Perfect Couple रणवीर-दीपिकाच्या रिलेशनशिपच्या प्रत्येकाने वाचाव्या अशा गोष्टी; प्रेमीयुगलांनो या गोष्टी तुमच्या नक्कीच येतील कामी

असे म्हटले जाते की, जे कपल किंवा व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध असतात, त्यांची जोडी खूपच अनमोल आणि अजोड असते. अशीच जोडी बॉलीवूडमधील Perfect Cou...


असे म्हटले जाते की, जे कपल किंवा व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध असतात, त्यांची जोडी खूपच अनमोल आणि अजोड असते. अशीच जोडी बॉलीवूडमधील Perfect Couple रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोनची आहे. रणवीर एनर्जीने खचाखच भरलेला आहे तर दीपिका ग्रेस आणि डिग्निटीची मूर्ती आहे.

सध्या दोघांनीही आपली विशेष अशी ओळख भारतात आणि भारताबाहेरही बनवली आहे. ही जोडी बॉलीवूडमध्ये आपले पाय आता घट्ट रोवून उभी आहे. बॉलीवूड आणि त्यांच्या चाहत्यांना या जोडीचे भलतेच कौतुक आहे. सध्या दोघेही यशाच्या शिखरावर आहेत. अशातच त्यांनी घेतलेला लग्न करण्याचा निर्णय त्यांच्यातील खास नाते सांगणारा आहे.

काही दिवसांपूर्वी अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केले. नंतर लग्नाचे फोटो सोशल मिडीयावर टाकून त्यांनी चाहत्यांकडे आशीर्वादही मागितले. आता त्यांनी आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांपासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी आजवर त्यांचे रिलेशन हँडल केले ते खरोखरच ‘क़ाबिले-ए-तारीफ़’ आहे. त्यामुळे या जोडीकडून आपण निश्चितच काहीतरी प्रेरणा घेऊन काही गोष्टी शिकायला हव्यात.

1)  या दोघांची जोडी एका गोष्टीसाठी आदर्श आहे, ती गोष्ट म्हणजे प्रेम करणाऱ्या लोकांना दिखावा करायची गरज नसते. ते कधीही आपल्या प्रेमाचा गाजावाजा करत नाहीत. एकमेकांचे नाहक कौतुकही करत नाहीत.

2)  आजवर जेव्हा जेव्हा आपण या जोडीला एकत्र बघितले असेल तेव्हा तेव्हा रणवीर दिपिकाला कायम स्पेशल फील करायचा प्रयत्न करत असतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून तो दीपिकाला स्पेशल फील करवून देत असतो.

3)  रणवीरच्या ड्रेसिंग सेन्सला बहुतांश लोक नावं ठेवत असतात. कारण कधी तो शर्टवर झगा घालतो तर कधी मुलींसारख्या कपडे घालून त्यावर जाकेट घालतो. त्याच्या या अतरंगी कपडे घालण्याला अगदी त्याच्या जवळचे लोकसुद्धा नाव ठेवतात. आणि त्याला असे कपडे न घालण्याबद्दल सल्ले देतात. मात्र दीपिकाने कधीही त्याला त्याच्या अशा अतरंगी आणि विक्षिप्त ड्रेसिंगबद्दल ऐकवलेले नाही. तसेच तिने कधीही त्याला त्याने कसे राहावे याबद्दल सांगितलेले नाही. कारण ते दोघे एकमेकांना पुरेसं स्वातंत्र्य देतात.

4)  अनेकदा दोघेही एकत्र बाहेर कुठे गेल्यास ते लोकांच्या गर्दीत सापडतात. लोक त्यांना गराडा घालतात. अशावेळी काही पुरुष चाहते दीपिकाच्या नको तितके जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. गर्दीत मात्र दीपिकाला काहीही सुधारत नाही. काही लोकांचे तिच्या जवळ जाण्याचे हेतू वाईट असतात. हे रणवीरला माहिती असल्याने तो नेहमीच तिला प्रोटेक्ट करत असतो. आपल्या जोडीदाराला पब्लीकली सेफ कसे ठेवावे, हे त्याला चांगलेच ठाऊक आहे.

5)  सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दोघेही एकमेकांना पुरेपूर ओळखून आहेत. त्यांना एकमेकांचे चांगले वाईट गुण माहिती आहेत. एखादा कार्यक्रम असो वा एखादी फिल्म असो, ते नेहमीच एकमेकांना प्रोत्साहित करत असतात.

6)  त्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या दोघांनी मिडीयासमोर कधीच आपल्या प्रेमाच्या गप्पा केल्या नाहीत. मात्र त्यांचे रिलेशनशिप आहे, हे कधीही नाकारलेही नाही.

7)  दोघेही एकमेकांना बरोबरीचे प्रेम आणि सन्मान देतात. ते त्यांच्या इतर ठिकाणी वागण्यातूनही आजवर दिसून आले आहे.

8)  आपला जोडीदार हा नेहमी आपल्याला प्रोत्साहित करणारा असावा, हे प्रत्येकाला वाटते. रणवीरने आजवर अनेक ठिकाणी जाहीर कबुली दिली आहे की, जेव्हा जेव्हा मी दीपिकाला भेटतो, तिच्यासोबत असतो तेव्हा मला खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते.

9)  या दोघांनाही एकमेकांची आवडणारी गोष्ट म्हणजे त्या दोघांनाही कुटुंबाला वेळ द्यायला आवडते. एवढेच नाही तर रणवीर स्वतःसह दीपिकाच्या घरच्यांनाही वेळ देत असतो.

10)कधी कधी स्वतः पुढे होऊन दीपिकाला गर्दीतून बाहेर काढणे, तिच्या सोबत असल्यावर तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडून देणे, अशा बऱ्याच गोष्टी रणवीर करता असतो. तो कायम दीपिकाची काळजी घेत असतो, हे दीपिका कायमच सांगत असते.  

लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी 

पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com

| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |

टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala

मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com


COMMENTS

नाव

Blog,11,Bollywood,34,Box Office,4,Celebrity,24,Chitranagari,15,Chitrapat,11,Fashion,27,Feature,33,Festival,4,Gossip,33,Health,21,Hollywood,8,Latest,30,Lifestyle,20,Music,7,Natak,2,OTT Live,9,Photography,3,Relationship,26,Review,8,Short Film,3,Theater,4,Tollywood,1,Trailer,5,Trending,25,Video,16,Web Series,7,You Tuber,5,
ltr
item
Pikcharwala: Perfect Couple रणवीर-दीपिकाच्या रिलेशनशिपच्या प्रत्येकाने वाचाव्या अशा गोष्टी; प्रेमीयुगलांनो या गोष्टी तुमच्या नक्कीच येतील कामी
Perfect Couple रणवीर-दीपिकाच्या रिलेशनशिपच्या प्रत्येकाने वाचाव्या अशा गोष्टी; प्रेमीयुगलांनो या गोष्टी तुमच्या नक्कीच येतील कामी
https://1.bp.blogspot.com/-7tzyNSWzNXU/YMt00yeADAI/AAAAAAAAAd4/lB2sGZ1rakMyPB1xLfRQr9e5KFdHnvYcQCLcBGAsYHQ/s320/ranveer%2Band%2Bdipika%2BPikcharwala.jpg
https://1.bp.blogspot.com/-7tzyNSWzNXU/YMt00yeADAI/AAAAAAAAAd4/lB2sGZ1rakMyPB1xLfRQr9e5KFdHnvYcQCLcBGAsYHQ/s72-c/ranveer%2Band%2Bdipika%2BPikcharwala.jpg
Pikcharwala
https://www.pikcharwala.com/2021/06/perfect-couple.html
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/2021/06/perfect-couple.html
true
2767188615897253807
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content