स्ट्रगलच्या काळात अभिषेक बच्चन होता अर्शद वारसीचा ड्रायव्हर; ‘तिथे’ केले झाडू मारण्याचेही केले काम

आपल्यापैकी अनेक लोक आहेत जे सहजतेने घराणेशाहीवर बोलतात. त्याला नाव ठेवतात. आणि दुट्टपी भूमिका घेऊन स्वतःचाच गैरसमज करून घेतात. राजकारण, समाज...


आपल्यापैकी अनेक लोक आहेत जे सहजतेने घराणेशाहीवर बोलतात. त्याला नाव ठेवतात. आणि दुट्टपी भूमिका घेऊन स्वतःचाच गैरसमज करून घेतात. राजकारण, समाजसेवा, चित्रपट अशा अनेक क्षेत्रात घराणेशाही चालते. मात्र अनेकदा काही आपापल्या क्षेत्रातील ‘बाप’ मंडळी आपल्या मुलांना या घराणेशाहीचा फायदा घेण्यापासून दूर ठेवतात. याचा अनेकदा तोटा होतो. म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाचा मुलगा त्याच्याइतकी उंची गाठू शकत नाही, त्यामुळे सगळे मुलाला दोष देत असतात. लोक म्हणतात की, एवढं सगळं असूनही यशस्वी नाही झाला. मात्र त्यामागचा इतिहास त्यांना माहिती नसतो. 

अर्थात मुलाला जाणीवपूर्वक घराणेशाहीचा फायदा घेऊ न देणारी ‘बाप’ मंडळी विरळच असतात. असाच इतिहास आहे अभिनेता आणि अमिताभ बच्चन यांचा मुलगा असणारा अभिषेक बच्चन याचा. 

अभिषेक बच्चन हा आता यशस्वी अभिनेता असला तरीही आजवर त्याला वडिलांइतकी उंची गाठता आलेली नाही. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा मुलगा असल्याचे त्याला फायदे कमी आणि तोटेच जास्त झालेले आहेत. कारण त्याची तुलना त्याच्या समवयस्क अभिनेत्यांबरोबर न करता त्याच्या वडिलांशी केली जाते. परिणामी त्याच्या यशस्वी असण्यावर आणि लोकप्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. 

2000 साली अभिषेक बच्चन याने चित्रपटसृष्टीत म्हणजेच मोठ्या पडद्यावर हिरो म्हणून पदार्पण केले. मात्र त्यापूर्वीही तो चित्रपटसृष्टीत काम करत होता. मात्र ‘हिरो’ म्हणून नाही, तर कधी एखाद्या अभिनेत्याचा ड्रायव्हर म्हणून तर कधी सेटवर झाडू मारणार ‘बॉय’ म्हणून.

करीना कपूरबरोबर त्याने 'शरणार्थी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत. जसे 'धूम', 'युवा', 'गुरु', 'पा', 'मनमर्जियां' इत्यादी. पण बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांचा मुलगा झाल्यामुळे काही लोकांना वाटते की त्याच्यासाठी इंडस्ट्रीत पाऊल ठेवणे खूप सोपे होते.

मात्र असे काहीच नव्हते. त्याचा संघर्षही मोठाच आणि तितकाच जीव जाळणारा होता. अभिषेक बच्चन यांनी आपल्या एका जुन्या मुलाखतीत आपल्या संघर्षाविषयी सांगितले होते. 2010 साली BAFTA ला दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेक यांनी सांगितले आहे की, मला हिरो व्हायचे होते मात्र कुठेही संधी मिळत नव्हती. मी अनेक ठिकाणी प्रयत्न करत होतो. मात्र संधी न मिळाल्याने मी चित्रपट निर्मिती सुरु असलेल्या सेटवर काम करायचो. 

मी एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम केले आहे. तिथे मी माझ्या टीमसाठी चहाही बनवला आणि सेटवर झाडू मारण्याची कामेदेखील केली. इतकेच नाही तर मी अभिनेता अरशद वारसीसाठी काही दिवस ड्रायव्हर म्हणूनही काम केले आहे. त्यानंतर अनेक प्रयत्न करून मला पहिली फिल्म मिळाली ती 2 वर्ष संघर्ष केल्यावर. 

आपल्या संघर्षाचे दिवस आठवताना अभिषेक म्हणाला की, मी काम करत असलेले चित्रपट पहिले 3 वर्षे काही विशेष चालत नव्हते. पहिल्या 3 वर्षात माझा कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. माझ्या अभिनय आणि चित्रपटांवर समीक्षक मंडळी अत्यंत नाराज असायची. त्यांचे माझ्याबद्दलचे मत नकारात्मक होते. माझ्याविषयी आणि चित्रपटाविषयी वर्तमानपत्रात लिहून आलेले नकारात्मक लेख मी वाचायचो. मग ते आपल्या रूममधील आरशावर लावून ठेवायचो. आणि मग ते लेख पाहून सतत स्वतःवर मेहनत घेऊन जास्त प्रॅक्टीस करायचो. 

अशा पद्धतीने अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर अभिषेक यांची ओळख ‘अभिनेते’ म्हणून होऊ लागली. खासकरून ‘धूम’ आणि ‘युवा’ हे दोन्ही चित्रपट हिट झाले आणि अभिषेक यांच्या कारकिर्दीला नवीन वळण मिळाले. सध्या अभिषेक हे 'बिग बुल' या चित्रपटातील अभिनयामुळे चर्चेत आहेत आणि सगळीकडे त्यांचे कौतुक होत आहे.        

लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी 

पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com

| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |

टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala

मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com      


COMMENTS

नाव

Blog,11,Bollywood,34,Box Office,4,Celebrity,24,Chitranagari,15,Chitrapat,11,Fashion,27,Feature,33,Festival,4,Gossip,33,Health,21,Hollywood,8,Latest,30,Lifestyle,20,Music,7,Natak,2,OTT Live,9,Photography,3,Relationship,26,Review,8,Short Film,3,Theater,4,Tollywood,1,Trailer,5,Trending,25,Video,16,Web Series,7,You Tuber,5,
ltr
item
Pikcharwala: स्ट्रगलच्या काळात अभिषेक बच्चन होता अर्शद वारसीचा ड्रायव्हर; ‘तिथे’ केले झाडू मारण्याचेही केले काम
स्ट्रगलच्या काळात अभिषेक बच्चन होता अर्शद वारसीचा ड्रायव्हर; ‘तिथे’ केले झाडू मारण्याचेही केले काम
https://1.bp.blogspot.com/-0_obi82yluQ/YMdt96R13yI/AAAAAAAAAb0/SJ5Jl0Y5ecEuExtvy9z-IPbnI6yW7WSwQCLcBGAsYHQ/s320/abhishek%2Bbacchan%2BPikcharwala.jpg
https://1.bp.blogspot.com/-0_obi82yluQ/YMdt96R13yI/AAAAAAAAAb0/SJ5Jl0Y5ecEuExtvy9z-IPbnI6yW7WSwQCLcBGAsYHQ/s72-c/abhishek%2Bbacchan%2BPikcharwala.jpg
Pikcharwala
https://www.pikcharwala.com/2021/06/blog-post_8.html
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/2021/06/blog-post_8.html
true
2767188615897253807
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content