राजकारणात राज ठाकरे आणि अभिनयात राहुल बोसची अवस्था सारखीच झालेली आहे

बॉलीवूडमध्ये असे कितीतरी अभिनेते आणि इतर कलाकार,तंत्रज्ञ आहेत, ज्यांच्याकडे स्कील असूनही त्यांना कायमच बॉलीवूडने डावललं आहे. नाही म्हणलं तरी...

बॉलीवूडमध्ये असे कितीतरी अभिनेते आणि इतर कलाकार,तंत्रज्ञ आहेत, ज्यांच्याकडे स्कील असूनही त्यांना कायमच बॉलीवूडने डावललं आहे. नाही म्हणलं तरी एखादा ‘नवाजुद्दिन’ दर काही वर्षांनी बॉलीवूड उभा करते. नाहीतर धडक मारणारा एखादा अनुराग कश्यप, पियुष मिश्रा असतोच. त्यानंतर बॉलीवूडमध्ये काम करून आपल्या कलाकारीचा करिष्मा दाखवूनही वंचित राहिलेल्यांची संख्याही कमी नाही. आणि अशातच नंबर येतो राहुल बोसचा. 

राहुल बोस अभिनेता तर आहेच. मात्र तो एक प्रसिद्ध स्क्रिप्ट राइटर आणि दिग्दर्शकही आहे. राहुलने अभिनेता म्हणून  'प्यार के साइड इफे़क्ट्स', 'मान गए मुग़ल ए आज़म', 'चमेली', 'शौर्य' 'झंकार बीट्स', 'कुछ लव जैसा', 'दिल धड़कने दो' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आणि लोकांसह बॉलीवूड इंडस्ट्रीच्या कौतुकास तो आजवर पात्र राहिला. मात्र तरीही बॉलीवूडने त्याला कायमच नाकारलं, असं आपल्याला प्रेक्षक म्हणून जाणवत राहते. 

राजकारणात राज ठाकरे आणि बॉलीवूडमध्ये राहुल बोसची अवस्था जवळपास एकसारखी आहे. दोघांमध्येही क्षमता आहे, दोघांचेही कौतुक होते, दोघांनाही आपल्या मर्यादा माहिती आहेत मात्र तरीही राहुलला अभिनेता म्हणून काम मिळत नाही आणि राज ठाकरेंना सत्ता.

तसा राहुल बोसला आज अनेक लोक चेहऱ्याने ओळखतात त्याच्या नावाने नाही. अर्थात याचं कारणही बॉलीवूडमध्येच दडलं आहे. राहूलने तरुण असताना केलेला आणि मला त्याचा सर्वाधिक आवडलेला सिनेमा म्हणजे मिस्टर एंड मिसेज़ अय्यर. यात राहुलच्या अभिनयाचा कस लागलेला आहे. 

एक अभिनेता असण्यापलीकडे राहुल एक सक्रीय सामाजिक कार्यकर्तासुध्दा आहे, हे आपल्यापैकी अनेकांना ठावूक नसेल. त्याच्या सामाजिक कार्यकर्ता असण्याविषयी नंतर कधीतरी बोलूच. आज आपण त्याच्या फिल्मी करियरविषयी बोलूयात. 

'द परफेक्ट मर्डर' हा राहुलचा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट एकदम हटके होता. आणि तेव्हापासूनची इंडस्ट्रीला राहुलची ओळख एक हटके सिनेमा करणारा अभिनेता म्हणून झाली. 'द सुपरस्टार ऑफ़ इंडियन आर्ट हाउस सिनेमा' नावाचा मोठा पुरस्कार प्रतिष्ठित टाइम मैगज़ीनने राहुलला दिला आहे तो त्याच्या हटके सिनेमा करण्याच्या सवयीमुळेच. 

हा किंवा असा उंचीचा पुरस्कार बॉलीवूडमध्ये अगदीच मोजक्या अभिनेत्यांना देण्यात आलेला आहे.

राहुल कायमच बॉलीवूडच्या लाईमलाईट पासून दूर असतो. राहुलने भलेही आजवर 100 कोटी कमावणारी एकही फिल्म केली नसेल मात्र आजवर त्याने केलेली प्रत्येक फिल्म ही हटके होती. एवढेच नाही तर या राहुलने त्याच्या प्रत्येक भूमिकेला कायमच अभिनेता म्हणून न्याय दिला आहे. 

काही दिवसांपूर्वी राहुल आपल्याला नेटफ्लिक्सच्या ‘बुलबुल’ चित्रपटात दिसला होता. आज आम्ही तुम्हाला राहुलविषयी अशी माहिती सांगणार आहोत, ज्यावरून तुमच्या लक्षात येईल की, राहुल हा खरोखर इंडस्ट्रीचा ‘हिरा’ आहे. 

मिस्टर एंड मिसेज़ अय्यर या चित्रपटात राहुल आणि कोंकणा सेन लीड रोलमध्ये होते. यात राहुलने एका वाइल्ड लाइफ़ फ़ोटोग्राफ़र चा रोल केला आहे, मात्र हे महत्वाचे नसून तो मुस्लिम आहे हे या चित्रपटात जास्त महत्वाचे आहे. कोंकणालाकळत तेव्हा तिच्या वाइल्ड लाइफ़ फ़ोटोग्राफ़र असलेला राहुल समजतो. मात्र जेव्हा राहुल मुस्लीम आहे, हे वागणुकीत बदल होतो. मात्र तरीही ती राहुलला एका धार्मिक दंग्याचा शिकार होण्यापासून वाचवते. यात या दोघांचा अभिनय इतका अप्रतिम आहे की, त्यांच्या जागेवर दुसरं कोणीच हा रोल करू शकत नाही. 

करीना कपूरसह चमेली या चित्रपटातही राहुलने लीड रोल केलेला आहे. यात राहुल एक बँकर असतो आणि हळूहळू तो एका वेश्येसोबत बोलू लागतो मग दोघांनाही एकमेकांच्या आयुष्यात इंटरेस्ट येतो.

राहुलने शौर्य या चित्रपटात मेजर सिंद्धांत चौधरीचा रोल केला होता. हॉलीवुड चित्रपट ‘अ फ़्यू गुड मैन’ या चित्रपटावर आधारित होता. या चित्रपटात केलेल्या रोलसाठी राहुलचे इंडस्ट्रीने आणि लोकांनीही कौतुक केले. 

15 पार्क एवेन्यू मध्ये पुन्हा एकदा कोंकणा आणि राहुलची जोडी एकत्र दिसली. यात राहुलने मनोरोगाने ग्रस्त असलेल्या कोंकनाच्या पतीचा रोल केला होता. यात राहुलसह सर्वच कलाकरांचा अभिनय एकदम ‘दर्जा’ होता.

प्यार के साइड इफे़क्ट्स हा सिनेमा एका अतरंगी विषयाला घेऊन होता. यात रोमेंटिक कॉमेडी होती. मल्लिका शेरावत आणि राहुलने या चित्रपटात जोडप्याची भूमिका केली होती. राहुल कशातच कमी नाही, हे या चित्रपटाने दाखवून दिले होते. 

लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी 

 

COMMENTS

नाव

Blog,11,Bollywood,34,Box Office,4,Celebrity,24,Chitranagari,15,Chitrapat,11,Fashion,27,Feature,33,Festival,4,Gossip,33,Health,21,Hollywood,8,Latest,30,Lifestyle,20,Music,7,Natak,2,OTT Live,9,Photography,3,Relationship,26,Review,8,Short Film,3,Theater,4,Tollywood,1,Trailer,5,Trending,25,Video,16,Web Series,7,You Tuber,5,
ltr
item
Pikcharwala: राजकारणात राज ठाकरे आणि अभिनयात राहुल बोसची अवस्था सारखीच झालेली आहे
राजकारणात राज ठाकरे आणि अभिनयात राहुल बोसची अवस्था सारखीच झालेली आहे
https://1.bp.blogspot.com/-npypWi1adtI/YMdxeCe-lvI/AAAAAAAAAcE/joCKnEq195wWPqZNHEddYm6MDx7Jl5OzACLcBGAsYHQ/s320/rahul%2Bbose%2BPikcharwala.jpg
https://1.bp.blogspot.com/-npypWi1adtI/YMdxeCe-lvI/AAAAAAAAAcE/joCKnEq195wWPqZNHEddYm6MDx7Jl5OzACLcBGAsYHQ/s72-c/rahul%2Bbose%2BPikcharwala.jpg
Pikcharwala
https://www.pikcharwala.com/2021/06/blog-post_92.html
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/2021/06/blog-post_92.html
true
2767188615897253807
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content