बॉलीवूडचे काही चित्रपट असे आहेत की, जे पाहून वाटतं आपण आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान वेळ वाया घातला आणि मग हा वेळ वाया गेल्याचा पश्चाताप...
बॉलीवूडचे काही चित्रपट असे आहेत की, जे पाहून वाटतं आपण आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान वेळ वाया घातला आणि मग हा वेळ वाया गेल्याचा पश्चाताप करण्यात अजून वेळ वाया जातो. मात्र याच बॉलीवूडचे काही चित्रपट असे आहेत की, जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो मात्र तेव्हा वेळ सत्कारणी लागल्याची भावना असते.
या बॉलीवूडने आपल्याला असे काही चित्रपट दिलेले आहेत की, जे कायमच आठवणीत राहण्याजोगे आहेत. त्याला कारणही तसेच आहे. या चित्रपटांचा शेवट एकदम भन्नाट आणि मनाला भिडणारा आहे. मागच्या काही वर्षांत बॉलीवूडमध्ये सिनेमाच्या अनुषंगाने अनेक प्रयोग केले गेले. त्यातील काही यशस्वी झाले तर काही अयशस्वी.
या प्रायोगिक चित्रपटांचे यश हे आपण बॉक्सऑफिसवर किती गल्ला कमावला, यावर ठरवू शकत नाही. कारण मुळातच ते प्रायोगिक होते. असे चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला किती भिडतात, यावर त्याचा दर्जा ठरत असतो. ‘टीम पिक्चरवला’ने आपल्यासाठी असेच काही चित्रपट तुमच्यासमोर आणले आहेत. ज्याच्या शेवटामुळे तुम्ही या चित्रपटांच्या प्रेमात पडाल.
1) उडान :- ही बॉलीवूडमध्ये बनलेली एक सर्वोत्कृष्ठ फिल्म आहे. या चित्रपटातील मुख्य नायक रोहन हा कसा आपल्या सावत्र भावाला आपल्या वडिलांपासून वाचवतो, हे दाखवले आहे. शेवटी त्याच्या डोळ्यात आपल्याला आनंद दिसेल आणि समाधानही... प्रेक्षकांनाही हे समाधान रोहनकडून आपोआप मिळते. मात्र हे समाधान किती मोठे आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा ‘ग्रेट’ असणारा ‘उडान’ चित्रपट बघावाच लागेल.
2) देवदास :- बॉलीवूडचा चाहता असणारा असा एकही माणूस शोधून सापडणार नाही, ज्याने देवदास पाहिली नसेल. शाहरुख़ ख़ान, माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या रॉय यांना घेऊन हा चित्रपट बनला होता. या चित्रपटाचा शेवट एवढाच आहे की, जेव्हा तुमच्या काही इच्छा पूर्ण होत नाहीत तेव्हा जगत असतानाही तुम्ही रोज मरत असता.
3) मसान :- टू किसी रेल सी गुजरती है... मै किसी फुल सा थरथराता हुं... हे गाणं आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाने ऐकले असेल. प्रेम या विषयाला घेऊन गेल्या काही वर्षातील हा सर्वोत्कृष्ठ चित्रपट आहे, असे माझे मत आहे. आयुष्य किती अनिश्चित आहे, आणि आयुष्य कधी कधी किती भारी गिफ्ट देतं, सगळं काही या चित्रपटात आहे. विकी कौशल आणि ऋचा चड्ढाने या चित्रपटात केलेला अभिनय तर लाजवाब होता.
4) हैदर :- हैदर ही फक्त बॉलीवूडच नाही तर शाहीदची आजवरची सर्वात भारी फिल्म आहे. अर्थात कबीर सिंगपण चांगली आहे. पण हैदरचा विषयच खोलय... जर तुम्ही आतापर्यंत ही फिल्म बघितली नसेल तर नक्की आणि आवर्जून बघा.
5) अंधाधुन :- बॉलीवूडच्या बेस्ट फिल्मचा विषय चाललेला असेल आणि राधिका आपटेची एकही फिल्म या लिस्टमध्ये नसेल तर समजा की, काहीतरी घोटाळाय... राधिका आपटे, आयुष्मान ख़ुराना आणि तब्बूने अंधाधुन या चित्रपटात काम केलेलं आहे. या चित्रपटाचा शेवट एकदमच वेगळा आणि रोमांचित करणारा होता. यासाठी तर हि फिल्म नक्कीच बघा.
6) कहानी :- विद्या बालन ही बॉलीवूडची एक अशी अभिनेत्री आहे, जी आपल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला न्याय देते. विद्या बालन तुम्हाला आवडो वा न आवडो... प्रत्येकाने हा चित्रपट बघायलाच पाहिजे, असा आहे.
7) क्वीन :- आपल्या भूतकाळाला विसरून पुढे चला, असे सांगणारी ही फिल्म सुपरहिट ठरली होती. बघितली नसेल तर नक्कीच बघा... काही नाही मिळालं तरी २ गोष्टी मिळतील. कंगनाचा अभिनय आणि दुसरे म्हणजे प्रेरणा... पुढे चालण्याची.
पिक्चरवाला
| ताज्या बातम्यांसाठी फॉलो
करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS