एक काळ होता, जेव्हा फिल्म्स फक्त प्यार-मोहब्बत आणि तत्सम विषयांना घेऊन असायच्या. मोठी मोठी घरे, चकचकीत सुंदर चेहरे, त्यांची गोड गोड भाषा, त्...
एक काळ होता, जेव्हा फिल्म्स फक्त प्यार-मोहब्बत आणि तत्सम विषयांना घेऊन असायच्या. मोठी मोठी घरे, चकचकीत सुंदर चेहरे, त्यांची गोड गोड भाषा, त्यांच्या प्रथा मग पुढे जाऊन चित्रपटात काहीतरी अघटीत घडते आणि शेवटी चित्रपटाचा ‘हॅप्पी एंडिंग’ होतो. अशाच चित्रपटांची सवय असलेल्या आपल्याला अनुरागने दिला एक नवा सिनेमा... ज्यात असायच्या भेन्चोद, मादरचोद अशा शिव्या, ज्यात दिसायचा लफड्यांचा बाजार, ज्यात स्पष्ट दिसायचा पुरुषांच्या नजरेतील नालायकापना, ज्यात असायची साधी घरं, मेकप नसलेली मानसं आणि निव्वळ त्या कथेतील अस्सलपणा.
शाहरुख, सलमान, अजय आणि अक्षयला घेऊन करण जोहर आणि मंडळींनी श्रीमंतांच्या सिनेमात जे दाखवलं ते अनुरागच्या कुठल्याही सिनेमात नव्हतं. त्यानेही श्रीमंतांचे सिनेमे केले पण खऱ्या गोष्टी सांगणारे.
‘उस हरामी को मिटाना है हमे, गोली नही मारेंगे, केह के लेंगे उसकी’, 'सरदार ख़ान नाम है हमारा, बता दीजिएगा उसको', ‘हिंदुस्तान मे जब तक सिनेमा है, तब तक लोग चुतीया बनते रहेंगे’, असे काही फेमस डायलॉग तुम्ही ऐकले असतील. या डायलॉगवर मिम्स झाले, जे खऱ्या आयुष्यात लोकांनी सर्रास वापरले. आणि आजही अनुरागच्या चित्रपटातील डायलॉग लोक बोलताना वापरतात.
'सरदार ख़ान नाम है हमारा, बता दीजिएगा उसको.' 'गँग्स ऑफ वासेपुर' पाहिल्यानंतर कदाचित हा डायलॉग कोणी विसरला असेल. जेव्हा जेव्हा अनुराग कश्यप एखादा चित्रपट बनवतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला काहीतरी नवीन नक्कीच पाहायला मिळते. कदाचित यामुळेच हिंदी चित्रपटप्रेमींना चित्रपटांतील वेगळेपणा पाहायला मिळाला आणि अशाही प्रकारे चित्रपट बनू शकतात, हेही समजले.
'सत्या', 'गैंग्स ऑफ़ वासेपुर' 'देवडी', 'ब्लैक फ़्राइडे', 'नो स्मोकिंग' आणि 'द गर्ल इन यलो बूट्स', सारखी डार्क आणि Realistic चित्रपट करणारा अनुरागने कायमच वेगळ्या धाटणीच्या फिल्म्स केल्या आहेत. आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून अनुराग समाजाचा दृष्टीकोन बदलण्यास यशस्वी झाला, हे आपल्याला मान्यच करावा लागेल.
अनुरागच्या चित्रपटांमध्ये तुम्हाला साधी, पडकी घरे दिसतील. गल्ल्या-बोळी दिसतील. त्याच्या जवळपास सर्वच फिल्म्समध्ये लोकेशन पण देसी असतात. एकूणच काय तर अनुराग आपले चित्रपट एकदम देसी तडका लावून बनवतो.
एवढेच नाही तर अनुरागच्या 'मनमर्ज़ियां', 'मुक्काबाज़' आणि 'गुलाल'सारख्या चित्रपटांनी लोकांचे भरपूर मनोरंजनही केले. गुलाल सारखा चित्रपट तर इतका अफाट होता की, गेल्या काही वर्षात असा चित्रपट झालेला नाही, असे माझे वैयक्तिक मत आहे.
भव्य सेट, महागडे लोकेशन, इंडस्ट्रीवर राज्य करणारे सुपरस्टार यांच्याशिवाय आणि कमी बजेटमध्ये चित्रपट होऊ शकतो आणि तो हिट सुद्धा होऊ शकतो, हे अनुरागमुळे कळले. अनुरागने नेहमी खऱ्या कथा चित्रपटांमधून मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच लोकांना त्याचे चित्रपट आपलेसे वाटले आणि भावले.
सेंसर बोर्ड आणि अनुराग कश्यपचा 36 चा आकडा आहे. त्यामुळेच अनुरागच्या फिल्ममधील अनेक सिन्स कट करावे लागतात.
गोरखपूरमध्ये जन्मलेले अनुराग कश्यप मुंबईत 5 ते 7 हजार रुपये घेऊन आले होते. पैशांच्या अभावामुळे त्यांना बर्याच वेळा रस्त्यावर झोपावे लागले. यानंतर त्यांना कशीतरी पृथ्वी थिएटरमध्ये काम करण्याची संधी मिळाली, पण दिग्दर्शकाच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्यांचे पहिले नाटकही अपूर्ण राहिले. यानंतर त्यांनी ‘पांच’ नावाची एक जबरदस्त फिल्म केली. परंतु सेन्सॉरबोर्डच्या विरोधामुळे हा चित्रपट आजपर्यंत प्रदर्शित होऊ शकला नाही.
लोकांना त्यांच्याच आयुष्यातील खरेपणा दाखवणाऱ्या अनुरागने वैयक्तिक आयुष्यात अनेक धक्के खाल्ले आहेत. चित्रपट करायचे तर खरेखुरे अन्यथा नाही, अशी अनुरागची सवय आहे. लोक जेव्हा मोठ्या शहरातील चकचकीत, मुलायम सिनेमे करत होते तेव्हा अनुराग छोट्या शहरातील, खेड्यातील कथा घेऊन चित्रपट करत होता.
अनुरागच्या चित्रपटातील काही डायलॉग, ज्यावर थिएटरमध्ये टाळ्या पडायच्या.
1) करना है तो करना है – सत्या
2) तेरे बाप ने सही टाईम पे विड्रो किया होता तो तुम लोग हरामजद्गी से बचते.
3) हिरो बनना है तो कॉमेडी छोड, कुक्कु को सिर्फ एक्शन पसंद है- सिक्रेड गेम्स
4) बाप का, भाई का, सबका बदला लेगा, तेरा फैजल - 'गँग्स ऑफ वासेपुर 2'
5) इन्सान दो ही नस्ल के होते है, एक तो हरामी और दुसरे बेवकूफ - 'गँग्स ऑफ वासेपुर 1'
6) दिल्ली मी बिल्ली मार लो, खा लो, लेकीन पालो नही. – देव डी
7) पैसे के नाम पर ऐसी दोस्ती हुई, जैसे हम एक गांड से हगते है.
लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी
पिक्चरवाला
| ताज्या बातम्यांसाठी फॉलो
करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS