'ये बाबूराव का स्टाइल है रे!' , ‘अरे कौन देवी प्रसाद, ये देवी प्रसाद का घर नहीं है, देवी का प्रसाद मंदिर में मिलता है, गराज में नहीं...
'ये बाबूराव का स्टाइल है रे!' , ‘अरे कौन देवी प्रसाद, ये देवी प्रसाद का घर नहीं है, देवी का प्रसाद मंदिर में मिलता है, गराज में नहीं रख कुत्र्या’, अरे देवा उठा ले रे, मेरेको नही, इन दोनो को उठा ले’, हेरफेरी हा प्रत्येक डायलॉग आपल्यापैकी प्रत्येकाने ऐकला असेल. हेरा फेरी हा असा एकमेव चित्रपट असेल ज्याचे जवळपास सगळेच डायलॉग फेमस झाले आणि जे कायमच प्रत्येकाच्या ओठी असतात.
बाबूराव गणपतराव आपटे उर्फ बाबूभाई, श्याम आणि राजू यांनी या चित्रपटात केलेली धमाल आजही प्रत्येक भारतीयांच्या चेहऱ्यावर हसू आणते. हा एकमेव कॉमेडी चित्रपट आहे जो इतका प्रसिद्ध झाला आणि आजही हा चित्रपट एव्हरग्रीन आहे.
बाबुराव या पात्राला परेश रावल यांनी कायमस्वरूपी अमर केले. याच पात्रासाठी त्यांना बेस्ट कॉमेडियनचा फ़िल्म फ़ेयर अवॉर्ड मिळाला होता. मात्र या चित्रपटातील सर्वांचाच अभिनय अत्युच्च दर्जाचा होता. आज इतक्या वर्षानंतरही सुनील शेट्टी, अक्षय कुमार, तबू, ओम पुरी यांच्या प्रत्येकाच्या भूमिकाही देशातील अगदी सर्वसामान्य लोकांच्याही लक्षात आहेत.
या चित्रपटाच्या यशात बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा महत्वाचा वाटा होता. प्रत्येक अभिनेत्याचा कस काढून त्यांनी ही फिल्म बनवली. आजही जेव्हा जेव्हा हा चित्रपट टीव्हीवर लागतो तेव्हा तेव्हा भारतीय लोक हसून हसून लोटपोट होतात. या चित्रपटाला सुपरहिट बनवण्यासाठी प्रत्येकच कलाकाराने मोठी मेहनत घेतली.
या चित्रपटाविषयी बोलताना अभिनेते सुनील शेट्टी यांनी अनेक आठवणीं सांगितल्या आहेत. ते म्हणाले की, या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान मला आणि अक्षय कुमारला जमिनीवर न्यूजपेपर टाकून झोपावे लागले होते. सुनील शेट्टीने आपल्या करीयरची सुरुवात एक्शन हीरो म्हणून केली असली तरी त्यांनी पहिल्यांदाच या चित्रपटात कॉमेडी काम करून सगळ्यांची मने जिंकून घेतली.
पुढे बोलताना सुनील शेट्टी म्हणाले की, मला खरंच माहिती नाही, ही फिल्म कशी बनली. आम्ही सर्वांनी मन लावून काम केले आणी फिल्म बनली. आम्ही (सुनील शेट्टी, अक्षय और परेश रावल) पहाटे लवकर उठून सकाळीच सेटवर जायचो. आमच्या पात्रांना खरा लुक देण्यासाठी आम्ही बिना इस्तरी केलेले कपडे घालायचो.
बऱ्याचदा आम्हाला जमिनीवर पेपर टाकून झोपावे लागायचे. आम्हाला लक्षात येतच नव्हते नेमकं कधी कुणाचं शुटींग चालू आहे. आम्ही तेव्हा मेकअपही करत नव्हतो. अक्षय आणि परेशभाई फिल्मच्या सेटवर डायलॉग रिहर्सल करायचे. डायरेक्टर जसे सांगायचे तसे आम्ही करायचो. डायरेक्टर म्हणतील ती पूर्व दिशा असायची. कधी कधी ते शुटींग चालू असतानाच मध्ये कट बोलून शुटींग थांबवायचे.
सुनील शेट्टी यांनी पुढे सांगितले की, हेरा फेरी हा चित्रपट परफे़क्ट टीम वर्कचे एक आदर्श उदाहरण आहे. या चित्रपटाच्या यशस्वी होण्याचे श्रेय या फिल्मच्या साधेपणात आहे. टीममधील प्रत्येकाने केलेल्या मेहनतीमुळेच ही फिल्म काबिल-ए-तारीफ़ झाली.
डॉयलॉग डिलीवरी, प्रत्येकाची चालण्याची, वागण्याची एक विशेष पद्धत, कॉमेडी टाइमिंग आणि एक्सप्रेशन्समुळे हा चित्रपट या तिघांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. या चित्रपटाआधी परेश रावल ‘व्हिलन’ च्या भूमिका करायचे. मात्र या चित्रपटामुळे त्यांची प्रतिमा बदलली आणि नंतर पुढे अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी कॉमेडी भूमिका केल्या.
आपल्याकडे ‘तीन तिघाडा आणि काम बिघाडा’ ही म्हण प्रचलित आहे. आपल्याकडे 3 लोक एकत्र येऊन कधीच काम करत नाहीत कारण त्याने काम व्यवस्थित होणार नाही, अशी अंधश्रद्धा आहे. मात्र या ‘तिघाडीने’ (अक्षय,सुनील, परेशभाई) एकत्र येत कॉमेडीच्या दुनियेत ‘हेरा फेरी’ एवढ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे की, त्या उंचीवर आजवर एकही कॉमेडी चित्रपट गेलेला नाही.
लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी
पिक्चरवाला
| ताज्या बातम्यांसाठी फॉलो
करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS