मोस्ट एलिजेबल बॅचलर म्हणून सगळीकडे प्रसिद्ध असलेला सलमान खानचा आता ‘राधे’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. अगदी थिएटर बंद असतानाही सलमान भाईजान...
मोस्ट एलिजेबल बॅचलर म्हणून सगळीकडे प्रसिद्ध असलेला सलमान खानचा आता ‘राधे’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. अगदी थिएटर बंद असतानाही सलमान भाईजान आपल्या चाहत्यांसाठी ‘ईद’लाच राधे रिलीज करणार आहे. दरम्यान जेव्हा जेव्हा सलमान चर्चेत येतो तेव्हा तेव्हा तो लग्न कधी करणार? हा प्रश्न त्याला माध्यमांकडून विचारला जातो.
सलमान आता 55 वर्षांचा झाला आहे. मात्र तरी अजूनही त्याला लग्नाचा हा प्रश्न विचारलाच जातो. जेव्हा जेव्हा सलमान एखाद्या फिल्मचे प्रमोशन करत असतो किंवा त्याच्यासोबत जेव्हा एखादी अभिनेत्री दिसते तेव्हा लग्नाचा प्रश्न त्याला हमखास विचारला जातो.
सलमानचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. मात्र प्रत्येकीशी त्यांचे नाते का दुरावले, हे मात्र आजवर कळले नाही. पन्नाशी उलटूनही सलमान ना लग्न करत आहे ना तो कोणाशीही रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र ही आहे त्याची आजची गोष्ट. त्याचे तरुणपणात असलेले प्रेमाचे किस्से आजही चवीने चर्चिले जातात. आज आम्ही तुम्हाला त्याचा एक सिक्रेट किस्सा सांगणार आहे. जो एकदम सिक्रेट किस्सा आहे.
एक काळ असा होता की जेव्हा सलमान एका बॉलिवूड अभिनेत्रीवर इतका फिदा होता की त्याने त्या अभिनेत्रीच्या वडिलांकडे लग्नासाठी हात मागितला होता.
हे आम्ही मनाने नाही सांगत आहोत. हे खुद्द सलमान खानने त्याच्या एका जुन्या मुलाखतीत सांगितले आहे. आणि नंतर याविषयी आम्ही बी टाऊनच्या कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली. आणि ही माहिती खरी असल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर स्क्रोल करत असताना आम्हाला एक व्हिडिओ आढळला. हा व्हिडिओ जवळपास 26-27 वर्षे जुना आहे. या व्हिडिओमध्ये सलमान असे सांगत आहे की, एकेकाळी त्याला अभिनेत्री जूही चावला आवडत असे. सलमान तिच्यावर इतका फिदा होता की, त्याने जुहीच्या वडिलांकडे लग्नासाठी हात मागितला होता.
जुहीविषयी बोलताना सलमान म्हणाला की, जुही खूपच गोड आणि प्रेमळ आहे. मी तिच्या वडिलांची भेट घेतली. आणि जुहीशी लग्न करण्याची परवानगी मागितली. मात्र त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. कदाचित त्यांना आपल्या मुलीचा नवरा म्हणून मी पसंत नव्हतो. मला कळलं नाही, नेमकं त्यांना काय पाहिजे होतं.
हा तर झाला लग्नाचा विषय... आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, आजवर सलमानने अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींशी पंगा घेतला मात्र नंतरच्या काळात त्यांच्याशी जुळवून घेत त्यांच्यासोबत कामही केले. मात्र आजवर त्याने जुही चावला सोबत काम केलेले नाही.
खरं तर, एकेकाळी बॉलीवूडच्या एका प्रसिद्ध निर्मात्याला सलमान आणि जुहीला एकत्र घेऊन चित्रपट बनवायचा होता. हा चित्रपट करण्याविषयी सलमानने जूहीशी चर्चाही केली. मात्र जुही कामात असल्याने तिने हा प्रोजेक्ट काही दिवस लटकवत ठेवला. आणि काही महिन्यांनंतर अखेर तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला.
शेवटी सलमान तर सलमान आहे. त्याची एकदा सटकली की कोणीही त्याच्या रागातून सुटत नाही. (दीवाना मस्ताना या चित्रपटातील कैमियो रोल सोडता सलमानने कधीही तिच्यासोबत काम केलेले नाही.)
एक तो दिवस होता जेव्हा सलमानसोबत काम करण्यास जुहीने नकार दिला होता आणि आज हा दिवस आहे, जेव्हा सलमानसोबत काम करण्यासाठी अनेक लोक तरसत असतात.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जूहीने एका मुलाखतीत सलमानबरोबर काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. विशेष बाब म्हणजे ही गोष्ट तिने सलमानसमोर सांगितली होती. बिग बॉस 9 च्या सेटवर सलमान आणि जुही बोलत होते. जुहीने तिची ही इच्छा सांगताच सलमान खानने तिला आपल्याच आईची भूमिका करण्याची ऑफर दिली. यावर लोक हसले. मात्र सलमानने तिची अशी चेष्टा का केली, हे मात्र तिला चांगलेच माहिती होते.
बी-टाउन मध्ये आजही असे म्हटले जाते की, सलमानची फिल्म नाकारली म्हणून सलमान जुहीसोबत काम न करून तिला शिक्षा देत आहे. मात्र हे कितपत खरे हे सलमान आणि जुहीच जाणो...
https://twitter.com/odshek/status/1023228676673077256?s=20
लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी
पिक्चरवाला
| ताज्या बातम्यांसाठी फॉलो
करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS