जिथे बॉलीवूड असेल तिथे गॉसिप असेल आणि जिथे गॉसिप असेल तिथे सिक्रेट्स तर असणारच ना भाऊ.... बॉलीवूडची काही कलाकार मंडळी आपल्या अभिनयाने किंवा ...
जिथे बॉलीवूड असेल तिथे गॉसिप असेल आणि जिथे गॉसिप असेल तिथे सिक्रेट्स तर असणारच ना भाऊ.... बॉलीवूडची काही कलाकार मंडळी आपल्या अभिनयाने किंवा इतर कलाकारीने ओळखली जाण्याऐवजी आपल्या वाद निर्माण करण्याची सवयीमुळे किंवा चर्चेत राहण्याचा अट्टाहासामुळे ओळखली जातात. जसे की केआरके, राखी सावंत... यांनी केलेली कामे आपल्याला माहिती नसतील पण त्यांचे वाद आणि किस्से नक्कीच माहिती असतील. बॉलीवूडच्या कलाकारांची काही सिक्रेट्स आज ‘टीम पिक्चरवाला’च्या हाती लागलेली आहेत. ही अशी सिक्रेट्स आहेत, जी खूपच कमी लोकांना माहिती आहेत.
यातील काही सिक्रेट्स वाईट आहेत तर काही चांगली आहेत. मात्र या सिक्रेट्समुळे त्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम झाला आहे, हे मात्र नक्कीच.
1) अनुराग कश्यप या दिग्दर्शकांने आपल्याला चित्रपट बघण्याची एक वेगळीच नजर दिली. मात्र अनुरागला आपल्या लहानपणी Sexual Harassement चा सामना करावा लागला होता. मात्र मोठ्या मनाच्या अनुरागने त्या व्यक्तीला माफ केले. अर्थात हा निर्णय घेण्यासाठी अनुरागला अनेक वर्षे लागली तसेच या निर्णयाने त्याला आतून-बाहेरून बदलले. ठरवलं असत तर अनुरागने त्याला कोर्टातही खेचले असते मात्र अनुरागने त्याला सोडून दिले.
2) आजकाल तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली आणि लाखो दिलांची धडकन असलेली आलिया भट ही एका गोष्टीला खूप घाबरते. अर्थात बहुतांश मुली या गोष्टीला घाबरतात. ती म्हणजे अंधार... आलिया पण अंधाराला खूप घाबरते. एवढी घाबरते की, झोपताना सुद्धा ती लाईट चालू ठेवूनच झोपते.
3) आलियासोबत कीस करणे, हा माझा अतिशय बोरिंग अनुभव होता. मला वाटते, दीपिकाला कीस करणे, हा चांगला अनुभव असेल, एका लोकप्रिय शो मध्ये सिद्धार्थ मल्होत्राने आपली इच्छा पब्लीकली सांगितली होती.
4) सलमान खानच्या वाहिनीसोबत म्हणजे मलायका अरोरासोबत आता रिलेशनशिपमध्ये असलेला अर्जुन कपूर आधी सलमानच्या बहिणीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र दिवसेंदिवस अर्जुन अधिकच जाड होत चालला होता म्हणून सलमानची बहिण अर्पिताने त्याला सोडले होते. अर्जुनने मागे एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘मैने प्यार क्यो किया’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांचे अफेयर सुरु झाले होते.
5) अनुराग कश्यपची आधीची बायको कल्की सुद्धा आपल्या लहानपणी लैंगिक अत्याचाराची शिकार झाली होती. आधी तर कल्कीने याविषयी कुणाला सांगितले नाही मात्र नंतर तिने खुलेपणाने सगळे सांगितले जेणेकरून इतरही महिला आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा खुलासा करतील आणि अपराध्यांना शिक्षा होईल.
6) सनी देओल, सलमान खान, आमीर खान आणि अशा अनेक लोकांशी पंगा घेणारा शाहरुख दिलदार आहे, हे आपल्याला माहिती आहेच. करण जोहर, शिरीष कुंदर आणि फ़राह खानशी असलेली शाहरुखची मैत्रीही आपण जाणतो. मात्र त्याचे एक सिक्रेट इंडस्ट्रीतही खूप कमी लोकांना माहिती आहे. शाहरुखला मित्र बनवण्याची म्हणजे नवे मित्र जोडण्याची कला अवगत नाही, म्हणूनच त्याचे बॉलीवूडमध्ये खूप कमी मित्र आहेत.
7) रणबीर कपूरने दीपिका पदुकोनला धोका दिला होता, असे त्याने एकदा नाव न घेता कबूल केले होते. एका लोकप्रिय शो मध्ये त्याने कबूल केले होते की, तो कतरिनावर एकदम फिदा झाला होता. त्यामुळे त्याने दीपिकाकडे दुर्लक्ष केले एवढेच नाही तर त्याने धोका दिला होता. नंतर त्याने जाहीरपणे सांगितले की, मी त्यावेळी अपरिपक्व होतो, मला नात्यांची किंमत कळत नव्हती. मात्र त्या घटनेनंतर मी सर्व नात्यांना प्राथमिकता द्यायला शिकलो. काही चुका माझ्याकडूनही झाल्या मात्र आता मी त्या पुन्हा कधीच होऊ देणार नाही.
लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी
पिक्चरवाला
| ताज्या बातम्यांसाठी फॉलो
करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS