म्हणून अनिल कपूरला द्यावी लागली होती आपल्या मिशीची कुर्बानी; वाचा, हा भन्नाट किस्सा

इंडस्ट्रीचा एव्हरग्रीन हिरो अनिल कपूर आजही त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. मात्र यापलीकडे जाऊन त्याचे चाहते त्याला एका विशिष्ठ कारणासाठी ओळख...


इंडस्ट्रीचा एव्हरग्रीन हिरो अनिल कपूर आजही त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. मात्र यापलीकडे जाऊन त्याचे चाहते त्याला एका विशिष्ठ कारणासाठी ओळखतात. ते म्हणजे त्याची पिळदार आणि चेहऱ्याला सूट होणारी मिशी. 

बॉलीवूड इंडस्ट्रीत असे मोजके हिरो आहेत, ज्यांना मिशी आहे. दाढी, मिशी नसणाऱ्या आणि चकचकीत गुळगुळीत हिरोंच्या या इंडस्ट्रीत आजही अनिल कपूर आपला वेगळेपणा जपून आहेत. ‘दिवसेंदिवस अधिकच तरुण होणारा माणूस’ म्हणून अनिल कपूर यांची ख्याती अवघ्या भारतात आहे. 

अनिल कपूरला बिनामिशीचा पाहिलेला एकही माणूस भारतात सापडणार नाही, असं आजही चेष्टेनं इंडस्ट्रीत म्हटलं जातं. अमिताभ यांच्यानंतर आजही तरुणपणी इतकंच आपलं नाणं खणखणीत आहे, हे सिद्ध करणारा एकमेव माणूस म्हणजे अनिल कपूर होय.     

मात्र अनिल कपूर यांनीही एकदा मिशी काढली होती, यामागचे कारणही तितकेच खास होते. अर्थात त्याकाळीही इंडस्ट्रीत काम करणाऱ्या अनेक लोकांच्या हे पचनी पडत नव्हते की, अनिल कपूरने स्वतः मिशी काढली.

अनिल कपूर यांनी मिशी का काढली? याचे कारण जाणून घेण्याआधी आपण त्यांच्याविषयीच्या काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. 

अनिल कपूर यांचे वडील सुरेंद्र कपूर चित्रपट निर्माता म्हणून इंडस्ट्रीत काम करत होते. त्यांचा भाऊ बोनी कपूर देखील चित्रपट सृष्टीत सक्रिय होते. पण तरीही सिनेमात हिरो म्हणून पहिला ब्रेक मिळवण्यासाठी अनिल कपूर यांना खूप संघर्ष करावा लागला. 1970 मध्ये अनिल कपूर यांनी शशि कपूरच्या बालपणाची भूमिका केली होती. तो चित्रपट 'तू पायल मैं गीत' होता. पण दुर्दैवाने हा चित्रपट कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही. म्हणजेच अनिल कपूर यांचा पहिला चित्रपट कधीच लोकांसमोर आलाच नाही. 

यानंतर त्यांनी दक्षिण भारतीय चित्रपटातही काम केले. नंतर हिंदीमधील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका केल्या. अखेर तो दिवस आला जेव्हा अनिल कपूर यांना हिरो म्हणून काम मिळाले. 'वो सात दिन' असे या चित्रपटाचे नाव होते. या चित्रपटामुळे त्यांना इंडस्ट्रीत ‘हिरो’ म्हणून मान्यता आणि मोठी ओळख मिळाली. या सिनेमात त्यांना मिशा देखील होती. अनिल कपूर यांचं मिशावर खूपच प्रेम होतं. आजही आहे म्हणूनच आजही ते मिशी काढत नाहीत.

मात्र एका चित्रपटासाठी त्यांनी आपल्या मिशांची कुर्बानी दिली होती. 'लम्हे' असे या चित्रपटाचे नाव असून याचे दिग्दर्शक यश चोपडा होते. 1991 मध्ये रिलीज झालेल्या 'लम्हे' या चित्रपटात अनिल कपूर बिनामिशीचे दिसले होते. 

या चित्रपटासाठी जेव्हा यश चोपडा अभिनेते शोधत होते, तेव्हा अनिल कपूर हे नाव त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं. त्यांना अमिताभ आणि रेखाला घेऊन हा चित्रपट करायचा होता. दरम्यान अनिल कपूरने या चित्रपटाची कथा ऐकली. ही कथा अनिल कपूर यांना खूपच आवडली. आणि चोपडा यांच्याकडे ‘मला घेऊन हा चित्रपट करा’ अशी मागणी त्यांनी केली.

त्यावेळी यश चोपडा यांनी अनिल यांना नकार दिला आणि सांगितले की या रोलसाठी तू फिट नाही. यासाठी वेगळा लुक असलेला चेहरा हवा. 

मग काही दिवसांनी अनिल कपूर यांनी एक फोटोशुट केले आणि ते फोटो यश चोपडा यांना पाठवले. फोटो पाहून यश चोपडा थक्क झाले. तर झालं असं होतं की, हा चित्रपट मिळवण्यासाठी त्यांनी मिशा काढल्या होत्या. आणि हे फोटोज यश चोपडांना पाठवले. अखेर बिनामिशाचे अनिल कपूर या रोलसाठी फायनल झाले. या चित्रपटाची कथा मात्र मोठी रंजक होती. त्या काळातील लोकांना जवळपास अशक्यप्राय वाटणारी ही गोष्ट होती. 

या चित्रपटातील हिरोला आपल्यापेक्षा जवळपास दुप्पट वय असलेल्या अभिनेत्रीशी प्रेम होते. आणि पुढे घटना घडत राहतात, अशी ही कथा होती. अनिल कपूर यांच्यासोबत या चित्रपटात श्रीदेवी होती. 

या चित्रपटाला सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा फ़िल्म फ़ेयर अवॉर्ड मिळाला होता आणि श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा. मात्र त्याचवर्षी अनिल कपूर यांना सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा अवॉर्ड मिळता मिळता राहिला. त्यालाही कारण अमिताभ होते. त्यावेळी अमिताभ यांचा ‘हम’ चित्रपट आला होता आणि सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा अवॉर्ड अमिताभ यांनाच मिळाला होता.  

लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी 

पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com

| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |

टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala

मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com     

COMMENTS

नाव

Blog,11,Bollywood,34,Box Office,4,Celebrity,24,Chitranagari,15,Chitrapat,11,Fashion,27,Feature,33,Festival,4,Gossip,33,Health,21,Hollywood,8,Latest,30,Lifestyle,20,Music,7,Natak,2,OTT Live,9,Photography,3,Relationship,26,Review,8,Short Film,3,Theater,4,Tollywood,1,Trailer,5,Trending,25,Video,16,Web Series,7,You Tuber,5,
ltr
item
Pikcharwala: म्हणून अनिल कपूरला द्यावी लागली होती आपल्या मिशीची कुर्बानी; वाचा, हा भन्नाट किस्सा
म्हणून अनिल कपूरला द्यावी लागली होती आपल्या मिशीची कुर्बानी; वाचा, हा भन्नाट किस्सा
https://1.bp.blogspot.com/-VsNZm5eejMI/YMVzwzi0r0I/AAAAAAAAAbc/QMVvBDKQibYz9KF-O6TWuvbMQCfQ028iwCLcBGAsYHQ/s320/anil%2Bkapoor%2BPikcharwala.jpg
https://1.bp.blogspot.com/-VsNZm5eejMI/YMVzwzi0r0I/AAAAAAAAAbc/QMVvBDKQibYz9KF-O6TWuvbMQCfQ028iwCLcBGAsYHQ/s72-c/anil%2Bkapoor%2BPikcharwala.jpg
Pikcharwala
https://www.pikcharwala.com/2021/06/blog-post_69.html
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/2021/06/blog-post_69.html
true
2767188615897253807
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content