राधिका आपटे : दर्जेदार अभिनयाच्या जीवावर मन जिंकणारी आंतरराष्ट्रीय अभिनेत्री

आपल्यापैकी अनेकांना राधिका आपटे आठवते ती लई भारी पिक्चरमुळे. आपल्यापैकी काहींनी ‘पार्च्ड’ या पिक्चरमधील तिच्या नुड सीनमुळेही ती आठवत असेल. त...


आपल्यापैकी अनेकांना राधिका आपटे आठवते ती लई भारी पिक्चरमुळे. आपल्यापैकी काहींनी ‘पार्च्ड’ या पिक्चरमधील तिच्या नुड सीनमुळेही ती आठवत असेल. तर आपल्यातील काही लोकांनी तिला फक्त नेटफ्लिक्सवर पाहिले. तर अशी आहे राधिका आपटे. 

म्हणजे ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागातील सगळेच लोक तिला ओळखतात. मात्र तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे. नेटफ्लिक्सवर तिला पाहिलेल्या लोकांना हे पाहून आश्चर्य वाटेल की, राधिका एखाद्या मराठी गावठी पोरीचा रोलही एकदम भारी करू शकते तर लय भारी पाहिलेल्या गावकडच्या लोकांना तिचा पार्च्ड’मधील अभिनय आणि ‘तो’ सीन पाहून वेड लागेल कारण त्यांच्या लेखी ती ‘तशी’ अभिनेत्री नाहीच.

या सगळ्यात एक मुद्दा महत्वाचा आहे, तो म्हणजे तिच्या सर्वांगीण भूमिकेचा. ती कदाचित एकमेव मराठी अभिनेत्री असावी जिचा नवरा आंतरराष्ट्रीय कलाकार आहे. अर्थात तिने केलेल्या दर्जेदार कामाची यादी बघता तिला ‘मराठी’ अभिनेत्री म्हणणे हा तिच्या अभिनयाचा अपमान होईल. भूमिका कोणतीही असो, तिला जिवंत करून आपले मन जिंकणारी इतक्या कमी वयाची राधिका ही एकमेव अभिनेत्री असेल.

आता सिनेमासाठी लागतात तशा हिरोईनइतकी ती गोरी नाही, काही ठराविक अवयवांचे अंगप्रदर्शन करावे, ती अशीही नाही. भारतीय सिनेमाच्या सौंदर्यशास्त्राच्या व्याख्येत राधिका अजिबात बसत नाही. मग तिच्या या यशाचं रहस्य काय? तिला एवढे मोठे प्रोजेक्ट कसे मिळतात आणि ती कशाच्या जीवावर लोकांची मने जिंकून घेते? या सगळ्या प्रश्नांची उत्तर एकच आहे ते म्हणजे ‘दर्जेदार अभिनय’.

राधिका कुठल्याही इंटरविवला किंवा प्रमोशनसाठी जाते तेव्हा न तिच्या चेहऱ्यावर भडक मेकप असतो, ना तिने अगदी भारीतले कपडे परिधान केलेले असतात. तीच्या वैयक्तिक आयुष्यातही ती एकदम साधी आहे. मी तिचे अनेक मुलाखती पहिल्या. तिच्या नखांना साधी नेल पॉलिशही लावलेली नसते.

Lust Stories, Sacred Games आणि Ghoul अशा गाजलेल्या वेबसिरीजमध्ये तिने आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. तसेच पार्च्ड, मांझी, कबाली, पॅडमॅन, अंधाधून, हंटर, शोर इन द सिटी असे तिने अनेक सिनेमे केले आणि तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षातही राहिल्या. तिच्या एकूण करियरचा आलेख लक्षात घ्यायचा झाल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे जर तुमच्यात खरोखर ‘कला’ असेल तर तुम्हाला दिखावा करण्याची गरज भासत नाही.

मसाला फिल्म असो वा ऑफ बीट प्रत्येक प्रकारचा सिनेमा तिने केला आहे. तिने केलेले सिनेमे बऱ्यापैकी ऑफबीट आणि ढोबळमानाने कलात्मक सिनेमात मोडणारे आहेत म्हणून की काय तिचे अनेक सिनेमे बॉक्सऑफिसवर गल्ला करू शकले नाहीत. मात्र जेव्हा विषय वेबसिरीजचा येतो, तेव्हा मात्र राधिका असली की वेबसिरीज हिट होणारच, असा अंदाज निर्माते करत असतात. किंवा वेबसिरीजमध्ये राधिका आपटे आहे, म्हणजे या वेबसिरीजचा कंटेंट दर्जाच असणार.

सामान्य प्रेक्षक तर राधीकाचे चाहते आहेतच मात्र बॉलीवूड आणि सिने इंडस्ट्रीतही राधिकाचे चाहते आहेत. तिच्या अभिनयापलीकडे जाऊन राधिकाला इंडस्ट्रीत तिच्या साधेपणासाठीही ओळखले जाते. सिनेमातील अनेक अभिनेते आणि अभिनेत्री तिच्या साधेपणाचे दाखले देत असतात.

Netflix च्या अनेक वेबसिरीजमध्ये तिने महत्वाचे रोल केलेले आहेत. त्या सगळ्याच वेबसिरीज हिट झाल्याने तसेच तिच्या भूमिका बघता Netflix कडे दुसरी हिरोईन आहे की नाही? असेही जोक्स केले गेले. मिम्सही झाले. मात्र त्यालाही तिने खेळाडू वृत्तीने घेतले. Ahalya सारख्या बंगाली आणि Kriti सारख्या दमदार शॉर्टफिल्ममध्ये तिने आपल्या अभिनयाने लोकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील, अशा भूमिका केल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिच्या भूमिकांचे कायमच कौतुक झालेले आहे. तिने एका परदेशी कलाकारासोबत लग्न केल्याने माझ्यासारख्या अनेक देशी युवकांची मने तुटली. मात्र प्रत्येक वेळी तिची भूमिका बघताना अनेक मने जिंकण्याचे काम ती सहजपणे करते.    

लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी

पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com

| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |

टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala

मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com


COMMENTS

नाव

Blog,11,Bollywood,34,Box Office,4,Celebrity,24,Chitranagari,15,Chitrapat,11,Fashion,27,Feature,33,Festival,4,Gossip,33,Health,21,Hollywood,8,Latest,30,Lifestyle,20,Music,7,Natak,2,OTT Live,9,Photography,3,Relationship,26,Review,8,Short Film,3,Theater,4,Tollywood,1,Trailer,5,Trending,25,Video,16,Web Series,7,You Tuber,5,
ltr
item
Pikcharwala: राधिका आपटे : दर्जेदार अभिनयाच्या जीवावर मन जिंकणारी आंतरराष्ट्रीय अभिनेत्री
राधिका आपटे : दर्जेदार अभिनयाच्या जीवावर मन जिंकणारी आंतरराष्ट्रीय अभिनेत्री
https://1.bp.blogspot.com/-xnyTncDMJU4/YL3azhac9sI/AAAAAAAAAAo/0gXl0nKvhOwCPhq3_4DvbRUFvcvIEZ3BgCLcBGAsYHQ/s320/radhika%2Baapte%2BPikcharwala.jpg
https://1.bp.blogspot.com/-xnyTncDMJU4/YL3azhac9sI/AAAAAAAAAAo/0gXl0nKvhOwCPhq3_4DvbRUFvcvIEZ3BgCLcBGAsYHQ/s72-c/radhika%2Baapte%2BPikcharwala.jpg
Pikcharwala
https://www.pikcharwala.com/2021/06/blog-post_7.html
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/2021/06/blog-post_7.html
true
2767188615897253807
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content