1992 साली एक चित्रपट आला होता. नाव होते ‘परंपरा’. हा एक मल्टीस्टारर चित्रपट होता. यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये आमिर ...
1992 साली एक चित्रपट आला होता. नाव होते ‘परंपरा’. हा एक मल्टीस्टारर चित्रपट होता. यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये आमिर खान, सुनील दत्त आणि विनोद खन्ना यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसमवेत एक नवीन चेहरा होता. मात्र ही फिल्म तेव्हा फुल फ्लॉप झाली. त्यामुळे सैफ सारख्या नवख्या मुलाकडे कोणाचे लक्षही गेले नाही. नंतर पुढच्याच वर्षी सैफचे २ चित्रपट आले. पहला नशा (1993) आणि पहचान (1993) या दोन्ही चित्रपटांमुळे सैफ बॉलीवूड इंडस्ट्री आणि भारतात दखलपात्र झाला.
या अभिनेत्याचे नाव सैफ अली खान होय. आज हा अभिनेता बॉलिवूडमधील सर्वोच्च कलाकारांपैकी एक आहे. मात्र या टप्प्यावर पोहोचण्याआधी सैफने आपल्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत.
अजूनही काही स्टार्स असे आहेत की, ज्यांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करणे हा कमीपणा वाटतो. मात्र याच काळात एक नवीन रोल स्वीकारून सैफ अली खान ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळला आणि सीक्रेड गेम्स सारखी जबरदस्त वेबसिरीज केली. ज्यामुळे सैफच्या वाट्याला अमाप प्रसिद्धी मिळाली. या सिरीजमध्ये सैफचा अभिनय ‘भन्नाट’ होता.
खान मंडळीमध्ये सुरुवातीपासून शाहरुख, सलमान आणि आमीरचे नाव घेतले जाते. मात्र कायमच विविध रोल करून स्वतःला अभिनयात सिद्ध केलेला आणि सुपरस्टार मंडळींमुळे कायमच तुलनेने दुर्लक्षित राहिलेला अभिनेता म्हणजे सैफ अली खान.
शाहरुख आणि सलमान यांनी कायमच आपल्या झोनमधले चित्रपट केले. शाहरुख रोमान्स आणि सलमान एक्शन चित्रपट करत राहिले. मात्र करियरच्या प्रत्येक टप्प्यावर सैफने स्वतःला एक दमदार अभिनेता म्हणून सिद्ध केलं आहे.
सैफ़ अली ख़ानने 'ओमकारा' मध्ये सपोर्टिंग एक्टर चे पात्र केले. त्या चित्रपटातील हिरो असलेल्या अजय देवगनला सैफने या चित्रपटात टक्कर दिली आणि या चित्रपटातील रोलसाठी त्याचे खूप कौतुक झाले. आजही ‘लंगडा त्यागी’ हे नाव घेताच आपल्यासमोर येतो तो सैफचा चेहरा.
इतर खान मंडळींनी मात्र कधीच सपोर्टिंग रोल केले नाहीत. 'हम तुम' या चित्रपटात सैफने असा भारी रोल की त्याने लोकांची मने तर जिंकलीच पण सैफला या चित्रपटासाठी बेस्ट एक्टरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
'दिल चाहता है' मध्ये सैफने अशा मुलाचा रोल केला की, जो कायम आपल्या लव्ह लाईफशी निगडीत प्रश्नामुळे गोंधळलेला असतो. सैफच्या या रोललाही लोकांची मोठी पसंती मिळाली. 'परिणीति' चित्रपटात केलेल्या उमद्या रोलने तर सैफचे सगळीकडे कौतुकच कौतुक झाले.
सैफ एक असा अभिनेता आहे, जो प्रत्येक रोलसाठी मोठे कष्ट घेतो. ते पात्र जगतो आणि कायम नवनवीन पात्र करण्याची रिस्कही घेतो. 'लव आज कल', 'कल हो न हो', 'Being Cyrus', 'कुर्बान', 'सलाम नमस्ते', 'रेस' आणि 'मैं 'खिलाड़ी तू अनाड़ी' या सगळ्या चित्रपटांनी हेच दाखवून दिले की, सैफ एक अष्टपैलू कलाकार आहे. या सगळ्याच चित्रपटांमध्ये सैफने क़ाबिले-ए-तारीफ़ अभिनय केला आहे.
2001 पर्यंत विविध चित्रपट करूनही सैफ हा प्रचंड असा लोकप्रिय झालेला नव्हता. मात्र म्हणतात ना, प्रचंड संघर्ष आणि मेहनत कधीच लपून राहत नाही. 2001 मध्ये आलेल्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटात सैफने स्वतःला अभिनय क्षेत्रात एका उंचीवर नेऊन ठेवले.
'दिल चाहता है' के बाद सैफ़ को 'कल हो न हो', 'डरना मना है', 'लव के लिए कुछ भी करेगा', 'एलओसी कारगिल' अशा चित्रपटांमध्ये काम केल्यावर सैफने पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. 'लव आज कल', 'कॉकटेल', 'रेस-2', 'गो गोवा गौन', 'फ़ैंटम' या चित्रपटांमध्ये सैफने केलेल्या भूमिकांनी हे सिद्ध केले की, सैफ एक्शन आणि रोमांटिक हीरोचा रोलही सहज निभावू शकतो.
कदाचित सैफच्या अभिनयातील हीच विविधता पाहून त्याला 'सेक्रेड गेम्स' वेब सीरीज़साठी निवडले गेले असावे. सैफ एक असा अभिनेता आहे, जो 3-4 वर्षात एक तरी अशी फिल्म करतो जी फक्त आणि फक्त त्याच्या अभिनयासाठी बघितली जाते.
'तानाजी: द अनसंग वॉरियर' मध्ये ‘उदयभान सिंह’ हे सैफने केलेलं पात्र इतकं जबरदस्त रंगवलं होतं की, अभिनयाच्या बाबतीत पुन्हा एकदा अजयला सैफने टक्कर दिली होती.
त्याची एकूण कारकीर्द बघता लक्षात येतं की, त्याला खान मंडळींच्या तुलनेने कमीच लोकप्रियता मिळाली. मात्र त्याने जे केलं ते खान मंडळींना कधीच जमलेलं नाही.
लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी
पिक्चरवाला
| ताज्या बातम्यांसाठी फॉलो
करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS