बी-ग्रेड चित्रपटांबद्दल प्रत्येकाच्या मनात भिन्न मत असते. आजपर्यंत याची कोणतीही नेमकी व्याख्या देण्यात आलेली नाही. फक्त हे सगळ्यांना माहिती ...
बी-ग्रेड चित्रपटांबद्दल प्रत्येकाच्या मनात भिन्न मत असते. आजपर्यंत याची कोणतीही नेमकी व्याख्या देण्यात आलेली नाही. फक्त हे सगळ्यांना माहिती आहे की, बी-ग्रेड चित्रपटांचे बजेट कमी आहे. तंत्रज्ञानाचा वापरही यात कमी केला जातो. या चित्रपटाच्या पोस्टर्सवरून असे दिसते की, काही स्टार मंडळींनी सुद्धा हे चित्रपट मजबुरीने केले आहेत.
दिवसेंदिवस अशा चित्रपटांचा व्यापार वाढताना दिसत आहे. बॉलीवूडमध्ये सफल न होऊ शकलेले अनेक लोक अशा ठिकाणी काम करताना दिसतात, मात्र बॉलीवूडमधील अनेक स्टार कलाकारांनीही इथे काम करून आपली कला दाखवली आहे.
1) अमिताभ बच्चन :- बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन ज्यांना कुठल्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. त्यांनीसुद्धा बी-ग्रेड चित्रपटात काम केलेलं आहे. 2003 मध्ये आलेल्या Boom (बूम) या चित्रपटात काम केलेले आहे.
2) अक्षय कुमार ग्लॅमर आणि बॉलीवूड जगात एक मोठे नाव बनले आहे. हिंदी सिनेमाबरोबरच त्याने बी-ग्रेड चित्रपटामध्येही आपला जलवा दाखवला आहे. अक्षय कुमार 1992 ला आलेल्या 'मि. बाँड'( ‘Mr. Bond’) या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता.
3) कैटरीना कैफ़ :- आज अनेक हृदयांची मालकीण असलेल्या कैटरीनाने सुद्धा बी-ग्रेड चित्रपटात काम केलेलं आहे, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कैटरीनानेही 2003 मध्ये आलेल्या Boom (बूम) या सिनेमात काम केलं होतं. मात्र आजही तिला तिच्या या कामाचा पश्चाताप होत असल्याचे तिने अनेकदा सांगितले आहे. विशेष बाब म्हणजे तिने तिच्या करियरची सुरुवात बी-ग्रेड सिनेमापासूनच केली होती.
4) मिथुन चक्रवर्ती :- नृत्य म्हणजे डान्स तसेच अभिनयाचे गुरु असलेले मिथुनदा यांनीही अशा सिनेमामध्ये काम केलेले आहे. 'Classic Dance Of Love' या 2005 मध्ये आलेल्या बी-ग्रेड फिल्ममध्ये त्यांनी काम केले होते.
5) राजेश खन्ना :- बॉलीवूडचे सदाबहार अभिनेते म्हणून ओळख असलेल्या राजेश खन्ना यांनीही ‘वफा’ 'Wafa' नावाच्या बी-ग्रेड चित्रपटात काम केले होते.
6) अर्चना पूरन सिंह :- कॉमेडी नाईटस विथ कपिल शर्मा या शो मध्ये दिसणाऱ्या आणि बॉलीवूडमध्ये मोजक्या पण लक्षात राहणाऱ्या भूमिका करणाऱ्या अर्चना पूरन सिंह यांनीही एकेकाळी बी-ग्रेड चित्रपटांची वाट धरली होती. मात्र त्यांनीही तो मार्ग लवकरच सोडला. मात्र 90च्या दशकात त्यांनीही अनेक बी-ग्रेड फिल्म्स केल्या.
7) नवाज़ुद्दीन सिद्दीक़ी :- बॉलीवूडसह अख्ख्या भारताला नवाज़ुद्दीनचा संघर्ष माहिती आहे. संघर्ष करून अखेरीस आज त्याने जो टप्पा गाठला आहे, त्यामुळे त्याचा प्रत्येक भारतीय चाहता आहे. आज अभिनयाच्या जोरावर त्याने बॉलीवूडमध्ये आपले अढळ असे स्थान निर्माण केले आहे. आपल्या संघर्षाच्या काळात त्यांनीही बी-ग्रेड फिल्म्स केल्या. 'मिस लवली' ही बी-ग्रेड असणारी त्यांची फिल्म खूप लोकप्रिय झाली होती.
8) ममता कुलकर्णी :- आपल्या अभिनयाने आणि हसऱ्या चेहऱ्याने सगळ्यांना घायाळ करणारी ममता कुलकर्णी हिनेही बी-ग्रेड सिनेमात काम केले होते. 'डिवाइन टेम्पल खजूराहो' असे या बी-ग्रेड फिल्मचे नाव होते.
9) मनीषा कोइराला :- हे नाव वाचून तर तुम्ही नक्कीच शॉक झाला असाल. 'एक छोटी सी लव स्टोरी' नावाचा एक बी-ग्रेड चित्रपट 2002 मध्ये आला होता. त्यात मनीषा कोइरालाने काम केले होते.
10) शक्ति कपूर :- अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना सारख्या स्टारने बी-ग्रेड मध्ये काम केले होते तर शक्ती कपूर कशाला मागे राहील. शक्ती कपूरने ‘मेरी लाईफ मे उसकी वाईफ’ ('Meri Life Mein Uski Wife') या बी-ग्रेड सिनेमात काम केले होते. विशेष बाब म्हणजे ही फिल्म 2009 मध्ये आली होती.
बॉलीवूडच्या अशा अनेक कलाकारांनी पैशासाठी, अभिनयासाठी किंवा इतर काही कारणांनी का होईना पण बी-ग्रेड चित्रपटात काम केले होते. काहींना त्याचा पश्चाताप आहे तर काहींसाठी ती बॉलीवूडमध्ये येण्याची संधी होती.
लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी
पिक्चरवाला
| ताज्या बातम्यांसाठी फॉलो
करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
Casino, Slot Machines Near Me - MapyRO
उत्तर द्याहटवाGet directions, reviews 통영 출장마사지 and information for Casino, Slot Machines Near 삼척 출장안마 Me in 동두천 출장마사지 Murphy, CT. MapYRO® 수원 출장마사지 locator. Find all 세종특별자치 출장샵 of the information on all the