किस्सा : जेव्हा कोणीच करत नव्हते ‘रावणाचे’ पात्र; परेश रावलच्या सांगण्यावरून अरविंद त्रिवेदींनी केली रावणाची भूमिका

80-90 दशकात जन्मलेल्या मुलांना रामायण माहिती होते. तेव्हा आतासारखे भरमसाठ चॅनल नव्हते. चॅनल कमी असले तरी मनोरंजन आणि प्रबोधन मात्र पुरेपूर ह...



80-90 दशकात जन्मलेल्या मुलांना रामायण माहिती होते. तेव्हा आतासारखे भरमसाठ चॅनल नव्हते. चॅनल कमी असले तरी मनोरंजन आणि प्रबोधन मात्र पुरेपूर होते. एवढेच नाही तर बहुतांशी कार्यक्रम हे कुटुंबासह पाहिले जायचे.  असाच एक कार्यक्रम होता जो लागल्यावर अवघा भारत एक होऊन हा कार्यक्रम बघायचा तो म्हणजे ‘रामायण’.

भारतात सुरुवातीला पौराणिक कथांचेच सिनेमे आणि मालिका आल्या. त्याचाच प्रभाव सामान्य माणसावर राहिला. नंतरच्या काळात याचा राजकारणासाठीही उपयोग झाला. मात्र मागच्या वर्षी लॉकडाऊन झाला आणि लोकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, म्हणून पुन्हा एकदा ‘रामायण’ सुरु झाले. देशात सुरु असलेले रामायण प्रसारमाध्यमे दाखवत नव्हती मात्र रामानंद सागर निर्मित रामायण टीव्हीवर सुरु झाले.

यानंतर रामायणातील कलाकार आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. याच दरम्यान रामायणातील कलाकार पुन्हा एकदा कपिल शर्मा आणि इतर काही ‘शो’जमधून लोकांसमोर आले. आता रामायणसंबंधित अनेक किस्सेही लोकांसमोर येऊ लागले आहेत. रामायणातील रामाची, सीतेची, लक्षमण आणि हनुमानाच्या भूमिकेचे कायम कौतुक होत असते. मात्र रावणाची भूमिका करणाऱ्याचे कधीही विशेष कौतुक होत नाही. मात्र या पात्रामुळे रावणाचा रोल करणारे व्यक्ती लोकप्रिय झाले.

याचं कारण रावण हा सर्व देशवासायींसाठी कायमच नकारात्मक आणि राक्षसी पात्र राहिलेला आहे. आणि याच कारणामुळे मालिका बनवायच्या वेळीही कुणीच रावणाची भूमिका करायला तयार होत नव्हतं.

अखेरीस जे हा रोल करायला तयार झाले होते ते अरविंद त्रिवेदीं सुद्धा हा रोल करायला नकार देत होते.

याचा खुलासा अरविंद त्रिवेदी यांच्या नातीने केला आहे. मुंबई मिररने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा या मालिकेचे निर्माते रामानंद सागर यांनी अरविंद त्रिवेदी यांच्यासमोर रावणाची भूमिका करण्याचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा अरविंद यांनी हा रोल करण्यास नकार दिला. त्यावेळी अरविंद त्रिवेदी आणि परेश रावल एका नाटकात एकत्र काम करत होते. त्यावेळी परेश रावल यांनीच पुढाकार घेऊन अरविंदजींना रावणाचे पात्र करण्यास तयार केले.

परेश रावल अरविंदजींना म्हणाले की, आयुष्यात अशा काही संधी सारख्या भेटत नाहीत. जीवनात अशी संधी एकदाच मिळते. म्हणूनच अशा संधींना नकार द्यायचा नसतो.

आणि परेश रावल यांनी सांगितलेल्या या मुद्द्यांचा अरविंद त्रिवेदींवर मोठा प्रभाव पडला. यानंतर ते रावणाचा रोल करण्यास तयार झाले. त्यानंतर त्यांच्या या पात्रामुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली.

अखेर परेश रावल यांनी सांगितलेला सल्ला ऐकला म्हणून अरविंद त्रिवेदी प्रसिद्ध झाले. मात्र त्यांनी त्यावेळी नकार दिला असता तर आजही ते स्थानिक नाटकातच काम करत राहिले असते. मात्र त्यानंतर त्यांना अनेक चांगल्या भूमिका मिळाल्या. मात्र भगवान रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांची परिस्थिती उलटी आहे. त्यांनी रामाची भूमिका केल्याने त्यांना तब्बल 15 वर्षे कुठलेच काम मिळाले नव्हते. रामाचा रोल केल्यानंतर आपल्या करियरला ब्रेक लागल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

निर्मात्यांना अरुण गोविल यांना इतर कोणत्याही भूमिकेत कास्ट करण्याची इच्छा नव्हती. टाईम्स ऑफ इंडियाशी झालेल्या संभाषणादरम्यान ते म्हणाले की, 'मी हिंदी चित्रपटात नायक म्हणून माझ्या करिअरची सुरुवात केली होती आणि जेव्हा ‘रामायण’ नंतर मला बॉलिवूडमध्ये परत जायचे होते. तेव्हा निर्माते म्हणायचे, लोकांमध्ये तुमची प्रतिमा ही रामाची आहे, जी लोकांच्या मनात खूप खोलवर रुजलेली आहे. त्यामुळे आम्ही आपल्याला इतर कोणत्याही भूमिकेत टाकू शकत नाही किंवा सहाय्यक भूमिका देऊ शकत नाही.

एका बाजूला रामाची भूमिका केली म्हणून पुन्हा लोकांनी त्यांना काम दिले नाही म्हणून वाईटही वाटते. मात्र रामाची भूमिका केल्याने त्यांना सन्मान खूपच मिळाला.

रामायणात विविध पात्रे साकारणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यात या मालीकेने मोठे बदल केले. मात्र मालिका संपल्यानंतर त्यांच्या आयुष्यात वेगळेच ‘रामायण’ सुरु झाले होते. कुणाला काम मिळाले नाही तर कुणाला खूप काम मिळाले. मात्र या मालिकेने सामान्य भारतीयांच्या मनावर मोठा प्रभाव पाडला जो आजही कायम आहे.      

लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी 

पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com

| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |

टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala

मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com


COMMENTS

नाव

Blog,11,Bollywood,34,Box Office,4,Celebrity,24,Chitranagari,15,Chitrapat,11,Fashion,27,Feature,33,Festival,4,Gossip,33,Health,21,Hollywood,8,Latest,30,Lifestyle,20,Music,7,Natak,2,OTT Live,9,Photography,3,Relationship,26,Review,8,Short Film,3,Theater,4,Tollywood,1,Trailer,5,Trending,25,Video,16,Web Series,7,You Tuber,5,
ltr
item
Pikcharwala: किस्सा : जेव्हा कोणीच करत नव्हते ‘रावणाचे’ पात्र; परेश रावलच्या सांगण्यावरून अरविंद त्रिवेदींनी केली रावणाची भूमिका
किस्सा : जेव्हा कोणीच करत नव्हते ‘रावणाचे’ पात्र; परेश रावलच्या सांगण्यावरून अरविंद त्रिवेदींनी केली रावणाची भूमिका
https://1.bp.blogspot.com/-zYMThOLbb_U/YMn137DLXvI/AAAAAAAAAdc/rssGynYtxJ4E9TttnkxcBc3k4RnrqeAvACLcBGAsYHQ/s320/ravan%2BPikcharwala.jpg
https://1.bp.blogspot.com/-zYMThOLbb_U/YMn137DLXvI/AAAAAAAAAdc/rssGynYtxJ4E9TttnkxcBc3k4RnrqeAvACLcBGAsYHQ/s72-c/ravan%2BPikcharwala.jpg
Pikcharwala
https://www.pikcharwala.com/2021/06/blog-post_51.html
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/2021/06/blog-post_51.html
true
2767188615897253807
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content