मुंबईतली वीज कधी कधी अचानक थोडय़ा वेळासाठी गायब होते. कारण, तेव्हा रजनीकांतने आपला फोन चार्जिगला लावलेला असतो. असे जगाच्या आक्रीत असलेले रजन...
मुंबईतली वीज कधी कधी अचानक थोडय़ा वेळासाठी गायब होते. कारण, तेव्हा रजनीकांतने आपला फोन चार्जिगला लावलेला असतो. असे जगाच्या आक्रीत असलेले रजनीकांत यांचे जोक्स आपण नेहमीच ऐकत असतो. त्यांचे चाहते त्यांना लाडाने ‘रजनी सर’ असे म्हणतात.
रजनी सरांचे चाहते हे फक्त दक्षिणात्य किंवा बॉलीवूड चित्रपटापुरते मर्यादित नाहीत. त्यांचे चाहते भारताबाहेर जगभरात पसरलेले आहेत. तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा तुम्हाला एक का होईना रजनी सरांचा चाहता सापडेल. रजनीकांत गायकवाड यांचा ‘रजनी सर’ होण्यामागच्या प्रवासाला फक्त त्यांचे अभिनेता असणे पुरेसे नव्हते. आजवर त्यांनी जो माणुसकीचा धर्म निभावत ज्या गोष्टी केल्या आहेत, त्यामुळे ते ‘रजनी सर’ झालेले आहेत.
आपल्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीत त्यांनी विविध भाषेत विविध चित्रपट केले. आजही त्यांचे चाहते रजनी सरांची फिल्म येणार असल्याचे कळल्यावर त्यांच्या फिल्मची अशी वाट बघतात की, जसे एखादा सण किंवा उत्सव येत आहे.
रजनी सर सुरुवातीच्या फक्त काळात एकाच कारणांमुळे प्रसिद्ध झाले, ती गोष्ट म्हणजे ‘स्टाईल’. खरं तर साधा बस कंडक्टर असतानाही रजनीकांत यांचे अनेक चाहते होते. ते म्हणजे बसमध्ये प्रवास करणारे लोक. रजनीकांत हे कंडक्टर असतानाही सिगारेट हवेत फेकायचे. ही सिगरेट पिण्याची स्टाईल लोकांना आवडली. आणि तिथूनच लोक रजनीकांतचे चाहते होऊ लागले.
नंतर चित्रपटसृष्टीत आल्यावर हळूहळू रजनीकांत यांची प्रत्येकच स्टाईल अनोखी झाली. लोक त्यांच्या स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न करू लागले. चित्रपटात काम करण्याची इच्छा असलेला प्रत्येक व्यक्ती आजही रजनी सरांची पूजा करतो. सिनेमा बॉलीवूडचा असो वा साउथचा... त्यांच्या ‘स्टाईल’चा प्रत्येकजन चाहता आहे.
रजनीकांतच्या प्रत्येक अदा लोकांना फिदा करणारी असते. त्यांनी केलेली स्टाईल पाहून तर अगदी थिएटरमध्येही टाळ्यांचा कडकडाट होत असतो. त्यांची डायलॉग बोलण्यापासून तर एक्शन करण्यापर्यंत सगळ्याच गोष्टींची ‘स्टाईल’ वेगळी आहे.
खांद्यावर गमजा घेणे, हवेत सिगारेट फेकने, चष्मा गोल गोल फिरवून मग डोळ्यांवर लावणे, या त्यांच्या सिग्नेचर स्टेप आहेत, जो प्रत्येकजण कॉपी करण्याचा प्रयत्न करतो.
मात्र वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही की, ज्या स्टाईलमुळे रजनीकांत फेमस झाले ती सिगारेट हवेत फेकण्याची आइकॉनिक स्टेप ही खुद्द रजनीकांत यांनीच कॉपी केलेली आहे.
अजून एक आश्चर्यकारक बाब म्हणजे ही स्टाईल एका बड्या आणि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याची कॉपी आहे. आता तुम्हाला वाटले असेल की, असे कसे होऊ शकते. कारण बॉलीवूडमध्ये तर आम्ही कुणालाच अशी स्टाईल करताना पाहिलेले नाही.
रजनी सरांनी ही युनिक स्टाईल सगळ्यांना ‘खामोश’ करणाऱ्या शत्रुघन सिन्हा यांची कॉपी केलेली आहे. विशेष म्हणजे रजनी सरांनी अनेक चित्रपटात ही स्टाईल मारली आणि ही स्टाईल पुढे त्यांच्याच नावाने फेमस झाली. नंतरच्या काळात तर साउथचा प्रत्येक हिरो ही स्टाईल मारत असायचा.
एका मुलाखतीत स्वतः रजनीकांत यांनी सांगितले होते की, शत्रुघन सिन्हा यांनी पहिल्यांदा ही स्टाईल हिंदी चित्रपटात केली होती. मला आवडल्याने मी या स्टाईलमध्ये बदल आणि सुधार केला. ही स्टाईल आपलीशी आणि वेगळी करण्यासाठी मी हजारो प्रयत्न केले. तेव्हा कुठे जाऊन ही स्टाईल निर्माण झाली. सिगारेट हवेत फेकने ही स्टाईल महत्वाची नसून यात टायमिंग खूप महत्वाचा आहे.
कारण मी सिगारेट हवेत फेकताना मला डायलॉगही बोलावे लागायचे. कधी कधी तर एक्टिंग करताना सिगारेट हवेत फेकणे आणि पुन्हा तोंडात पकडणे, हे खूप मुश्कील होते.
रजनी सरांना दक्षिणात्य इंडस्ट्रीत आणि त्या भागात देव मानले जाते, काही लोक तर त्यांची देवासारखी पूजासुद्धा करतात. भारतीय सिनेमात रजनीकांत यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्यासारखा कलाकार न आधी झाला न पुन्हा होईल कारण कलाकार हे बनत नसतात तर ते जन्माला येत असतात.
लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी
पिक्चरवाला
| ताज्या बातम्यांसाठी फॉलो
करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS