राजकीय नेत्याचा मुलगा राजकीय नेता, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजीनियरचा मुलगा इंजीनियर, दुकानदाराचा मुलगा दुकानदार, आणि हिरोचा मुलगा हिरो, अ...
राजकीय नेत्याचा मुलगा राजकीय नेता,
डॉक्टरचा मुलगा डॉक्टर,
इंजीनियरचा मुलगा इंजीनियर,
दुकानदाराचा मुलगा दुकानदार,
आणि हिरोचा मुलगा हिरो,
अशा या खानदानी घराणेशाहीला आपला विरोध असतो. मात्र संधी मिळाली तरीही त्यात सगळेच यशस्वी होतात असे नाहीच. आज असे अनेक नेते, हिरो आणि उद्योगपती आहेत ज्यांची मुले त्यांच्याच क्षेत्रात अपयशी ठरलेली आहेत. त्यामुळे घराणेशाही असली तरीही त्या क्षेत्रातील अक्कल असणंही तितकंच महत्वाचं आहे.
‘जुगनी ओ पटाखा गुड्डी ओ' हे गाणं ऐकलं की, आपल्यासमोर येतो आलिया भट्ट चा चेहरा. अनेकांची ती क्रश आहे तर काही लोक तिच्या बुद्धीवरून तिची खिल्ली उडवत असतात. काही लोक ती स्टारकीड असल्याने तिचा दुस्वास करतात. मात्र वयाच्या 19 व्या वर्षी तिने इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आणि सिद्ध करून दाखवले की, स्टारकीड असल्याने काही होत नाही, अभिनयाच्या जोरावरच खरी उंची गाठता येते.
बॉलीवूड इंडस्ट्रीत जरी संधी तुम्हाला बापामुळे मिळाली तरी आपली लायकी सिद्ध करावीच लागते अन्यथा तुमचा तुषार कपूर होऊ शकतो. आलियाही सुरुवातीला अशीच घराणेशाहीची शिकार झाली. मात्र आपल्या पहिल्याच चित्रपटात तिने स्वतःला सिद्ध करून दाखवलं. Student of the Year मध्ये आलियाने केलेल्या काम पाहिल्यावर तिच्यावरील घराणेशाहीचा शिक्का हटला आणि समीक्षकांनी तिचा ‘अभिनेत्री’ म्हणून आदर करण्यास सुरुवात केली. इतक्या कमी वयात जास्तीत जास्त अभिनेत्यांसह काम करणारी एकमेव अभिनेत्री म्हणून तिने आपली दखल घेण्यास लोकांना भाग पाडले.
Highway, उड़ता पंजाब, Dear Zindagi, 2 States अशा चित्रपटांमधून तिने अभिनयाचा कळस गाठला आणि भारतीय तरुणांच्या हृदयावर स्वार झाली. तिने या चित्रपटांमध्ये आपली भूमिका इतक्या बखुबीने निभावली की, कुठेही असे जाणवत नव्हते की आपण आलिया भट्ट ला पाहत आहोत. तिच्या भूमिका इतक्या अस्सल होत्या म्हणूनच ती हाईवे च्या वीराशी कनेक्ट होऊ शकली. उड़ता पंजाब च्या कुमारी पिंकीच्या कहाणीशी जोडली गेली. Dear Zindagi च्या काइराच्या अडचणी समजू शकली.
आपल्या विविध पात्रांमुळे आलिया या पिढीच्या प्रत्येक मुलाशी आणि मुलीशी कनेक्ट झालेली आहे. ती कधी कधी स्वतःवर जोक करते, स्वतःच हसं करून घेते. मात्र ती स्वतःला कधीच स्वतः खूप मोठी सेलेब्रिटी असल्याचे मिरवत नाही.
आलिया चित्रपटात जो अभिनय करते तो कधीच बनावटी वाटत नाही. एवढेच काय तर इंडस्ट्रीत एन्ट्री सहज मिळाली तरी तिथे टिकून राहण्यासाठी मेहनत लागते, जी आलियाने केलेली आहे.
बऱ्याचदा आलियाला उकसवण्यासाठी अनेक सेलिब्रिटी किंवा पत्रकार विविध प्रश्न विचारतात. मात्र अशा वादांपासून दूर राहणेच आलिया पसंत करते. आलियाचा सर्वात मोठा गुण आहे तो म्हणजे तिचे ‘सामान्य’ असणे. या सामान्य असण्यामुळेच ती 2 States ची अनन्या स्वामीनाथन हे पात्र करू शकली ज्यामुळे कित्येक जोडप्यांना प्रेम करण्यासाठी प्रेरणा मिळाली असेल. तिच्या ‘सामान्य’ असण्यामुळेच ती कपूर एंड संस मधील Tia मलिक हे पात्र करू अगदी सहज करू शकली.
आलियाला आतापर्यंत अनेक भूमिका करताना आपण सर्वांनी पहिल्या. प्रत्येक पात्राला तिने दर्जेदार अभिनय, क्यूट फ़ेस आणि एक्स्ट्रा टैलेंटच्या जोरावर न्याय दिला.
तिने केलेला 'वीरा'चे पात्र पाहून तर अनेकांनी पुन्हा एकदा ट्रैवलिंगकडे वळण्याचा निर्णय घेतला असेल. न जाणे कित्येक मुलांनी ब्रेकअप झाल्यावर आपल्या मित्रांना 'Dear Zindagi' बघण्याचा सल्ला दिला असेल.
आजही आलिया भट तिच्या अभिनय क्षमतेमुळे आजही इंडस्ट्रीतील पहिल्या 10 अभिनेत्रींमध्ये स्वतः नाव आणि स्थान टिकवून आहे.
जुगनी ओ पटाखा गुड्डी ओ'...
'Love You Zindagi'...
'मुड़ के न देखो दिलबरो'...
ही गाणी जेव्हा जेव्हा समोर येतात, जेव्हा जेव्हा अनपेक्षित मूडमध्ये ऐकली जातात तेव्हा आलियाचा चेहरा आपोआप डोळ्यासमोर येतो.
लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी
पिक्चरवाला
| ताज्या बातम्यांसाठी फॉलो
करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS