‘ग्लोबल स्टार’ म्हणून आहे. 

गेली दोन दशके बॉलिवूडवर राज्य करणारा शाहरुख खान आज ग्लोबल स्टार बनला आहे. त्याची लोकप्रियता अफाट आहे. आज आम्ही तुम्हाला या ‘ग्लोबल स्टार’बद्दल कधीच माहिती नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत. 

1) शाहरुख खान नेहमीच आपले खिशात रिकामे ठेवतो. त्याच्या खिशात पाकिट, क्रेडिट कार्ड, पैसे किंवा सिगारेटही नसते. जेव्हा जेव्हा त्यांला सिगारेट प्यावीशी वाटते तेव्हा तो त्यांच्या मेकअप मॅनला किंवा इतर एखाद्या व्यक्तीकडे सिगरेटची मागणी करतो. शाहरुखला एकदा सिगारेट ओढायला लागला की अनेक सिगारेट संपून जातात. अजय देवगण आणि सलमान खान या त्याच्यासोबतच्या अभिनेत्यांनाही धूम्रपान करण्याची सवय आहे, मात्र हे दोघे शाहरुखसारखे खूप सिगारेट पीत नाहीत.

2) शाहरुख लहान असतानाच त्याचे आईवडील स्वर्गात गेले होते, परंतु शाहरुख खानची मोठी बहीण त्याच्याबरोबरच आहे. पण ती अत्यंत दुर्मिळ प्रसंगी सार्वजनिक ठिकाणी दिसून येते. शाहरुख आणि गौरी त्यांची काळजी घेतात. शहनाज लाला रुख खान असे तिचे नाव आहे.

3) शाहरुख खानला बाथरूममध्ये बराच वेळ घालवणे आवडते. कधीकधी तो दोन तास बाथरूममध्ये घालवतो. त्याला बाथरुम सिंगिगचीही आवड आहे. पण स्वत: शाहरुख कबूल करतो की, तो स्वतः एक वाईट गायक आहे.

4) ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार असूनही शाहरुख स्किन-शोबाबत कम्फर्टेबल नसतो. तसेच ‘मन्नत’ या त्याच्या घरी असणाऱ्या स्वीमिंग पूलमध्येही तो पोहताना दिसत नाही. याचे कारण शाहरुख खूपच लाजाळू आहे. (ही गोष्ट तर तुम्हाला नक्कीच माहिती नसेल. आणि असली तरीही त्यावर विश्वास कोणीच ठेवणार नाही. मात्र हे खरे आहे)

5) शाहरुख खानचा बिझिनेस सेन्स खूपच चांगला आहे. त्याला त्याच्या नावाचे ब्रँड मूल्य माहिती आहे. उदाहरणार्थ, आयपीएलमध्ये तो सर्वाधिक गुंतवणूक केलेला सेलिब्रिटी होता कारण त्याला माहित होते की, सुरुवातीला त्याला काही फायदा होणार नाही, मात्र काही हंगामांनंतर केकेआर हा नफा कमावणारा पहिला संघ बनला.

6) शाहरुख खान अनेक अनेक ठिकाणी समाजसेवा करत असतो, अनेक ठिकाणी आर्थिक मदतही करत असतो. त्याने नानावटी रुग्णालयात मुलांच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी बनविलेल्या वॉर्डसाठी मोठी देणगी दिलेली आहे. त्याची चॅरिटी इतर कोणत्याही बड्या सुपरस्टारपेक्षा कमी नाही. पण शाहरुखचे तत्व आहे की, जर तुम्ही एखाद्याला देणगी देत असाल तर त्याबद्दल सगळीकडे सांगत सुटण्याची गरज नसते. हेच कारण आहे की, गरिबांना केलेल्या मदतीबद्दल शाहरुख कधीच मीडियात सांगत नाही. काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराचा अपघात झाला होता. या अपघाताचा खर्च शाहरुखने केला मात्र ही गोष्ट त्याने कधीच मिडीयाला सांगितली नाही.  

7) शाहरुख खान कदाचित बॉलिवूडचा किंग असेल, परंतु त्याची एक वाईट सवय आहे की अनेक प्रयत्न करूनही सुटलेली नाही. शाहरुखने सिगारेट सोडण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. मात्र तरीही तो जास्त काळ सिगारेटशिवाय राहू शकत नाही. शाहरुखला सिगारेट प्यायची सवय अगदी कॉलेजच्या वयात लागली होती. गेल्या काही वर्षांमध्ये सिगारेट ही शाहरुखच्या पर्सेनेलिटीची हिस्सा बनलेली आहे. 

8) शाहरुखचा न्यूमरोलॉजीवर खूपच विश्वास आहे. जर तुम्हाला पश्चिम वांद्रे, मुंबई या भागात एखादी ब्रांड गाडी दिसली जिचा नंबर 555 आहे, तर ही गाडी शाहरुख खानची असण्याची दाट शक्यता आहे. 

लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी 

पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com

| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |

टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala

मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com

COMMENTS

नाव

Blog,11,Bollywood,34,Box Office,4,Celebrity,24,Chitranagari,15,Chitrapat,11,Fashion,27,Feature,33,Festival,4,Gossip,33,Health,21,Hollywood,8,Latest,30,Lifestyle,20,Music,7,Natak,2,OTT Live,9,Photography,3,Relationship,26,Review,8,Short Film,3,Theater,4,Tollywood,1,Trailer,5,Trending,25,Video,16,Web Series,7,You Tuber,5,
ltr
item
Pikcharwala: बॉलीवूडच्या किंग खानचे खिसे नेहमीच असतात ‘रिकामे’; शाहरुख खानचे हे सिक्रेट्स तुम्हाला नक्कीच नसतील माहिती
बॉलीवूडच्या किंग खानचे खिसे नेहमीच असतात ‘रिकामे’; शाहरुख खानचे हे सिक्रेट्स तुम्हाला नक्कीच नसतील माहिती
https://1.bp.blogspot.com/-jxDQUYp376c/YMVwk2Q1GcI/AAAAAAAAAbE/-xFeju7su0wumNUIMAFAoCbpiPZaW0-mQCLcBGAsYHQ/s320/srk%2BPikcharwala.png
https://1.bp.blogspot.com/-jxDQUYp376c/YMVwk2Q1GcI/AAAAAAAAAbE/-xFeju7su0wumNUIMAFAoCbpiPZaW0-mQCLcBGAsYHQ/s72-c/srk%2BPikcharwala.png
Pikcharwala
https://www.pikcharwala.com/2021/06/blog-post_13.html
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/2021/06/blog-post_13.html
true
2767188615897253807
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content