जसा प्रत्येक हिरोचा एक काळ असतो तसाच पंजाबी पुत्तर ‘सनी देओल’ म्हणजे आपल्या सनी पाजीचाही एक काळ होता. सनी पाजी तसा आडदांड आणि रांगडा गडी होत...
जसा प्रत्येक हिरोचा एक काळ असतो तसाच पंजाबी पुत्तर ‘सनी देओल’ म्हणजे आपल्या सनी पाजीचाही एक काळ होता. सनी पाजी तसा आडदांड आणि रांगडा गडी होता. धर्मेंद्र यांचे जे समवयस्क नट होते, त्यांची मुले फ्लॉप होत असताना सनी पाजी मात्र जोमात होते. त्यांचे सगळेच चित्रपट हिट होत होते. आजची अवस्था बघता चित्रपट सृष्टीत धर्मेंद्र यांच्यानंतर त्यांच्या घरातील 5 मुले आली मात्र कुणीही सनी पाजी इतकं यशस्वी होऊ शकलं नाही.
सनीपाजीचे असे काही चित्रपट आणि संवाद आहेत जे आजही लोकांचे तोंडपाठ आहेत. ‘एक्शन हीरो’ म्हणून त्यांनी जी एंट्री घेतली ते आजवर ‘एक्शन हीरो’ म्हणूनच काम करत होते. ‘तारीख पे तारीख’ने या डायलॉगमुळे तर कित्येक पिढ्यांनी आपला आक्रोश समोर आणला. तर बॉर्डर, गदर, घायल असे एकासरस एक हिट झालेल्या चित्रपटांतीलनी अनेक पत्रे सनीपाजीने अमर केली. त्याकाळी सनीपाजीची फिल्म म्हणजे फक्त त्याच्याभोवती फिरायची. ज्या चित्रपटात सनीपाजी असायचे त्या चित्रपटातील हिरोईनकडे सहसा कुणाचे लक्ष जात नव्हते. सनी देओलचा पिक्चर म्हटल्यावर लोक सहकुटुंब बघायचे कारण त्यात कधीच ‘कुटुंबासोबत पाहता येणार नाही असे सिन्स नव्हते’.
स्टील मॅन इमेज असल्याने सनीपाजी ‘वन मॅन शो’ होते. माझ्या महितीनुसार त्याकाळी सनीपाजी हे एकमेव असे अभिनेते होते, ज्यांच्या एकट्याच्या जिवावर फिल्म चालायची. त्यांचा चित्रपट कोण बनवत आहे? हिरोईन कोण आहे? हा प्रश्न सनीपाजीच्या चाहत्यांना कधीच पडायचा नाही.
एवढे सगळे असूनही अनेक हिरोईन त्याकाळी सनी देओलसोबत काम करायला नकार द्यायच्या. अगदी श्रीदेवी आणि ऐश्वर्या रॉयनेही एकेकाळी सनीपाजी सोबत फिल्म करण्यास नकार दिला होता. त्याचे कारणही सनीपाजींच्या यशात दडलेले होते. सनीपाजी जेव्हा यशाच्या शिखरावर होते तेव्हा त्यांना पुरुषकेन्द्रित चित्रपट अधिक ऑफर व्हायचे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यास अनेक बड्या अभिनेत्री नकार द्यायच्या. कारण सनीसोबत चित्रपटात काम केल्यास हिरोईनकडे लोकांचे लक्ष जाणार नाही. परिणामी त्यांचे स्टारडम कमी होईल.
या गोष्टीचा खुलासा स्वतः सनीपाजीने केला होता. सनीपाजी म्हणाले की, मी ‘घायल’ चित्रपटासाठी श्रीदेवीला विचारणा केली होती. मात्र त्यांनी नकार दिला. एका दुसऱ्या चित्रपटासाठीही मी ऐश्वर्या रायला विचारले मात्र त्यांनीही नकार कळवला. अशा पद्धतीने अनेक हिरोइन्सने माझ्यासोबत काम करण्यास नकार दिलेला आहे. त्यावेळी सनीपाजीलाही लक्षात येत नव्हते की, नेमकं का माझ्यासोबत काम करण्यास या हिरोईन नकार देतात.
नंतर सनीपाजीच्या लक्षात आले की, आपले चित्रपट मेल सेंट्रिक असल्याने अनेक हिरोईनची आपल्यासोबत काम करण्याची तयारी नसते. कारण आपल्या चित्रपटात हिरोईनला जास्त ‘स्पेस’ मिळत नसावा. मात्र बड्या अभिनेत्रींचा नकार मिळवूनही सनीपाजीची प्रत्येक फिल्म हिट व्हायचीच. एवढेच काय श्रीदेवीने नकार दिलेली ‘घायल’ ही फिल्मही सुपरहिट झाली होती. श्रीदेवीने या चित्रपटात काम केले असते तर सनीपाजीपेक्षा श्रीदेवीचा नक्कीच जास्त फायदा झाला असता, असेही इंडस्ट्रीत बोलले जाते.
‘चालबाज़’ नावाच्या एका चित्रपटात श्रीदेवी आणि सनीपाजी प्रेक्षकांना जबरदस्त सोबत दिसले. या चित्रपटात दोघांनी धमाल आणि मस्ती केली होती. हा चित्रपट त्यांच्या चाहत्यांनी डोक्यावर उचलून घेतला. मात्र दुर्दैवाने यानंतर कधीच ही जोडी प्रेक्षकांना एकत्र दिसली नाही. सनीपाजीची जादू आता मोठ्या पडद्यावरून गायब झाली असली तरीही राजकारणात सनीपाजीने यश मिळवण्यास सुरुवात केली आहे. इंडस्ट्रीत सनीपाजीची जागा त्याचा मुलगा घेणार, अशी शक्यता होती, मात्र त्याच्या मुलाच्या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्याचा मुलगा करण देओल पहिल्याच चित्रपटात फ्लॉप ठरला. मात्र सनीपाजीचा भाऊ आणि चित्रपट क्षेत्रात अपयशी ठरलेला बॉबी देओल आता ओटीटी गाजवतो आहे. बॉबी देओलची ‘आश्रम’ ही वेबसिरीज सर्वात जास्त पहिली गेलेली सिरीज आहे. अपयशाचे खापर डोक्यावर घेऊन जगत असलेल्या ‘बॉबी’ला पायाची पन्नाशी ओलांडल्यानंतर यश मिळालं आहे.
लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी
COMMENTS