जिमी शेरगिल : या ‘चॉकलेट बॉय’चा ‘दबंग’ अभिनेता कधी झाला, लक्षातच आलं नाही

आपको पता है मर्द ज्यादा गालिंया क्यों देते है?... क्योंकी वो रोते कम है, हा थेट काळजाला हात घालणारा डायलॉग आठवला की समोर येतो पिळदार मिशी अस...



आपको पता है मर्द ज्यादा गालिंया क्यों देते है?... क्योंकी वो रोते कम है, हा थेट काळजाला हात घालणारा डायलॉग आठवला की समोर येतो पिळदार मिशी असलेला रांगडा हिरो ‘जिमी शेरगिल’.

जिमी शेरगिलला बघताच एकच गोष्ट लक्षात येते ती म्हणजे त्याचा ‘क्युटनेस’. मोहब्बतें, मेरे यार की शादी है, दिल है तुम्हारा, अशा सिनेमांमध्ये ‘चॉकलेट बॉय’ असणाऱ्या जिमी शेरगिलनेही विविध भूमिका केल्या. मात्र आजवर या हिरोला कायमच देशातील तरुण आणि तरुणींना सांत्वन द्यावं लागलं त्याचं कारण म्हणजे या हिरोला त्याच्या अभिनयासाठी कितीही क्रेडीट दिलं तरीही त्याची हिरोईन नेहमीच कुणीतरी पळवून नेतं.

तनु वेड्स मनु, हैप्पी भाग जायेगी, मेरे यार की शादी है, दिल है तुम्हारा हो. जवळपास सगळ्याच सिनेमात हा क्युट आणि प्रामाणिक अभिनय करणारा ‘जिमी’ एकटाच राहतो.

खरं पाहिलं तर जिमीला मुलगी सोडून जाते, हे त्याच्या सिनेमाच्या आयुष्यातील दुःख असलं तरीही त्याच्या खऱ्या आयुष्यातील दुःख वेगळेच आहे. आजवर त्याने खूप वेगवेगळ्या भूमिका बॉलीवूडसाठी केल्या मात्र आजवर त्याला त्याच्या अभिनासाठी अपेक्षित असे क्रेडीट मिळालेले नाही. 

जिमीने सुरुवातीला चॉकलेट बॉयच्या भूमिका केल्या मात्र आता त्याचे ‘दबंग’ रोल पाहून सगळेच त्याच्यावर फिदा आहेत. ‘चॉकलेट बॉय’च्या इमेजमधून जिमी बाहेर पडला तो ‘अ वेडनेसडे’ या चित्रपटातील त्याच्या दमदार रोलमुळे. त्याच्या या भूमिकेचे जगभरातून कौतुक झाले. ATS इंस्पेक्टर आरिफ खान हा रागीट होता. या चित्रपटात त्याची बुलेटवरील एन्ट्री असली खतरनाक होती की, तुम्ही सलमानचा दबंगपणा विसरून जाल. 

गुलज़ार यांच्या ‘माचिस’मधून आपल्या बॉलीवूड करीयरची सुरुवात करणाऱ्या जिमीला ओळख मिळाली ती ‘मोहब्बतें’मुळे. या चित्रपटात शाहरूख आणि अमिताभसह 5 नवे अभिनेते होते, मात्र या सगळ्यात जिमी क्युट दिसत होता.

साहेब, बीवी और गैंगस्टरमध्ये जिमी झाला ‘राजा आदित्य प्रताप सिंह’. हा रोल तर त्याचा भाव खाणारा होता. यात त्याने बायको, पॉलिटिक्स आणि गैंगस्टर असं सगळं जबराट पद्धतीने हँडल केलं आहे. 

संजय दत्त, बमन ईरानी आणि ग्रेसी सिंह यांच्या 'मुन्ना भाई एम.बी.बी.एस' मध्ये जिमी ने एक पेशंट ‘ज़हीर’चा रोल केला होता. या पेशंटकडे आयुष्य जगण्यासाठी वेळ कमी असतो. यात जिमीचं काम काही फार मोठं नव्हतं मात्र हा रोल जिमीने अजराअमर केला.   

यानंतर जिमीने 'हासिल', 'अग्निपथ', 'चरस', 'लगे रहो मुन्ना भाई', 'हम तुम', 'अ वेडनेस डे', 'माई नेम इज़ खान', 'स्पेशल 26', 'तनु वेड्स मनु', 'साहेब बीवी और गैंगस्टर', 'डेंजरस इश्क़', 'साहेब बीवी और गैंगस्टर रिटर्न्स', 'मदारी', 'तनु वेड्स मनु रिटर्न्स', 'हैप्पी भाग जायेगी', 'मुक्काबाज़',सारख्या अनेक भन्नाट चित्रपटांमध्ये रोल केला आणि आपल्या रोलचं सोनं करत त्याने स्वतःची एक वेगळी ओळख बनवली.

आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की, जिमी एक अफलातून अभिनेता आहे. प्रत्येक छोट्या-मोठ्या रोल तो जीव ओतून करतो. म्हणूनच त्याचा छोटा रोलही सामान्य प्रेक्षकांच्या लक्षात राहातो. त्याने आजवर केलेल्या कामांचा आलेख बघता जिमी हा एक यशस्वी अभिनेता आहे, हे नक्कीच. मात्र त्याने कॉमेडी, एक्शन, रोमांटिक आणि जवळपास प्रत्येक ‘झोन’चा रोल जिमीने केला आहे. नुसता केलाच नाही तर आपल्या कामाचा ठसाही उमटवला आहे.

‘वीरे की वेडिंग’मधील त्याने कॉमेडी करून लोकांना गुदगुल्या केल्या आणि भरपूर हसवलं.

‘फ़ेमस’ या चित्रपटातील सध्यासुध्या राधेश्यामने सगळ्यांचे मन जिंकले. 

साहेब बीवी और गैंगस्टर मधील त्याने केलेला ‘ख़लनायक’ची भूमिका तर कुणीच विसरू शकत नाही. मात्र एवढं करूनही एक चाहता म्हणून मलाही जिमीविषयी एक खंत वाटते, ती म्हणजे या सगळ्या फिल्म्स, तगडे रोल करून जिमीला जी उंची मिळायला पाहिजे होती, ती बॉलीवूडने दिली नाही.

जिमी तसा खूप ‘चुजी’ अभिनेता आहे. एखाद्याने त्याला एखाद्या फिल्मची स्टोरी ऐकवली आणि सांगितले की, यात लीड रोल तुझा आहे, तर त्यावर जिमी मनमोकळ सांगतो की, मी या लीड रोलला फिट नाही. मी यात सेकंड लीड रोल करतो.

इतक्या सहज तो लीड रोल सोडतो. मात्र त्याच्या याच स्वभावामुळे त्याने माचिस, हासिल आणि मुन्नाभाई एमबीबीएस मधील लोकांच्या लक्षात राहणारे आणि स्वतःला फिट असणारे रोल स्वीकारले. त्याचं ‘चूजी’ असणं त्याच्या करियरसाठी खूप चांगलं ठरलं.   

चॉकलेट बॉयपेक्षा त्याच्या खलनायक असणाऱ्या रोल्सला जास्त पसंती मिळाली. जिमीने आजवर आर्ट, कमर्शियल आणि रीजनल चित्रपटांमध्ये काम केले आहे. छोट्या-मोठ्या भूमिका करत आपला जिवंत अभिनयाने लोकांचे प्रेम मिळवले. आजही जिमीच्या चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरीही जेव्हा शाहरुख़ खान, अक्षय कुमार, आमिर खान, सैफ़ अली खान, नवाज़ुद्दीन सिद्दकी याचं नाव निघतं तेव्हा जिमीला लोकं आणि बॉलीवूड विसरलेलं असत, अर्थात ही माझी खंत आहे, कदाचित त्याचीही असावी.

जिमीबद्द्ल एवढं लिहिल्यावर एक महत्वाचा मुद्दा सांगायचा राहिलाच की, जिमीने पंजाबी चित्रपटांमध्येही खूप काम केलेलं आहे. जसा तो बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहे तसाच पंजाबी सिनेमामध्येही. वर्षाकाठी तो एखादा का होईना हिंदी सिनेमा करतोच. एवढेच नाही तर 'रंगीले' आणि ‘धरती’ सारखे अनेक चित्रपट प्रोड्यूस केलेले आहेत.  

लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी

पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com

| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |

टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala

मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com


COMMENTS

नाव

Blog,11,Bollywood,34,Box Office,4,Celebrity,24,Chitranagari,15,Chitrapat,11,Fashion,27,Feature,33,Festival,4,Gossip,33,Health,21,Hollywood,8,Latest,30,Lifestyle,20,Music,7,Natak,2,OTT Live,9,Photography,3,Relationship,26,Review,8,Short Film,3,Theater,4,Tollywood,1,Trailer,5,Trending,25,Video,16,Web Series,7,You Tuber,5,
ltr
item
Pikcharwala: जिमी शेरगिल : या ‘चॉकलेट बॉय’चा ‘दबंग’ अभिनेता कधी झाला, लक्षातच आलं नाही
जिमी शेरगिल : या ‘चॉकलेट बॉय’चा ‘दबंग’ अभिनेता कधी झाला, लक्षातच आलं नाही
https://1.bp.blogspot.com/-7nUtZhEpilo/YMHVKFtX1xI/AAAAAAAAAZc/j_ZvrGqIY6MD9RnCx3ME8eimEfUZUGHnQCLcBGAsYHQ/s320/jimmy%2Bsheragil%2BPikcharwala.jpg
https://1.bp.blogspot.com/-7nUtZhEpilo/YMHVKFtX1xI/AAAAAAAAAZc/j_ZvrGqIY6MD9RnCx3ME8eimEfUZUGHnQCLcBGAsYHQ/s72-c/jimmy%2Bsheragil%2BPikcharwala.jpg
Pikcharwala
https://www.pikcharwala.com/2021/06/blog-post_28.html
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/2021/06/blog-post_28.html
true
2767188615897253807
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content