नवाज़ुद्दीन सिद्दीक़ीला 'आइटम गर्ल' म्हणून चिडवतो अनुराग कश्यप; वाचा, हा काय आहे किस्सा

नवाजुद्दीन सिद्धकी एक असा अभिनेता आहे, ज्याचा संघर्ष, अभिनय, कर्तुत्व आज देशातील सर्वांना माहिती आहे. नवाजुद्दीन यांनी प्रतिभा 'गॅंग्स ऑ...


नवाजुद्दीन सिद्धकी एक असा अभिनेता आहे, ज्याचा संघर्ष, अभिनय, कर्तुत्व आज देशातील सर्वांना माहिती आहे. नवाजुद्दीन यांनी प्रतिभा 'गॅंग्स ऑफ वासेपुर' या चित्रपटानंतर सर्वांनी स्वीकारली होती. त्याआधीही काही हिंदी चित्रपटात त्यांनी फुटकळ काम केले होते. मात्र या कोळश्यात पडलेल्या हिऱ्याची किंमत ओळखली ती अनुराग कश्यप या अनोख्या दिग्दर्शकाने. 

साधे दिसणारे, असणारे आणि राहणारे नवाजुद्दीन हे आज बॉलीवूडचे एक सुप्रसिद्ध नाव आहे. त्यांचे चाहते केवळ भारतातच नव्हे तर जगभर पसरलेले आहेत. बॉलीवूडच्या बेस्ट दिग्दर्शकांपैकी एक असणाऱ्या अनुराग यांच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात नवाजुद्दीन असतोच. यामागेही एक मोठा किस्सा आहे. मात्र आज आपण अनुराग नवाज़ुद्दीन सिद्दीक़ीला 'आइटम गर्ल' म्हणून का चिडवतो?, हे जाणून घेणार आहोत. 

अनुरागने 2003 साली आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली. 'पांच' ही अनुरागची पहिली फिल्म होती. तिथपासून आजवर अनुरागने केलेल्या जवळपास सर्वच फिल्मस हिट ठरल्या.  'ब्लैक फ़्राइडे', 'देव डी', 'गैंग्स ऑफ़ वासेपुर', 'गुलाल', 'बॉम्बे टॉकीज़', 'अगली', 'रमन राघव 2.0', 'मनमर्ज़िया' या तर सुपरहिट होत्या. 

जवळपास सगळ्याच फिल्म्समध्ये नवाजुद्दीन यांनी कुठले न कुठले पात्र केले आहे. या एक्टर-डायरेक्टरच्या जोडीने आपल्याला अनेक रंजक आणि प्रबोधन करणारे चित्रपट दिलेले आहेत. हे दोघे खऱ्या आयुष्यात पण खूपच जवळचे मित्र आहेत. yo दोघांचे मित्र म्हणून एकमेकांविषयी असलेला आदर आणि प्रेम इतके आहे की, अनुराग नेहमी नवाजुद्दिनला ‘आयटम गर्ल’ म्हणून चिडवतो. 

हे आम्ही नाही तर स्वतः नवाजुद्दिन सिद्दिकीने आपल्या आत्मचरित्रात सांगितले आहे. आपल्या आत्मचरित्रात या गोष्टीबद्दल नवाजुद्दीन लिहितो की, 'जर मी किंवा अनुराग मुलगी असतो तर आम्ही नक्कीच एकमेकांशी लग्न केले असते. आमचे लग्न खूपच जबराट झाले असते. मी अनुरागची प्रेरणा आहे आणि तो माझी प्रेरणा आहे. तो मला त्रास देण्यासाठी ‘आयटम गर्ल’ म्हणून अजूनही चिडवत असतो. ('अगर मैं या अनुराग में से कोई एक लड़की होता तो हम शादी कर लेते. बड़ी ज़बरदस्त होती हमारी शादी. मैं उसकी प्रेरणा हूं और वो मेरी. वो आज भी मुझे चिढ़ाने के लिए आइटम गर्ल कहकर बुलाता है.')

या दोघांची अशी भन्नाट आणि आदर्श वाटावी अशी मैत्री आहे. बॉलीवूडमध्ये तर असे मित्र अभावानेच दिसून येतात. अनुराग कश्यप यांनीही एकदा त्यांच्या या मैत्रीबद्दल सांगितले होते की, आमच्या दोघांमध्ये एक साइलेंट रिलेशनशिप आहे. आणि हे इतके भारी आहे की, एखाद्या 3 तासाच्या फ्लाईटमध्ये आम्ही दोघे काही न बोलता निवांत प्रवास करू शकतो. 

नवाजुद्दिन यांच्या कामाविषयी बोलताना अनुराग म्हणतात की, मी नवाजुद्दिनला असा रोल कधीच देणार नाही, जो त्याने यापूर्वी केला आहे. 

आधीच केलेला रोल किंवा त्याच पद्धतीचा रोल पुन्हा करण्यात काहीच मजा नसते, असे अनुरागचे म्हणणे आहे. जोपर्यंत समोर काहीतरी नवीन येत नाही, एखादा नवीन आणि धडाकेबाज रोल नवाजुद्दिनसाठी येत नाही, तोपर्यंत त्याच्याशी मी कामाच्या विषयावर बोलणार नाही.

नवाजुद्दिन आणि अनुराग हे दोघेही आज यशाच्या शिखरावर आहेत. मात्र तरीही त्यांच्या कामाच्या आड त्यांची मैत्री कधीच आलेली नाही. मत्सर, स्वार्थ आणि फसवणुकीने भरलेल्या बॉलीवूडच्या त्या दुनियेत या दोघांची मैत्री कोहिनूर हिऱ्यासारखी स्वच्छ, चकचकित आणि लकाकणारी आहे. त्यांच्या मैत्रीचे इतरही अनेक किस्से बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. अनुराग, पियुष मिश्रा, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, मनोज वाजपेयी, नवाजुद्दिन हे सगळे एकमेकांचे मित्र आणि एकमेकांच्या कामाचे चाहते आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे सगळे गावाशी आणि मातीशी जोडलेले कलाकार आहेत.

लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी 

पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com

| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |

टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala

मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com

COMMENTS

नाव

Blog,11,Bollywood,34,Box Office,4,Celebrity,24,Chitranagari,15,Chitrapat,11,Fashion,27,Feature,33,Festival,4,Gossip,33,Health,21,Hollywood,8,Latest,30,Lifestyle,20,Music,7,Natak,2,OTT Live,9,Photography,3,Relationship,26,Review,8,Short Film,3,Theater,4,Tollywood,1,Trailer,5,Trending,25,Video,16,Web Series,7,You Tuber,5,
ltr
item
Pikcharwala: नवाज़ुद्दीन सिद्दीक़ीला 'आइटम गर्ल' म्हणून चिडवतो अनुराग कश्यप; वाचा, हा काय आहे किस्सा
नवाज़ुद्दीन सिद्दीक़ीला 'आइटम गर्ल' म्हणून चिडवतो अनुराग कश्यप; वाचा, हा काय आहे किस्सा
https://1.bp.blogspot.com/-Yf13hkxUGEo/YMjPum4AghI/AAAAAAAAAcc/Cgj33T3FJYARO74XH6rcgyH0u8jbm9EXQCLcBGAsYHQ/s320/navajuddin%2Band%2Banurag%2BPikcharwala.jpg
https://1.bp.blogspot.com/-Yf13hkxUGEo/YMjPum4AghI/AAAAAAAAAcc/Cgj33T3FJYARO74XH6rcgyH0u8jbm9EXQCLcBGAsYHQ/s72-c/navajuddin%2Band%2Banurag%2BPikcharwala.jpg
Pikcharwala
https://www.pikcharwala.com/2021/06/blog-post_79.html
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/2021/06/blog-post_79.html
true
2767188615897253807
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content