आपल्या सगळ्यांना अतुल कुलकर्णी एक अभिनेता म्हणून माहिती आहेत. मात्र त्यांना आम्ही ‘ग्रेट कलाकार’ का म्हणालो, हे आज या लेखातून तुम्हाला नक्की...
आपल्या सगळ्यांना अतुल कुलकर्णी एक अभिनेता म्हणून माहिती आहेत. मात्र त्यांना आम्ही ‘ग्रेट कलाकार’ का म्हणालो, हे आज या लेखातून तुम्हाला नक्कीच कळेल.
एक अभिनेता तेव्हाच ग्रेट ठरतो, जेव्हा तो माणूस म्हणूनही चांगला असतो. एखाद्या अभिनेत्याचं वैयक्तिक, वैचारिक, सामाजिक आयुष्य कसं आहे, यावरही त्याचं मोठेपण ठरवलं जातं.
आजवर मराठी, हिंदी, तामिळ, तेलगु, कन्नड़ आणि इंग्रजी सिनेमात काम करणाऱ्या अतुल कुलकर्णी यांची ओळख एक विचारी अशी आहे. आजवर त्यांनी जवळपास 90 चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र यातील प्रत्येक सिनेमात त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची अमीट छाप उमटवली.
10 वीत असताना अतुल कुलकर्णी यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. आणि 12 वीलाच ते नापास झाले. ‘तो काळ माझ्यासाठी मोठा कठीण होता. याच काळाने माझ्या आयुष्याला मोठी कलाटणी दिली आणि मला ‘माणूस’ बनवलं’, असं अतुल सांगतात.
12 तच नापास झालेल्या अतुल यांना पास झाल्यावर एका प्रतिष्ठीत इंजिनिअरींग कॉलेजमध्ये एडमिशन घेतली मात्र तिथेही त्यांचे मन रमेना, 2-3 वर्षे तिथे गेल्यावर अतुल यांच्या लक्षात आले की, हे आपलं क्षेत्र नाही. मग पुन्हा नाटकाकडे वळण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांना एनएसडीला प्रवेश घ्यायचा होता. एनएसडीला प्रवेश घेण्यासाठी कुठल्याही शाखेतून पदवी पूर्ण असणे, गरजेचे असते.
प्रतिष्ठीत कॉलेजमध्ये संधी असतानाही ‘मला इंजिनिअरींग करायची नाही’, हे घरी सांगणे आणि त्यानंतर नाटकासारख्या बेभरवश्याचा क्षेत्रात प्रवेश करणे, हा निर्णय मोठा होता. मात्र हा निर्णय घरच्यांना सांगणे, हे त्यापेक्षाही कठीण होते.
समजा इंजिनिअरींग सोडली तर थेट एनएसडीमध्ये प्रवेश लगेच मिळणार नव्हता कारण अतुल यांच्याकडे पदवी नव्हती. आधीच 12 नापास झाल्याने त्यात 1 वर्ष वाया गेलेलं. त्यात 2-3 वर्षे इंजिनिअरींगमध्ये वाया घातली आणि पुन्हा आता पदवी मिळवण्यासाठी कमीत कमी 3 वर्षे जाणार होती. हा सगळा 7-8 काळ वर्षांचा खरं तर अतुल यांची परीक्षा बघणारा होता.
अखेर पदवी पास झाल्यावर अतुल यांनी एनएसडीमध्ये प्रवेश मिळवला. आणि अभिनयाच्या उंच शिखराकडे त्यांची वाटचाल सुरु झाली. 1995 साली ते एनएसडीमधून उत्तीर्ण झाले आणि आता त्यांनी मायानगरी मुंबईकडे कूच केली.
अतुल कुलकर्णी यांना पहिला चित्रपट मिळाला तो म्हणजे 'हे राम' आणि पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि पहिल्याच चित्रपटातून त्यांनी थेट लोकांची आणि इंडस्ट्रीतील बड्या कलाकारांची मने जिंकली.
हळूहळू त्यांना अनेक मोठमोठ्या चित्रपटांमध्ये बड्या ह्स्तींसोबत काम करण्याची संधी मिळाली. ‘चांदणी बार’ या चित्रपटातील भुमिकेसाठी त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि आता ते स्वतःच अभिनयातील बडी हस्ती बनले.
रंग दे बसंती, हे राम, चांदणी बार, बंदिश बैंडिट्स, दिल्ली 6, रायकर केस, खाकी, मणिकर्णिका, पेज 3 या हिंदी तर नटरंग, वळू, 10वी फ, राजवाडे अँड सन्स, प्रेमाची गोष्ट, ध्यासपर्व, हॅपी जर्नी, या मराठी चित्रपटातील त्यांच्या भूमिका लोकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून गेल्या.
'सिंग्युलॅरिटी' या हॉलीवूड चित्रपटातही त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली. अस्सल मराठमोळ्या असणाऱ्या या अभिनेत्याने हॉलीवूड पर्यंतमजल मारली. पर्यावरण या क्षेत्रात अतुल यांचे मोठे काम आहे. एवढेच नाही तर आजवर त्यांनी जाणीवपूर्वक मुल होऊ दिलेलं नाही. त्यांच्या पत्नी गीतांजली कुलकर्णी याही अभिनेत्री आहेत. त्यांची ओळख आणि मैत्री एनएसडीमध्ये झाली होती.
आम्ही तेव्हाही मित्र होते, आजही तसेच मित्रच आहोत, असे अतुल यांनी यापूर्वी अनेकदा सांगितले आहे. त्यांच्या मूल न होऊ देण्याच्या निर्णयात त्यांच्या पत्नीनेही साथ दिली कारण त्यामागची त्यांची भूमिका ही खूपच प्रेरणादायी आहे. अतुल यांची पत्नी गीतांजली यांनीही अनेकदा सांगितले आहे की, अतुलची बायको असण्यापेक्षा मी त्याची शिष्या जास्त आहे. अतुल यांचे माणूस म्हणून विचार, त्यामागची भूमिका आणि अभिनयापलीकडे जाऊन त्यांनी विविध क्षेत्रात केलेलं काम हे त्यांची दूरदृष्टी दाखवणारे आहे. अतुल हे चित्रपटसृष्टीत काम करत असले तरीही त्यांच्या घरी टीव्ही नाही.
अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे अतुल कुलकर्णी यांनी अभिनेता ते ग्रेट कलाकार असा प्रवास पार केला आहे.
लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी
पिक्चरवाला
| ताज्या बातम्यांसाठी फॉलो
करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS