ती ड्राम क्वीन आहे, ती नाटकी आहे. ती जिथे जाते तिथे एंटरटेनमेंटची अजिबात कमी नसते. काही लोकांना ती आवडते, तिचा वेडेपणा आवडत नाही म्हणून काही...
ती ड्राम क्वीन आहे, ती नाटकी आहे. ती जिथे जाते तिथे एंटरटेनमेंटची अजिबात कमी नसते. काही लोकांना ती आवडते, तिचा वेडेपणा आवडत नाही म्हणून काही लोक तिचा द्वेष करतात. मात्र तिला इग्नोर कधीच करता येत नाही. या एवढ्या लांब परिचयानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की, आम्ही नेमकं कुणाविषयी बोलत आहोत. होय... आम्ही राखी सावंत विषयीच बोलत आहोत.
कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्ये आणि आपल्या कृत्यांमुळे चर्चेत असणाऱ्या राखीने बिग बॉस हाऊसमध्ये एंटरटेनमेंटचा तडका लावला. या शोमध्ये ती होस्ट सलमान खानची आवडती स्पर्धक होती.
राखी सावंत तुम्हाला आवडते की नाही, हे आम्ही सांगू शकत नसलो तरी एक गोष्ट मात्र ठामपणे सांगू शकतो. ते म्हणजे ती आज जी काही आहे ती आपल्या स्वतःच्या जीवावर आहे. टीव्हीवर नाटकं करून किंवा बिनधास्त बोलून, वागून लोकांना हसवणे हे काही सोपे काम नाही. मात्र राखी सावंत आपल्या कामासाठी काहीही करू शकते. महत्वाची बाब म्हणजे तिने काहीही केलं तरी ती टीव्हीवर, न्यूजमध्ये चर्चेत असते.
बोर झालेल्या बिग बॉस मध्ये राखीने जी मजा केली आहे ती पाहून पुन्हा एकदा बिग बॉस शो मनोरंजनमय झाला आहे, असं वाटतं. राखी आज कशीही दिसत, वागत, बोलत असली तरी आपल्यापैकी कुणालाच तिचा संघर्ष माहिती नसेल.
1) नीरू भेड़ा असे राखी सावंतचे खरे नाव आहे. अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी तिने आपले नाव बदललं होतं. ही गोष्ट बोटावर मोजण्याइतक्या लोकांना माहिती असेल.
2) राखी जेव्हा अवघ्या 10 वर्षांची होती तेव्हा तिने अनिल आणि टीना अंबानीच्या लग्नात जेवण वाढण्याचे काम केले होते. अवघ्या 50 रुपयांसाठी तिने हे काम केले असल्याचे ती सांगते.
3) ती एका अशा कुटुंबातून आलेली आहे, जिथे महिला पुरुषांशी डोळ्यांमध्ये डोळे घालून बोलू शकत नाहीत. राखीचे वडील कॉन्स्टेबल होते तर तिची आई एका हॉस्पिटलमध्ये वॉचमन होती. गरिबीमुळे त्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती.
4) राखीला डान्स करायला आवडत होते, परंतु तिच्या कुटुंबाचा तिच्या डान्स करण्याला विरोध होता. बर्याच वेळा डान्स केल्यामुळे तिने घरच्यांचा मारही खाल्ला आहे. एकदा तर राखीच्या काकांनी तिचे केसही कापले होते ज्यामुळे ती दांडिया खेळण्याच्या कार्यक्रमात जाऊ शकणार नाही. घरच्यांनी सर्व प्रकारे विरोध करून पाहिला मात्र राखीने माघार घेतली नाही. अखेर ती घर सोडून आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी निघून गेली.
5) राखीने फक्त हिंदीच नाही तर मराठी, तमिल, तेलुगु आणि कन्नड़ भाषेतही काम करून लोकांची मने जिंकली आहेत.
6) ड्रामा क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखीला अनेक चित्रपटांसाठी नकार मिळाला. अनेकदा रिजेक्ट झाली तरीही तिने हार मानली नाही. यानंतर तिने काही आइटम सॉन्ग आणि छोटे रोल केले.
7) 'राखी के स्वयवंर' या शो मध्ये तिने कनाडाच्या इलेश परुजनवालाशी साखरपुडा केला. मात्र त्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, तिने हा साखरपुडा पैशांसाठी केला होता.
8) 2014 मध्ये तिने मुंबई उत्तर-पश्चिम भागात उमेदवारी केली आणि राजकारणात येण्याचा प्रयत्न केला. अर्थात राजकारणाच्या पहिल्याच पायरीवर ती अपयशी झाली. त्यानंतर तिने RPI पार्टीत प्रवेश केला. आता ती RPI पक्षाची प्रदेश उपाध्यक्ष आणि महिला विंगची अध्यक्षा आहे.
9) राखी तिचा एक्स बॉयफ़्रेंड अभिषेक अवस्थी आणि मिका सिंह किस प्रकरण मुळेही चर्चेत आली होती.
10) मागच्या वर्षी तिने ब्रिटनचा व्यवसायीक रितेश याच्याशी लग्न करण्याची घोषणा केली होती. लोकांनी याला पब्लिसिटी स्टंट म्हटले.
लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी
पिक्चरवाला
| ताज्या बातम्यांसाठी फॉलो
करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS